वनविभागाची सरळसेवा भरती प्रक्रिया पुढे ढकलली

वनविभागासाठी वनरक्षक सरळसेवा भरती प्रक्रिया पूरस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. सुधारित तारखानंतर कळवल्या जातील, असे वनविभागातर्फे कळवण्यात आले आहे.

वनविभागातील वनरक्षक भरती प्रक्रिया 2019 अंतर्गत, महापरीक्षा मार्फत ऑनलाइन लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

त्यामध्ये पात्र उमेदवारांसाठी पुढील टप्प्यात कागदपत्रे तपासणी, शारीरिक मोजमाप, धाव चाचणी, लेखी परीक्षा आणि धाव चाचणीतील गुण मिळून निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी जाहीर करणे; याशिवाय 25/16 कि.मी. (पुरुष/ महिला) चालण्याची शारीरिक क्षमता चाचणी घेणे, नियुक्ती आदेश निर्गमित करणे हे टप्पे वनवृत्त स्तरावरील प्रादेशिक निवड समिती मार्फत आयोजित करण्यात आले होते. त्याबाबत उमेदवारांना विविध माध्यमातून कळवण्यातही आले होते. तथापि, राज्यातील पूर परिस्थिती आणि दळणवळणाची असुविधा लक्षात घेता वनरक्षक भरती प्रक्रियेतील पुढील टप्पे सध्यास्थितीत सुकर रितीने पार पाडणे शक्‍य नसल्याने सदर प्रक्रिया पुढे ढकलली आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड