पदवीधर असाल तर Google मध्ये करता येणार चांगल्या पगाराची नोकरी! – Google India Job Openings 2023
Google Winter Internship Program 2024
Google India Job Notification 2023
गुगल कंपनीमध्ये नोकरी मिळवणं सोपं नाही. यासाठी खूप चांगलं शिक्षण आणि कौशल्य येणं आवश्यक आहे. गुगलची हायरिंग प्रोसेस खूप कठीण आहे. अनेक इंटरव्ह्यू राउंडनंतर सर्वोत्तम उमेदवाराची निवड केली जाते. अशा परिस्थितीत 12वी पास उमेदवारालाही गुगलमध्ये नोकरी मिळू शकते का? याबद्दल अनेकांना जाणून घ्यायचं असतं.
गुगलमध्ये काम करण्यासाठी किमान बॅचलर डिग्री असणं आवश्यक आहे. त्यातही इंजिनीअरींग आणि कॉम्प्युटर सायन्स बॅकग्राउंड असलेल्या उमेदवारांना अधिक प्राधान्य दिलं जातं. गुगलची अधिकृत वेबसाइट google.com वर जॉब लिस्ट केले जातात. तुम्हाला गुगलमध्ये नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही google.com/careers वेबसाईटला भेट देऊ शकता.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
बारावी पास विद्यार्थ्याला गुगलमध्ये नोकरी कशी मिळेल?
गुगल त्यांची हायरिंग प्रोसेस आणि नियमांबद्दल खूप कठोर आहे. टॅलेंटेड आणि अनुभवी लोकांनाही इथे नोकरी मिळणं कठीण जातं. 10वी किंवा 12वी उत्तीर्णांना गुगलमध्ये थेट नोकरी मिळू शकत नाही. गुगलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी उमेदवाराकडे डिग्री असणं आवश्यक आहे. गुगल जास्तीत जास्त हायरिंग फक्त टेक्निकल पोस्टसाठी करतं.
गुगलमध्ये नोकरी कशी शोधायची?
गुगलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी तुमच्या रेझ्युमेवर काम करणं महत्त्वाचं आहे. गुगलमध्ये नोकरी मिळवायची असं ठरलं असेल तर तुम्ही 12 वी पास होताच त्याची तयारी सुरू करू शकता. कारण यास बरीच वर्षे लागू शकतात. तुम्हाला गुगलमध्ये कोट्यवधींच्या पॅकेजसह नोकरी हवी आहे, असं तुम्ही ठरवलं असेल तर तुम्ही त्यात नक्कीच यशस्वी व्हाल.
1-12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर तुमचा रेझ्युमे मेंटेन करणं सुरू करा. तुमच्या रेझ्युमेमध्ये माहितीपूर्ण कंटेंटसह तुमची वर्क स्किल्स हायलाइट करा. तुम्ही कोणत्या प्रकारचं काम करू शकता आणि तुमचं स्किल काय आहे हे स्पष्टपणे नमूद करा.
2- रेझ्युमेमध्ये तुमचा जीपीए आणि कोर्स इत्यादींची संपूर्ण माहिती द्या. तुमची शैक्षणिक कामगिरी, अभ्यासक्रम आणि प्रोजेक्ट इत्यादींचे डिटेल्स लिहा. तुम्ही कोणताही सर्टिफिकेट कोर्स केला असेल, तर त्याबद्दल तुमच्या रेझ्युमेमध्ये लिहा.
3- गुगल आपल्या कर्मचार्यांना अतिशय काळजीपूर्वक हायर करते. त्यामुळे रेझ्युमेमध्ये तुमच्या वर्क स्ट्रॅटर्जीबद्दल लिहा. तुम्ही गुगलच्या ग्रोथमध्ये कशी मदत करू शकता यावरदेखील फोकस करा. यामुळे गुगलच्या हायरिंग टीमचं लक्ष तुम्ही वेधू शकता.
4- तुमच्या रेझ्युमेमध्ये तुमची लीडरशिप स्किल्स दाखवा. तुम्ही कोणत्याही संस्थेत लीडरशिप रोल केला असेल तर त्याबद्दल लिहा, तुमच्या टीमची स्ट्रॅटर्जी आणि वर्क इफिशियन्सीचे तपशीलही द्या.
Google India Job Openings 2023 – There is a golden opportunity to do an internship at google, the leading tech company. Google has invited applications for a Winter Internship Program 2024. If you are selected for this internship, you will get a stipend of up to Rs 80,000 per month for Google Winter Internship Program 2024. So don’t miss an internship with a company like Google (Google Internship 2024) and also the opportunity to earn a good salary every month. This is a great opportunity for engineering and technology students. The last date to apply for the Google Winter Internship Program is October 1. So, instead of waiting for the last date, file the application as soon as possible.
आघाडीची टेक कंपनी गुगलमध्ये (Google) इंटर्नशीप करण्याची सुवर्णसंधी आहे. गुगलकडून हिवाळी इंटर्नशीप (Google Winter Internship Program 2024) साठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या इंटर्नशीपसाठी तुमची निवड झाल्यास तुम्हाला दरमहा 80,000 रुपयांपर्यंत मोबदला (Stipend) मिळेल. त्यामुळे गुगलसारख्या कंपनीसोबत इंटर्नशीप (Google Internship 2024) आणि त्यासोबतच दर महिन्याला चांगला पगार मिळवण्याची ही संधी अजिबात सोडू नका. इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. गुगल विंटर इंटर्नशीप प्रोगामसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर आहे. त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज दाखल करा. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
कोण अर्ज दाखल करु शकतात?
कंम्प्यूटर क्षेत्रासंबंधित पदवीधर विद्यार्थी, मास्टर्स किंवा डिग्री प्रोगामच्या अंतिम वर्षात असणारे विद्यार्थी या इंटर्नशीपसाठी अर्ज करु शकतात. या इंटर्नशीपमध्ये तुमची सॉफ्टवेअर इंटर्न या पदावर भरती करण्यात येईल.
इंटर्नशीप कधीपासून सुरु होईल?
सॉफ्टवेअर इंटर्नसाठी विंटर इंटर्नशीप प्रोगाम जानेवारी 2024 पासून सुरु होईल, मात्र त्यासाठी आता अर्ज दाखल करावा लागेल. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 1 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. ही इंटर्नशीप 22 ते 24 आठवड्यांची असेल. यासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना गुगलच्या हैदराबाद किंवा बंगळुरु येथील ऑफिसमध्ये जॉईनिंग होईल.
इंटर्नशीपसाठीची पात्रता
या इंटर्नशीपसाठी अर्ज करणारा विद्यार्थी कम्प्यूटर क्षेत्राशी संबंधित असावा. त्यासोबतच त्याला तांत्रिक बाबींची माहिती हवी. सी, सी ++, जावा, जावास्क्रिप्ट, पायथन यासारख्या बेसिक कोडींग लँग्वेज याचं ज्ञान असावं. तसेच संबंधित विद्यार्थ्याला डेटा स्ट्रक्चर्स आणि एल्गॉर्थिज्म याबाबतही माहिती असावी.
गुगल इंटर्नशीपसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया (How to Apply for Google Winter Internship Program 2024)
अर्ज करण्यासाठी सर्वात आधी careers.google.com या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
येथे Internship Application या पर्यायावर क्लिक करा.
आता समोर एक पेज उघडेल यामध्ये Resume सेक्शनमध्ये जा आणि तुमचा CV जोडा. यामध्ये तुमच्या कोडिंग संदर्भातील ज्ञानाचा उल्लेख आवर्जून करा.
त्यानंतर Higher Education सेक्शनमध्ये जा आणि आवश्यक माहिती भरा. त्यानंतर Degree Status मध्ये Now Attending पर्याय निवडा.
आता तुमचा वर्तमान अधिकृत किंवा अनधिकृत इंग्रजी ट्रांसक्रिप्ट अपलोड करा.
तुम्हाला सोयीस्कर लोकेशन देखील भरा.
Good News By Google – As you know, Due to the threat of economic recession in the United States, many companies have started cutting employees. As a part google also doing same thing in US. But, that as it may, a good news has come out from the Indian IT sector. This news is a relief for the youth looking for a job in IT. Tech giant Google has started recruitment for the post of Full Stack Engineer and Senior Software Engineer. These employees are required in the company’s Bangalore office.
अमेरिकेमध्ये आर्थिक मंदीच्या संकटाची चाहूल लागल्यामुळे अनेक कंपन्यांनी कर्माचारी कपात सुरू केली आहे. असं असलं तरीही भारतीय आयटी क्षेत्रातून एक चांगली बातमी समोर आली आहे. आयटीमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही बातमी दिलासा देणारी आहे. टेक जायंट गुगलनं फुल स्टॅक इंजिनीअर आणि सीनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअर पदासाठी कर्मचारी भरती सुरू केली आहे. कंपनीच्या बेंगळुरू येथील कार्यालयामध्ये या कर्मचाऱ्यांची गरज आहे. ‘टेक गिग’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
1.सीनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअरपदाच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या:
2. सीनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअरपदाच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या:
3. उमेदवाराने एक्झिस्टिंग डॉक्युमेंटेशन किंवा शैक्षणिक कंटेंटमध्येदेखील योगदान दिलं पाहिजे. प्रॉडक्ट किंवा प्रोग्रॅममधील गरजांवर आधारित कंटेंट स्वीकारता आला पाहिजे.
4. ट्रायएज प्रॉडक्ट किंवा सिस्टम इश्युज, समस्यांचे स्रोत, हार्डवेअर, नेटवर्क किंवा सर्व्हिस ऑपरेशन्स आणि गुणवत्तेवर होणारे परिणाम यांचं विश्लेषण करून डीबग/ट्रॅक/निराकरण करता आलं पाहिजे.
5. उपलब्ध तंत्रज्ञानाबाबत निर्णय घेण्यासाठी स्टेकहोल्डर्स आणि सहकाऱ्यांबरोबर डिझाईन रिव्ह्यू करता आले पाहिजेत.
सीनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअरपदाच्या पात्रता:
1. बॅचलर पदवी किंवा समतुल्य प्रत्यक्ष कामाचा अनुभव पाहिजे.
2. एक किंवा अधिक प्रोग्रॅमिंग भाषांमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि डेटा स्ट्रक्चर्स/अल्गोरिदमचा पाच वर्षांचा अनुभव पाहिजे.
3. सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्सची चाचणी, देखरेख किंवा लाँच करण्याचा तीन वर्षांचा अनुभव आणि सॉफ्टवेअर डिझाइन आणि आर्किटेक्चरचा 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
4. एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टममध्ये काम करण्याचा तीन वर्षांचा अनुभव गरजेचा आहे.
फुल स्टॅक इंजिनीअरपदाच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या:
1. उमेदवाराला प्रॉडक्ट किंवा सिस्टीम डेव्हलपमेंट कोड कसा लिहायचा हे माहित असलं पाहिजे. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ‘ही’ पात्रता असेल तर इथे लगेच करा अप्लाय
2. उमेदवाराला टेक्नॉलॉजीबाबत निर्णय घेण्यासाठी स्टेकहोल्डर्स आणि सहकाऱ्यांबरोबर डिझाईन रिव्ह्यू करता आले पाहिजेत.
3. उमेदवाराला इतर डेव्हलपर्सनी डेव्हलप केलेले कोड रिव्ह्यु कसे करावे हे माहीत असलं पाहिजे. सर्वोत्तम पद्धती निश्चित करण्यासाठी फिडबॅक देता आला पाहिजे.
4. उमेदवाराने एक्झिस्टिंग डॉक्युमेंटेशन किंवा शैक्षणिक कंटेंटमध्येदेखील योगदान दिलं पाहिजे. प्रॉडक्ट किंवा प्रोग्रॅममधील गरजांवर आधारित कंटेंट स्वीकारता आला पाहिजे.
फुल स्टेक इंजिनीअरपदाच्या पात्रता:
1. पदव्युत्तर पदवी किंवा कॉम्प्युटर सायन्स विषयातील पीएच.डी. किंवा संबंधित तांत्रिक क्षेत्रातील अनुभव गरजेचा आहे.
2. फुल स्टॅक डेव्हलपमेंटमध्ये दोन वर्षांचा अनुभव गरजेचा आहे. याशिवाय, जावा, पायथॉन, गो, C++ कोडबेसेस, जावा स्क्रिप्ट, टाइप स्क्रिप्ट, एचटीएमएल, सीएसएस, इत्यादींसह फ्रंट-एंड अनुभव असला पाहिजे.
3. अॅक्सेसेबल तंत्रज्ञान विकसित करण्याचा अनुभव पाहिजे.