आरोग्यसेविकांना नवीन वर्षात सहाय्यिकापदी पदोन्नतीचे गिफ्ट! | Aarogya Sevika Bharti 2024
Aarogya Sevika Bharti 2024
Female Health Worker Maharashtra Bharti
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत महिला आरोग्यसेविका म्हणून कार्यरत असलेल्या १०४ सेविकांना आरोग्य सहाय्यिका म्हणून पदोन्नती मिळाली आहे. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या ५९७ आरोग्यसेविकांना बुधवारी (ता. १) नियुक्तिपत्र मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य विभागामार्फत कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाचे ‘गिफ्ट’च समजले जाते. आरोग्य विभागात सरळ सेवा पद्धतीने भरण्यात येणाऱ्या परिचारिका (आरोग्यसेविका महिला) यांची अंतिम निवड यादी जाहीर झाली आहे.
यात आरोग्यसेविका महिलांच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, एनटी, इतर मागास प्रवर्ग, आर्थिक दुर्बल घटक, खुला आणि पेसा क्षेत्रातील जागांचा समावेश आहे. पात्र व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची अंतिम यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या स्वाक्षरीने नियुक्तिपत्र ऑनलाइन पद्धतीने ई-मेलद्वारे पाठविण्याची कार्यवाही सुरू आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
तत्पूर्वी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राची नावे निश्चित करून त्यांना नियुक्तिपत्र देण्याची प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ आहे. त्यात १०४ सेविकांना पदोन्नती मिळाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागांसाठी नवीन आरोग्यसेविकांची नियुक्ती करण्यात येईल. त्यामुळे अजून ही प्रक्रिया लांबली. परंतु, आता जवळपास काम पूर्ण झाले असून, एक ते दोन दिवसांत कर्मचाऱ्यांना नियुक्तिपत्र मिळतील, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
येथील कर्मचाऱ्यांना पदोन्नती
बागलाण- ९, चांदवड- ४, देवळा- ५, दिंडोरी- ७, इगतपुरी- ५, कळवण- ९, मालेगाव- ८, सिन्नर- ५, सुरगाणा-११, त्र्यंबकेश्वर- १२, येवला- ६.
Aarogya Sevika Bharti 2024: विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या कात्रीत अडकलेली जिल्हा परिषद आरोग्यसेविकांची भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करून नियुक्तिपत्र द्यावे, यासाठी उमेदवारांनी गुरुवारी (ता. ५) मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल व जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांची भेट घेतली. येत्या आठ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करून पात्र उमेदवारांना नियुक्तिपत्र देण्यात येईल, असे आश्वासन डॉ. मोरे यांनी या महिलांना दिले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जिल्हा आरोग्य विभागांतर्गत रिक्त विविध पदांची सरळसेवेने भरती करण्यासाठी ५ ऑगस्ट २०२३ ला जाहिरात प्रसिद्ध झाली.यात महिला आरोग्यसेविकांच्या तब्बल ५९७ जागांचा समावेश आहे. राज्य शासनाकडून भरती प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याची सूचना मिळाल्याने आरोग्य विभागाने १९ जुलै २०२४ ला उमेदवारांची परीक्षा घेतली. या परीक्षेतील गुणांच्या आधारे सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली.
भरती प्रक्रिया अगदी शेवटच्या टप्प्यात असताना विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे प्रक्रिया थांबल्याने उमेदवारांना अद्याप नियुक्तिपत्र मिळालेले नाही. आता आचारसंहिता संपताच उमेदवारांनी पुन्हा भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह लावून धरला आहे. गुरुवारी विविध जिल्ह्यांतील १५ ते २० महिलांनी जिल्हा परिषदेच्या सीईओ व जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांची भेट घेऊन नियुक्तिपत्र देण्याची मागणी केली. आरोग्य विभागाकडून उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी झालेली असून, ही फाइल फेरपडताळणीसाठी सामान्य प्रशासन विभागाकडे गेली आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची अंतिम मंजुरी घेऊन पात्र उमेदवारांना नियुक्तिपत्र देण्यात येणार आहे. भरतीची उर्वरित प्रक्रिया लवकरच करण्यात येईल व साधारणतः १६ डिसेंबरपूर्वी सर्व पात्र उमेदवारांना नियुक्तिपत्रे दिली जातील, असे आश्वासन आरोग्य विभागाने दिल्याचे या महिलांनी सांगितले
आरोग्य विभागातील हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांची भरती कागदपत्रे पडताळणीच्या अगदी शेवटच्या दिवशी स्थगित झाली. त्यामुळे महिला सेविकांना अशाच स्वरूपाचे काही विपरीत घडते की काय, अशी धास्ती वाटू लागली आहे. या भीतीपोटीच त्यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, जालना, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव येथील काही महिला जिल्हा परिषदेत चौकशीसाठी दाखल झालेल्या होत्या.
Aarogya Sevika Bharti 2024 Update
वर्षानुवर्षे रेंगाळलेली जिल्हा परिषद आरोग्य सेविकांची पदभरती परीक्षा कशीबशी घेण्यात जाती. मात्र, ९ हजार पदांसाठी झालेल्या परीक्षेत ५५ हजार उमेदवार सहभागी झाले अन् त्यातून फक्त सहाच हजार उत्तीर्ण झाते. त्यातूनही उच्च शैक्षणिक पात्रताधारक असल्याचे सांगून अनेकांना अपात्र ठरविण्यात आहे त्यामुळे परीक्षेनंतरही आरोग्य सेविकांची जवळपास चार हजार पदे रिक्तच राहणार आहेत. आरोग्य सेविकांच्या (एएनएम) ८ हजार ९५६ पदांसाठी शासनाने आयबीपीएस कंपनीमार्फत जुलैमध्ये परीक्षा घेतली. परंतु, परीक्षेच्या जाहिरातीत ‘आरोग्य सेविका’ या शब्दासोबतच ‘आरोग्य परिचारिका’ असाही शब्दप्रयोग करण्यात आला. त्यामुळे उत्च शैक्षणिक अर्हता (जीएलएम व बीएस्सी नर्सिंग) असलेल्या उमेदवारांनीही परीक्षाही दिली. त्यांना छाननीमध्ये कमी केले नाही. परंतु, आता निकाल लागल्यानंतर या उमेदवारांना आरोग्य सेविका पदासाठी जिल्हा परिषदांनी अपात्र ठरविले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पास झाल्यावर ठरवले अपात्र – यवतमाळमध्ये ३१५ पदांसाठी परीक्षा झाली. यात १०३ वगी पास झाल्यावर त्यातील ३६ महिलांना अपात्र ठरविण्यात आले आहे. अकोल्यात १२२ पदांसाठी परीक्षा झाली. यात ६७ जणी पास झाल्यावर त्यातील २२ जणांना अपात्र ठरविण्यात आले. नंदुरबारमध्ये २८४ पदांसाठी परीक्षा झाली. यात २१ उमेदवार उत्तीर्ण झाल्या. मात्र सहा जणींना अपात्र करून १५ जणींनाच पाव ठरविले आहे. अशाच प्रकारे सर्व जिल्ह्यांमध्ये परीक्षेनंतर अनेक पात्र उमेदवारांना उच् शैक्षणिक अहोंमुळे अपात्र ठरविण्यात आले आहे.
Table of Contents
Arogya sevak opretion theater technician sathi job
Online form arogya sevika sathi Kase bharayche te sanga
Me 2019 la form bharla hota atta parat bharava lagel ka
safsafaichi vacancy asel tar sanga
Recruitment Process will start within 2 months