नवीन अपडेट !! अंगणवाडी अंतर्गत अंगणवाडी कर्मचारी च्या ९१ जागा आताही रिक्त आहेत ! सविस्तर माहिती जाणून घ्या – 91 Anganwadi Vacancies Unfilled !
91 Anganwadi Vacancies Unfilled!
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील जवळपास १२०० अंगणवाड्यांमध्ये अंगणवाडी कर्मचारी आणि सेविकांच्या ९१ जागा अद्याप रिक्त आहेत. तसेच, राज्यातील एक अंगणवाडी सध्या बंद आहे. मागील पाच वर्षांत केंद्र सरकारकडून बालकांच्या पोषण आणि इतर सुविधांसाठी महाराष्ट्राला ७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता, त्यातील ६४.२३ कोटी रुपये राज्य सरकारने वापरले आहेत.
गोव्याचा आकडा आणि रिक्त पदे
केंद्रीय महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी देशभरातील रिक्त पदे आणि साधन-सुविधांच्या अभावाबाबत राज्यसभेत सविस्तर माहिती दिली. गोव्यात एकूण १२६२ अंगणवाडी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी १२६१ अंगणवाड्या सुरू असून, फक्त एक अंगणवाडी बंद आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राज्यातील रिक्त पदांमध्ये ३७ अंगणवाडी कर्मचाऱ्यांची आणि ५४ अंगणवाडी सेविकांची पदे समाविष्ट आहेत. या रिक्त जागांमुळे अनेक अंगणवाडी केंद्रांमध्ये कामाचा भार वाढला आहे.
‘मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.०’ अंतर्गत मोठा निधी मंजूर
बालकांच्या पोषण सुधारण्यासाठी आणि अंगणवाड्यांच्या सुविधांसाठी ‘मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.०’ अंतर्गत मोठी तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षांसाठी ५०,००० अंगणवाड्यांचे बांधकाम करण्याचा संकल्प केंद्राने केला आहे.
दरवर्षी १०,००० नवीन अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी प्रति अंगणवाडी १२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला जातो. यामध्ये –
८ लाख रुपये मनरेगा योजनेतून,
२ लाख रुपये १५व्या वित्त आयोगाकडून,
२ लाख रुपये महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून,
राज्य सरकारचा स्वतंत्र वाटा देखील देण्यात येतो.
अंगणवाड्यांचे स्थलांतर आणि नवीन सुविधा
केंद्र सरकारने राज्य सरकारला सूचना दिल्या आहेत की भाड्याच्या जागेत चालणाऱ्या अंगणवाड्यांसाठी शाळांमध्ये जागा उपलब्ध असल्यास त्यांना तेथे स्थलांतरित करण्यात यावे. यामुळे मुलांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील.
सक्षम अंगणवाड्यांमध्ये सामान्य अंगणवाड्यांच्या तुलनेत अधिक सुविधा असतील, जसे की –
- एलईडी स्क्रीन
- शुद्ध पाण्यासाठी फिल्टर
- पोषण वाटिका
- मुलांसाठी चांगल्या दर्जाची पुस्तके
राज्यातील बालकांच्या पोषणासाठी अधिक प्रयत्न गरजेचे
राज्यातील अंगणवाड्यांमध्ये बालकांच्या पोषणासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर निधी दिला असला तरी, रिक्त पदांमुळे अंमलबजावणीमध्ये अडथळे येऊ शकतात. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर ही पदे भरून अंगणवाड्यांचे काम सुरळीत चालेल, याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा आहे.