8वा वेतन आयोग लवकरच, कर्मचाऱ्यांना पगारात मिळणार जबरदस्त वाढ! – 8th Pay Commission! Massive Salary Hike!
8th Pay Commission! Massive Salary Hike!
आपल्याला माहितच असेल, आता केंद्र सरकारने 8वा वेतन आयोग मंजूर केला आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना पगारवाढीचा लाभ मिळणार आहे. सध्या 7वा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून लागू आहे. मागील वेतन आयोगांचा इतिहास पाहता दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होतो. चला तर जाणून घेऊयात या नवीन वेतन आयोगत काय नवीन आहे!
8वा वेतन आयोग कधी लागू होणार?
17 जानेवारी 2025 रोजी केंद्र सरकारने 8वा वेतन आयोग मंजूर केला. मात्र, अद्याप यासाठी समिती स्थापन झालेली नाही. लवकरच समिती स्थापन होऊन वेतनवाढीसंदर्भातील शिफारशी सरकारला सुपूर्द केल्या जातील. पुढे सरकार त्या मंजूर करून वेतन आयोग लागू करेल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कोणत्या कर्मचाऱ्यांना लाभ होईल?
देशभरातील सुमारे 1 कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या वेतन आयोगाचा फायदा होईल. हा आयोग 2025 मध्ये मंजूर झाला असला, तरी त्याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2026 पासून होण्याची शक्यता आहे.
8वा वेतन आयोगानंतर किती पगार वाढेल?
नव्या वेतन आयोगांतर्गत फिटमेंट फॅक्टर 2.86 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. 7व्या वेतन आयोगात हा 2.57 होता. त्यामुळे, किमान वेतन 18,000 वरून 51,480 रुपयांपर्यंत वाढू शकते. पेन्शन 9,000 रुपयांवरून 25,740 रुपयांपर्यंत वाढू शकते.
हवालदार, लिपिक, शिपाई यांना किती पगार मिळेल?
- शिपाई व अटेंडंट – 18,000 वरून 51,480 रुपये
- लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) – 19,900 वरून 56,914 रुपये
- कॉन्स्टेबल व कुशल कर्मचारी – 21,700 वरून 62,062 रुपये
- स्टेनोग्राफर व कनिष्ठ लिपिक – 25,500 वरून 72,930 रुपये
- वरिष्ठ लिपिक व तांत्रिक कर्मचारी – 29,200 वरून 83,512 रुपये
यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी पगारवाढ मिळणार असून, त्यांच्या आर्थिक स्थैर्यात सुधारणा होईल.