सातवा वेतन आयोगमध्ये महागाई भत्त्याची वाढ, सरकारी कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा! – 7th Pay Commission – DA Hike, Big Benefit for Government Employees!
7th Pay Commission – DA Hike, Big Benefit for Government Employees!
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे! पुढील वर्षी आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता असली तरी, सध्याच्या सातव्या वेतन आयोगांतर्गत महागाई भत्ता (DA) वाढण्याची शक्यता आहे. मार्च 2025 आणि ऑक्टोबर 2025 मध्ये ही वाढ लागू होऊ शकते. यातील पहिली वाढ 1 जानेवारी 2025 पासून लागू होईल आणि ती होळीच्या सुमारास जाहीर होण्याची शक्यता आहे.
होळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ?
या वर्षी होळी 14 मार्च 2025 रोजी आहे. त्यामुळे होळीपूर्वी केंद्र सरकार महागाई भत्ता वाढीची घोषणा करू शकते. महागाई भत्ता वाढल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतनात तसेच पेन्शनधारकांच्या निवृत्तिवेतनात वाढ होईल. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना DA (Dearness Allowance) दिला जातो, तर पेन्शनधारकांना DR (Dearness Relief) मिळतो.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
वर्षातून दोनदा DA वाढ
सातव्या वेतन आयोगानुसार वर्षातून दोनदा DA वाढतो – पहिला 1 जानेवारीपासून आणि दुसरा 1 जुलैपासून लागू होतो. ऑक्टोबर 2024 मध्ये केंद्र सरकारने DA 3% ने वाढवून तो मूळ वेतनाच्या 50% वरून 53% केला. पेन्शनधारकांनाही तितक्याच प्रमाणात फायदा झाला.
सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढेल?
अंदाजानुसार मार्च 2025 मध्ये सरकार 3-4% महागाई भत्ता वाढवू शकते.
जर 3% वाढ झाली, तर एंट्री-लेव्हल सरकारी कर्मचाऱ्यांचा वेतनवाढ 540 ते 720 रुपयांपर्यंत होईल.
4% वाढ झाल्यास ही वाढ 720 ते 960 रुपये दरमहा इतकी असू शकते.
सध्या ₹30,000 वेतन असलेल्या कर्मचाऱ्याला ₹9,000 DA मिळतो. 3% वाढ झाल्यास हा भत्ता ₹9,540 होईल, तर 4% वाढ झाल्यास ₹9,720 होईल.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी!
महागाईच्या पार्श्वभूमीवर DA वाढ हा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. केंद्र सरकार होळीपूर्वी अधिकृत घोषणा करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.