आनंदाची बातमी !! गोव्यात होणार तब्बल ५ हजार पदांची विविध सरकारी खात्यात भरती ! मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा -5,000 Govt Vacancies Announced!
5,000 Govt Vacancies Announced!
तुम्ही जर सरकारी खात्यात नोकरी करू इच्छित असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे! गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकत्याच झालेल्या साखळी येथील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा केली की, पुढच्या दोन वर्षांत तब्बल ५,००० सरकारी नोकऱ्या दिल्या जातील.
विधानसभेत सादर झालेल्या उत्तरांनुसार, सध्या ८३ खात्यांमध्ये एकूण ६,०६५ पदं रिक्त आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पोलीस खात्यात भरपूर संधी:
गोवा पोलीस खात्यात विविध पदांसाठी भरपूर रिक्त जागा आहेत:
- पोलीस अधीक्षक, उपनिरीक्षक, शिपाई यांसारख्या पदांमध्ये जवळपास 1,000 पदं रिकामी आहेत.
- फक्त पोलीस शिपाईच्या ६५ जागा रिकाम्या असून भरतीसाठी अजून प्रक्रिया सुरू नाही.
आरोग्य खात्यात ८०० पदांची भरती होणार!
- गोवा मेडिकल कॉलेज, दंत महाविद्यालय, मानसिक आरोग्य विभाग आणि इतर आरोग्य संस्थांमध्ये मिळून सुमारे ८०० पदं रिक्त आहेत.
- यामध्ये विशेषतः नर्ससाठी १६९ जागा उघड्या आहेत.
- वॉर्ड सिस्टर, एलडीसी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ इत्यादी पदांसाठी लवकरच भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे.
शिक्षण खात्यात ७५०+ पदं रिकामी!
- सहाय्यक शिक्षक, ADEI, मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, एलडीसी इत्यादी पदांमध्ये भरती होणार.
- गोवा शिक्षण खात्यात सध्या ७५० पेक्षा जास्त पदं रिकामी आहेत.
इतर खात्यांमध्येही संधी:
वीज विभाग, सार्वजनिक बांधकाम (PWD) आणि जलस्रोत विभागात अभियंता आणि इतर तांत्रिक पदं रिकामी आहेत.
महत्वाची टीप:
सध्या काही खात्यांमध्ये भरतीचे नियम अंतिम झालेले नाहीत, त्यामुळे भरती प्रक्रिया थोडी विलंबाने सुरू होणार आहे. तरीही ही एक उत्तम संधी असून, इच्छुकांनी सज्ज राहणं गरजेचं आहे!