डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची ३०८ पदे रिक्त!-308 Vacant Posts in Govt Hospitals!
308 Vacant Posts in Govt Hospitals!
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत असलेल्या रुग्णालयांमध्ये क्लासवन डॉक्टरांच्या ४६ मंजूर पदांपैकी २२ जागा रिक्त आहेत. त्यामुळे गंभीर आजारांवर त्वरित उपचार मिळण्यास अडथळे निर्माण होत आहेत.
सर्वसामान्य नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी जिल्हा व ग्रामीण रुग्णालये महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, रिक्त पदांमुळे रुग्णांना आवश्यक ते उपचार वेळेवर मिळत नाहीत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर असून, या भेटीत रिक्त पदांबाबत ठोस निर्णय होण्याची अपेक्षा आहे. सध्या जिल्ह्यात १४२८ मंजूर पदांपैकी ३०८ पदे रिक्त आहेत, त्यापैकी जिल्हा रुग्णालयातच १४७ जागा रिक्त असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
विशेषतः, जिल्हा रुग्णालयात १२ क्लासवन डॉक्टरांची पदे रिक्त असून, अचलपूर महिला व बाल रुग्णालयासह इतर ग्रामीण रुग्णालयांमध्येही डॉक्टरांची मोठी कमतरता जाणवत आहे. त्यामुळे सरकार या रिक्त पदांची भरती कधी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.