अकरावीसाठी यंदा २४ नवी कनिष्ठ महाविद्यालये;अकरावी प्रवेशात ३ ते ४ हजार जागा वाढणार !! 11th Admission 2024 – 2025

11th Admission 2024 - 2025

11th Admission Process 2024 – 2025

यंदातब्बल २४ महाविद्यालयांचा समावेश अकरावी प्रवेशात झाल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयातून देण्यात आली. यामुळे अकरावी प्रवेशात ३ ते ४ हजार जागा वाढणार आहेत. वाढ झालेल्या महाविद्यालयांमध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक १३ तर मुंबई उपनगरातील महाविद्यालयांची संख्या ६ एवढी आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अकरावी प्रवेशाचा दुसरा टप्पा बुधवारपासून सुरु होणार आहे. यासाठी नवीन महाविद्यालयांच्या जागा नोंदणीची मुदत उद्या संपणार आहे. अकरावी प्रवेशासाठी स्वयंअर्थसहाय्याच्या नावाने विनाअनुदानित महाविद्यालयांना दरवर्षी नव्याने काही महाविद्यालयांना संस्थाचालकांची मागणी आल्यानंतर सरकारच्या वतीने मान्यता दिली जाते. तर दुसऱ्या बाजूला काही महाविद्यालयात बहुतांश तुकड्यांमध्ये विद्यार्थीच फिरकत नसल्याने रिक्त जागांची संख्या वाढताना दिसते. असे असताना काही ठिकाणी अकरावी प्रवेशासाठी एमएमआर क्षेत्रातील महाविद्यालयांची संख्या वाढताना दिसत आहे

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महाविद्यालयात पायाभूत सुविधा नाहीत, शैक्षणिक वातावरण नाही, अशा ठिकाणी दरवर्षी मान्यता घेवून जागा वाढतात. अशा महाविद्यालयांचा फायदा विद्यार्थ्यांना काडीमात्र होत नाही. अशा तक्रारीही पालकांच्या असतात. गेल्यावर्षी सुमारे २४० तुकड्यांत एकाही विद्यार्थ्यांने प्रवेश घेतला नसल्याची माहितीही माहिती अधिकारातून उघड झाली होती. तरीही अशा महाविद्यालयांना मान्यता देवून शिक्षण विभाग कोणाचा फायदा करते? असाही सवाल उपस्थित होत आहे. यंदा वाढ झालेल्या महाविद्यालयात मुंबई विभागात ६ महाविद्यालये ठाणे विभागात १३, रायगडमध्ये १ आणि पालघर जिल्ह्यात ४ अशी २४ महाविद्यालयांची भर पडली आहे.


11th Admission 2024 – 2025

दहावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या- यावर्षी इयत्ता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा अर्ज भरण्याचा सराव दहावी निकालाच्या अगोदरच होणार आहे. २२ आणि २३ मे या कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे. २४ मेपासून प्रवेश अर्जाचा भाग १ भरण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती केंद्रीय प्रवेश समितीच्या अधिकृत सूत्रांनी दिली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अमरावतीसह राज्यातील सहा विभागांसाठी अकरावी प्रवेश हे ऑनलाइन पद्धतीने पूर्ण केले जातात. अर्ज भरण्याची प्रक्रिया ही दोन टप्प्यांत केली जाते. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना नोंदणी करता येते आणि त्यानंतर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अर्जाच्या भाग दोनमध्ये आवडीच्या महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम (गुणवत्तेनुसार) भरायचे असतात. दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज कसा करायचा, या संदर्भातील माहिती कळावी यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. २४ मेपासून विद्यार्थी नोंदणी आणि ऑनलाइन अर्जाचा भाग १ भरता येणार असून, शाळा मार्गदर्शन केंद्रासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करावे. यंदा विशेष फेरी १ नंतर अकरावीचे वर्ग सुरू होणार आहेत. त्याआधी २२ ते २३ मे दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे.

असे असेल अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक

  • विद्यार्थी-पालक प्रशिक्षण जनजागृती (२१ मेपासून दोन दिवस)
  • नोंदणी, ऑनलाइन अर्ज भरण्याचा सराव (२२ ते २३ मे)
  • प्रत्यक्ष नोंदणी आणि अर्जाचा भाग १ भरणे (२४ मेपासून पुढे दहावी (एसएससी बोर्डाचा) निकाल लागल्यानंतर दोन दिवसांपर्यंत)
  • अर्जातील माहिती तपासून प्रमाणित करणे (२४ मेपासून पुढे दहावी निकालानंतर दोन दिवसांपर्यंत)
  • कनिष्ठ महाविद्यालय नोंदणी (२२ मेपासून दहावी निकालापर्यंत)
  • कॉलेज पसंतीक्रम नोंदविणे (अर्ज भाग २) (दहावी निकालानंतर पाच दिवस (प्रत्येक फेरीपूर्वीही संधी)
  • कोटा अंतर्गत प्रवेश (दहावी निकालानंतर पाच दिवस)
  • नियमित प्रवेश फेरी १ (दहावी निकालानंतर १० ते १५ दिवस)
  • नियमित प्रवेश फेरी २ (७ ते ९ दिवस)
  • नियमित प्रवेश फेरी ३ (७ ते ९ दिवस)
  • विशेष फेरी १ (७ ते ८ दिवस)
  • विशेष फेरी २ (एटीकेटीसह (एक आठवडा)

11th Admission 2024 – 2025

11th Admission 2024 – 2025 : Eleventh Admission online access from Next Week – मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती आणि नाशिक या महापालिका क्षेत्रांतील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात पुढील आठवड्यात होणार आहे. दहावीच्या निकालापूर्वी हा प्रवेशाचा टप्पा असेल. दहावीच्या निकालानंतर दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होणार आहे या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रकियेसाठी दहावीला बसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी संबंधित संस्थेला ही माहितीही पुरविण्यात आली असल्याने पुढील आठवड्यात या प्रवेशाच्या नोंदणीचा पहिला टप्पा सुरू होईल. यात विद्यार्थ्यांना लॉगीन आयडीच्या माध्यमातून आपली प्राथमिक माहिती भरण्याची प्रक्रिया करता येईल. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रकियेत मागील काही वर्षांमध्ये तीन ते चार महिना चालणारी प्रवेश प्रक्रिया ही आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी फेऱ्यांवर नियंत्रण आणले जाणार आहे. यामुळे नियोजित वेळेतच प्रवेश प्रकिया संपवली जाणार असून त्यासाठीचे नियोजन केले जात असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी दिली.

न्यायालयाचे आदेश

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही गुणवत्तेच्या निकषावर करण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत; मात्र या आदेशाला मागील काही वर्षांत डावलेले जाते. त्यासाठी प्रथम प्राधान्य फेरी राबवून हे आदेश पायदळी तुडवले गेले. प्रवेश फेन्ऱ्यांचे नियोजन करताना अल्पसंख्याक महाविद्यालयांच्या जागा प्रत्यार्पित करण्यासाठी सूट दिल्याने मराठी आणि गुणवत्ताधारी विद्याथ्यर्थ्यांवर वेळोवेळी अन्याय झाला असून यावेळी त्यात सुधारणा व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे. यासाठी सिस्कॉम संस्थेने वेळोवेळी सूचना, अहवाल आणि अभिप्राय विभागाला दिले आहेत.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Sangita dongre says

    Special round chi date Kay aahe?

  2. Rahul savale says

    11th che Admission 3th raund khadhi parent aahe

  3. Rahul savale says

    Indian army ची भरती कधी निघणार आहे स

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड