मुलाखतीची शिवाय पोस्टात १० वी पास असलेल्यांना थेट नोकरी, 6538 पदे भरणार 

10th pass jobs in Post Office For Dak Sevak

10th pass jobs in Post Office For Dak Sevak – देशावर कोरोनाचं संकट असल्यानं लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे. लॉकडाऊनमुळे उद्योगधंद्यांची गतीही मंदावलेली आहे. पण गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकार मोठ्या प्रमाणात सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देत आहे. सीआरपीएफ किंवा सेबीसारख्या शाखांमध्येही नोकरीची संधी मिळत आहे. विशेष म्हणजे भारतीय पोस्ट ऑफिसही हजारो पदांवर मोठ्या प्रमाणात रिक्त जागा भरत आहे. भारतीय पोस्ट ऑफिसत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. पोस्ट ऑफिसमधील या भरतीअंतर्गत मध्य प्रदेश पोस्टल सर्कल, राजस्थान पोस्टल सर्कल आणि जम्मू-काश्मीर पोस्टल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवक (जीडीएस)च्या एकूण 6538 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. तीन राज्यांच्या पोस्ट ऑफिसमधील नोकरीशी संबंधित महत्त्वाचे तपशील जाणून घेऊया.

भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये कोणत्या राज्यांत किती जागा रिक्त 

  • मध्य प्रदेश पोस्टल सर्कलमधील पदांची संख्या –  2,834
  • राजस्थान पोस्टल सर्कल मधील पदांची संख्या – 3,262
  • जम्मू-काश्मीर पोस्टल सर्कलमधील पदांची संख्या – 442
  • ग्रामीण डाक सेवक (जीडीएस)च्या एकूण पदांची संख्या – 6,538
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भारतीय डाक विभागाच्या मध्य प्रदेश पोस्टल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवकांच्या (जीडीएस) 2,834 पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जुलै 2020 आहे. राजस्थान पोस्टल सर्कलमधील जीडीएसच्या 3,262 पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै 2020 आहे. त्याच वेळी, जम्मू-काश्मीर पोस्टल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 ऑगस्ट 2020 आहे.

शैक्षणिक पात्रता
ग्रामीण डाक सेवकांच्या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्था / बोर्डाकडून दहावी उत्तीर्ण केलेली असावी.

वय श्रेणी
ग्रामीण डाक सेवकांच्या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे व जास्तीत जास्त 40 वर्षे असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा नियमानुसार शिथिल केली जाईल.

निवड कशी होईल?
मध्य प्रदेश पोस्टल सर्कल, राजस्थान पोस्टल सर्कल आणि जम्मू-काश्मीर पोस्टल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) पदांच्या भरती प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत देण्याची गरज नाही. ऑनलाइन अर्जानंतर दहावीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांची निवड केली जाईल.

पोस्ट ऑफिसमधील या भरतीअंतर्गत मध्य प्रदेश पोस्टल सर्कल, राजस्थान पोस्टल सर्कल आणि जम्मू-काश्मीर पोस्टल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवक (जीडीएस)च्या एकूण 6538 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

४१६६ जागा-दहावी उत्तीर्णांसाठी पोस्टात परीक्षेशिवाय भरती


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

41 Comments
  1. Kendre dhanashri dilip says

    Exam kdi ahe

  2. ashvini hemant girane says

    पालघर जिल्हा मी आता १२ ची एक्साम दिली आहे आर्टस् मध्ये तर मला रेलवे भरती मुंबई मध्ये जॉब मिळू शकेल का

  3. Kamlesh Patil says

    Nhi exam nhi aahe direct merit list 10 % vrr

  4. Komal ingole says

    Form fill karnyasathi web site konti aahe

  5. Hanmant Mahadev Shikare says

    Post graduate apply This post

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड