विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! गणित, विज्ञान विषयात नापास झाले तरी मिळणार अकरावीत प्रवेश; शिक्षणतज्ञांनी केले स्वागत

10th Exam 2024

10th Exam 2024 Update

10th Exam 2024: दहावीच्या परीक्षेत मोठा बदल झाला असून आता विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञान या दोन्ही विषयात ३५ ऐवजी २० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवल्यास त्याना अकरावीत प्रवेश मिळणार आहे… या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

शालेय शिक्षणात गणित आणि विज्ञान विषय म्हटले की अनेकांच्या पोटात गोळा येतो. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत हे विषय अवघड वाटणाऱ्या विद्यार्थ्यांवर उत्तीर्ण होण्याचे दडपण असते. परंतु, आता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत गणित/विज्ञान विषयांत २० पेक्षा जास्त आणि ३५ पेक्षा कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही उत्तीर्ण करण्यात येईल, अशी तरतूद राज्य अभ्यासक्रम आराखड्यात केली आहे. या आराखड्याला मंजुरी मिळाली असली तरीही प्रत्यक्षात त्यानुसार हे बदल तातडीने होणार नाहीत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

यंदा तरी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत या आराखड्यानुसार कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी आणि बारावीमध्ये तसेच भविष्यात गणित किंवा विज्ञान विषयांमध्ये व्यावसायिक प्रगती करायची नसेल आणि हे विषय इयत्ता दहावीमध्ये अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्याचे पुढील शिक्षण थांबणार असेल, तर याबाबत पर्यायी आणि सर्वयोग्य मार्ग शोधणे आवश्यक ठरते, त्यादृष्टीकोनातून अशा इयत्ता दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी दोन पर्याय राज्य अभ्यासक्रम आराखड्यात दिले आहेत.

गणित आणि विज्ञान विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा देऊन इयत्ता दहावी उत्तीर्ण व्हावे, हा पहिला पर्याय आहे. तर विद्यार्थ्यांस किमान २० गुणांपेक्षा अधिक परंतु ३५ पेक्षा कमी गुण (गणित आणि विज्ञान यांपैकी एक किंवा दोन्ही विषयात) असतील, तर अशा विद्यार्थ्यांस गुणपत्रिकेवर ‘त्यांना पुढील शिक्षणात गणित/विज्ञान किंवा दोन्हींवर (जे लागू असेल ते) आधारित विषय घेता येणार नाहीत’, अशा आशयाचा शेरा नमूद करून उत्तीर्ण करण्यात येईल, असे राज्य अभ्यासक्रम आराखड्यात स्पष्टपणे नमूद केले आहे. त्याला राज्य सरकारने नियुक्त केलेल्या सुकाणू समितीने अंतिम मान्यता दिली आहे.

राज्य अभ्यासक्रम आराखडा लागू करण्यासंदर्भात आदेश आल्यानंतर त्यानुसार टप्प्या-टप्प्याने नवीन पाठ्यपुस्तके येतील आणि त्यानुसार हा आराखडा लागू केला जाईल. त्यामुळे, यंदाच्या मार्च-एप्रिल २०२५ मध्ये होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेत निश्चितच हा बदल लागू असणार नाही. याबाबत राज्य मंडळातर्फे अधिकृतरीत्या स्पष्टीकरण लवकरच करण्यात येईल.” – शरद गोसावी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

जिंकण्यासाठी मानसिक आरोग्य किती महत्वाचे?

चापण्यासाठी इथे क्लिक करा राज्य अभ्यासक्रम आराखड्यात दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान परीक्षेत २० पेक्षा जास्त आणि ३५ पेक्षा कमी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन पर्याय दिले आहेत. त्यात, या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देऊन या विषयात उत्तीर्ण होता येईल, हा एक पर्याय आहे. तर गुणपत्रिकेवर ‘पुढील शिक्षणात गणित/विज्ञान किंवा दोन्हींवर (जे लागू असेल ते) आधारित विषय घेता येणार नाहीत’ या शेऱ्यासह उत्तीर्ण असा दुसरा पर्याय असेल. – राहुल रेखावार, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद


10th Exam 2022

10th Exam 2022: 10th Exam 2023 application start on 19th of October 2022. Students apply before the 10th of November 2022. Since the 10th exam application form is to be filled online, it is necessary to fill it through the school. Further details are as follows:-

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांना बुधवारपासून (१९ ऑक्टोबर) ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. नियमित विद्यार्थ्यांना १० नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येईल. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

दहावीचे परीक्षा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचे असल्याने ते शाळेमार्फत भरणे आवश्यक आहे. नियमित विद्यार्थ्यांसह पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणी सुधार, तुरळक विषय घेऊन परीक्षेस बसणारे, आयटीआयद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेण्याऱ्या विद्यार्थ्यांना ११ ते १५ नोव्हेंबर दरम्यान परीक्षा अर्ज भरता येईल. नियमित विद्यार्थ्यांचा ऑनलाइन परीक्षा अर्ज भरताना सरल प्रणालीवर विद्यार्थ्यांची नोंद असणे आवश्यक आहे.

10th Exam 2022


Pevious Update –

10th Exam 2022: दहावी परीक्षा अर्ज भरण्यास पुन्हा मुदतवाढ

10th Exam 2022 : The online application process for the 10th exam has been extended again. Students will now be able to apply till December 26 and January 1 with late fees. Further details are as follows:-

दहावी परीक्षेच्या ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना २६ डिसेंबर आणि विलंब शुल्कासह १ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. 

ही मुदतवाढ नियमित, खासगी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षा देणारे आदी सर्वांना लागू राहील. याआधी उमेदवारांना १२ डिसेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत आणि विलंब शुल्कासह २१ डिसेंबर ते २८ डिसेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहे. पण एसएससी बोर्डाने याला पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे.

  • अर्ज भरताना माध्यमिक शाळांना तांत्रिक व इतर अडचणी येत असल्याचे निदर्शनास आल्याने ही मुदतवाढ देण्यात आल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.
  • नव्या सुधारित वेळापत्रकानुसार नियमित शुल्कासह २६ डिसेंबर २०२१ पर्यंत तर विलंब शुल्कासह २७ डिसेंबर ते १ जानेवारी २०२१ या कालावधीत दहावी परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत.
  • माध्यमिक शाळांनी सरल डेटाबेसवरून नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे आहेत.
  • यानंतर ६ जानेवारी २०२२ पर्यंत शाळा चलन डाऊनलोड करून बँकेत शुल्क भरू शकतात.
  • त्यानंतर माध्यमिक शाळांनी प्री-लिस्ट मंडळाकडे जमा करण्याची अंतिम मुदत ४ जानेवारी २०२१ आहे.

विद्यार्थ्यांना राज्य मंडळाने असे आवाहन केले आहे की दहावी परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज त्यांच्या माध्यमिक शाळांमार्फत भरावेत.

अधिकृत वेबसाईट – www.mahahsscboard.in


10th Exam 2022 | SSC Exam 2022

10th Exam 2022 : The State Board has clarified that the tenth examination applications have been extended due to technical and other difficulties faced by the secondary schools while filling up the applications. With regular fee till 20th December 2021 and with a late fee from 21st December to 28th December 2021 online application for 10th exam can be filled. Further details are as follows:-

अर्ज भरताना माध्यमिक शाळांना तांत्रिक व इतर अडचणी येत असल्याचे निदर्शनास आल्याने दहावी परीक्षा अर्जांना मुदतवाढ देण्यात आल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे. नियमित शुल्कासह २० डिसेंबर २०२१ पर्यंत तर विलंब शुल्कासह २१ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ या कालावधीत दहावी परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत.

माध्यमिक शाळांनी सरल डेटाबेसवरून नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे आहेत. यानंतर २ जानेवारी २०२२ पर्यंत शाळा चलन डाऊनलोड करून बँकेत शुल्क भरू शकतात. त्यानंतर माध्यमिक शाळांनी प्री-लिस्ट मंडळाकडे जमा करण्याची अंतिम मुदत ४ जानेवारी २०२१ आहे. विद्यार्थ्यांना राज्य मंडळाने असे आवाहन केले आहे की दहावी परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज त्यांच्या माध्यमिक शाळांमार्फत भरावेत.


10th Exam 2022 Details 

10th Exam 2022 : The application process for the 10th exam is starting on 18th November 2021. The last date to fill the application with regular fee is 20th December 2021. Secondary schools are required to fill up the application form online. Further details are as follows:-

SSC Exam 2022

दहावी परीक्षांच्या अर्ज प्रक्रियेला १८ नोव्हेंबर २०२१ पासून सुरूवात होत आहे. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची अखेरची तारीख २० डिसेंबर २०२१ आहे. माध्यमिक शाळांनी ऑनलाइन पद्धतीने हे अर्ज भरायचे आहेत.

10th Exam 2022

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

नियमित, पुनर्परीक्षार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसणारे, तसेच खासगी विद्यार्थ्यांची अर्ज प्रक्रिया १८ नोव्हेंबर पासून सुरू होणार असून नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची अखेरची तारीख २० डिसेंबर २०२१ आहे. माध्यमिक शाळांनी चलानद्वारे बँकेत शुल्क भरण्याचा कालावधी १८ नोव्हेंबर २०२१ ते ३० डिसेंबर २०२१ आहे. त्यानंतर माध्यमिक शाळांनी प्री-लिस्ट मंडळाकडे जमा करण्याची अंतिम मुदत ४ जानेवारी २०२१ आहे. विलंब शुल्कासह दहावीचा अर्ज भरण्याचा कालावधी २० डिसेंबर २०२१ ते २८ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. विद्यार्थ्यांना राज्य मंडळाने असे आवाहन केले आहे की दहावी परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज त्यांच्या माध्यमिक शाळांमार्फत भरावेत.

अधिकृत बेबसाइट – www.mahahsscboard.in

PDF जाहिरात – https://bit.ly/3CufTVw

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड