दहावी, बारावीचे निकाल जुलैमध्ये

10th 12th Exam Results 2020

दहावी- बारावीचे विद्यार्थी सध्या निकाल कधी लागणार या वर विचार करत आहे, तर मित्रांनो यंदा मार्चच्या दहावी परीक्षेसाठी १७ लाख ६५ हजार ८९८ आणि बारावीसाठी १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी बसले आहेत. बारावीचे सर्व पेपर्स करोनामुळे लॉकडाउनपूर्वी संपले होते. मात्र, दहावीचा केवळ भूगोलाचा पेपर होऊ शकला नव्हता. मात्र, आता निकाल लावण्यासाठी वेगाने प्रक्रिया सुरू असून, १५ जुलैपर्यंत बारावीचा आणि जुलैअखेरीपर्यंत दहावीचा निकाल लावू, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी सोमवारी सांगितले. या संदर्भातील अपडेट आम्ही महाभरती वर प्रकाशित करतच राहू. तरी वेळोवेळी आपल्यास अपडेट्स मिळावे म्हणून प्लेस्टोर वरून “महाभरती” (MahaBharti) अँप डाउनलोड करायला विसरू नका

शालेय शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर विविध ऑनलाइन माध्यमांचे पायलट प्रॉजेक्ट सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्याप्रमाणे सोमवारी त्यांनी जिओ टीव्ही, तसेच गुगल मीटद्वारे कशाप्रकारे ऑनलाइन वर्ग भरवता येतो, त्याचे प्रात्यक्षिक पाहिले व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ही माहिती देण्यात आली. यावेळी ९७ टक्के उत्तरपत्रिका या करोना काळात परीक्षकांकडून जमा करण्यात आल्या असून, स्कॅनिंगही वेगाने सुरू असल्याची माहिती शकुंतला काळे यांनी दिली.

शालेय शिक्षण विभागाची ‘व्हिसी’ सोमवारी घेतली. त्यावेळी विभागाच्या मंत्री वर्षा गायकवाडही उपस्थित होत्या. मुख्यमंत्र्यांनी पहिली ते बारावीपर्यंतचा शैक्षणिक अभ्यासक्रम हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने असल्याने त्याची सर्व उपकरणांवर कॉम्पॅटिबिलिटी असावी, तसेच तो सहजरीत्या ऑफलाइन उपलब्ध झाला पाहिजे, हे पाहण्यास सांगितले. यावेळी त्यांनी गुगल मीटवरील एका ऑनलाइन वर्गाचे प्रात्यक्षिक पाहिले. विद्यार्थ्यांना कुठल्याही तांत्रिक अडचणी येऊ देता कामा नये, तसेच त्या आल्यास त्यांचे त्वरित निराकरण करणारी यंत्रणा हवी, असेही ते म्हणाले. येत्या काही दिवसांत शिक्षक आमदार, तसेच निवडक मुख्याध्यापक, शिक्षक यांना देखील हे सादरीकरण करून त्यांच्याकडून सूचना मागवाव्यात, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जिओ टीव्हीवर प्रायोगिक तत्त्वावर दहावी आणि बारावीसाठी दोन वाहिन्या तयार करण्यात आल्या आहेत. तसेच या टीव्हीवर पहिली ते बारावी असे स्वतंत्र पाच वाहिन्यांचेही नियोजन आहे, असे सांगण्यात आले. दूरदर्शनकडेदेखील दिवसाला ४ ते ५ तास शैक्षणिक तास आयोजित करण्याचे नियोजन आहे, असे यावेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.


मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार याकडे आता विद्यार्थ्यांचे डोळे लागले आहेत. सर्वसाधारणपणे हे निकाल मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतात. पण यंदा लॉकडाऊन स्थितीमुळे ते लांबणीवर पडले आहेत. यंदा हे निकाल जुलै २०२० च्या पहिल्या आठवड्यात लागण्याची दाट शक्यता आहे. अर्थात राज्य शिक्षण मंडळाकडून अद्याप निकालाच्या तारखांबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दहावीचा भूगोल विषयाचा पेपरही लॉकडाऊनच्या कचाट्यात सापडला होता आणि अखेरीस रद्द करण्यात आला. सुरुवातीला शिक्षण विभागाने सांगितले की उत्तरपत्रिका तपासनीसांपर्यंत पोहोचवण्यासाठी साधनेच नाहीत, त्यामुळे मूल्यांकनाचे काम लॉकडाऊननंतरच होईल.

शिक्षण विभागाने नंतर दहावी आणि बारावीच्या पेपरतपासणीचे काम करणाऱ्या शिक्षकांना शाळेतून घरी उत्तरपत्रिकांची ने-आण करण्याची परवानगी दिली. तत्पूर्वी, मे महिन्यात उच्चा न्यायालयानेही शिक्षण मंडळाला बोर्डाचा निकाल १० जून २०२० पर्यंत लावण्याचे निर्देश दिले. देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन स्थिती हळूहळू अनलॉक करण्यास सुरुवात झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळही आता निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात लावण्याच्या तयारीत आहे.

सुमारे १३ लाख विद्यार्थ्यांनी बारावीची तर सुमारे १७ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. गेल्यावर्षी राज्य मंडळाचा दहावीचा निकाल ८ जून तर बारावीचा निकाल २८ मे रोजी जाहीर करण्यात आला होता.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड