दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानगंगा’

10th 12th Class Students Online Education Series Dnyanganga

10th 12th Class Students Online Education Series Dnyanganga  : शालेय शिक्षण विभागातर्फे राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानगंगा हा शैक्षणिक कार्यक्रम येत्या सोमवारी २६ ऑक्टोबरपासून सकाळी साडेसात ते साडेबारा या वेळेत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर काही दिवसांत इयत्ता नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी अशाच प्रकारचा कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. मात्र, काही अडचणींमुळे दहावी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम उशिराने सुरू होणार आहे.

10th 12th Class Students Online Education Series Dnyanganga  : करोनाच्या प्रादुर्भावामुळे शालेय शिक्षण विभागाने यंदाच्या शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने सुरू केले आहे. मात्र, राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याकडे ऑनलाइन शिक्षणासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा व स्मार्टफोनसारखी साधने नाहीत. कोणत्याच सुविधा नसल्याने, ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असल्याचे चित्र आहे. या सर्वांवर उपाय म्हणून शालेय शिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वी जिओ वाहिनीवर ज्ञानगंगा उपक्रम सुरू केला. याचाच पुढचा टप्पा म्हणून सह्याद्री वाहिनीवर ज्ञानगंगा शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या शैक्षणिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. काही दिवसांपूर्वी शैक्षणिक कार्यक्रमासाठी दूरदर्शनवर वेळ मिळावी यासाठी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून वेळेची मागणी केली होती. त्यानुसार आता सह्याद्री वाहिनीवर शैक्षणिक कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमाबाबतची अधिक माहिती वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर दिली आहे.

किती विद्यार्थ्यांना फायदा होणार ?

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शैक्षणिक वर्षाचे पहिले सत्र संपत आले असताना दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम सुरू करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे दहावी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी सध्या शैक्षणिक कार्यक्रम उपलब्ध नाही. येत्या काही दिवसांनी हे कार्यक्रम सुरू होणार आहेत. त्यामुळे या शैक्षणिक कार्यक्रमांचा किती विद्यार्थ्यांना फायदा होणार, हे येत्या काही दिवसांत समजणार आहे.

वेळापत्रक – सोमवार ते शनिवार

  • बारावी वाणिज्य – सकाळी साडेसात ते साडेआठ
  • बारावी विज्ञान – नऊ ते दहा
  • बारावी व्यावसायिक शिक्षण – दहा ते साडेदहा
  • बारावी कला – साडेदहा ते अकरा
  • दहावी इंग्रजी माध्यम – साडेअकरा ते दुपारी साडेबारा

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड