राज्य सरकार देणार दहा हजार नोकर्‍या

‘राज्यात लवकरच दहा हजार सरकारी पदांसाठी नोकरभरती केली जाईल’, अशी महत्त्वपूर्ण घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी केली. काही सरकारी खात्यांतर्गत  थेट नोकर भरती होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकारांशी संवादावेळी त्यांनी ही घोषणा केली.

 

ते म्हणाले, ‘राज्यातील नोकरभरती आणि विकास प्रकल्पांवरील निर्बंध येत्या 30 नोव्हेंबरला उठवले जाणार आहेत. त्यामुळे 1 डिसेंबरपासून नोकर भरतीसह विकासकामांचा मार्गही मोकळा होणार आहे. सरकारी सर्व खात्यातील नोकरभरतीचा मोठा ताण राज्य कर्मचारी निवड आयोगावर येतो. त्यामुळे आयोगाची ‘ना हरकत’ घेऊन काही खात्यांतील तांत्रिक जागांची थेट भरती खात्यांतर्गतच केली जाईल. येत्या एक डिसेंबरपासून राज्यातील नोकरभरती आणि विकासकामांवर कोणतेही निर्बंध नसतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची आर्थिक स्थिती कठीण झाल्याने सरकारी खर्चात कपात करावी लागली होती. यामध्ये नोकर भरतीसह नव्या विकासकामांवर राज्य सरकारने निर्बंध घातले होते.  त्याबाबतचे परिपत्रक सरकारने मार्च 2020 मध्ये जारी केले होते, अशी माहिती त्यांनी दिली. आता दोन महिन्यांपासून राज्याची आर्थिक स्थिती काही प्रमाणात सुधारली आहे. आपण  सरकारी कामांचा पुन्हा आढावा घेतला. त्यात असे लक्षात आले की राज्यात महत्त्वाच्या विकासकामांसाठी सरकारकडे पुन:पुन्हा परवानगीसाठी यावे लागत होते. हे व्याप कमी करण्यासाठी निर्बंध हटविण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

 

तीव्र संतापावर जालीम उपाय? 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

येत्या डिसेंबरमध्ये जिल्हा पंचायत आणि नगरपालिका निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे. तसेच आगामी 2021 वर्ष हे विधानसभा निवडणुकीपूर्वीचे शेवटचे वर्ष आहे. राज्यात विविध प्रश्नांवरून सत्ताधारी भाजपविरुद्ध लोकांमध्ये तीव्र विरोधाची भावना आहे. या तिन्ही निवडणुकांमध्ये होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी नोकर भरती हा जालीम उपाय ठरू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

9 Comments
  1. Katle Vaishali babasaheb says

    ITI electrician jaga latur madhe aahet ka

  2. Chandukumar says

    ●••• नोकरभरती बाबत सर्व राज्य सरकारने जागे होऊन पावले उचलली पण महाराष्ट्राच्या सरकारला थंडीने एवढे जिकडुन ठेवले की, मुख्यमंत्री वेगळेच पण राज्य कोण चालवतं हेच निश्चित नाही.
    विषय :– विजबिल माफी अनिश्चित
    100 युनीट पर्यत मोफत विज अनिश्चित
    नोकरभरती अनिश्चित
    तिन वर्षापासून प्रलंबित शिक्षक भरती अजुनही अपुर्ण
    लिस्ट मोठी होत आहे थांबणेच सोयीचे.

  3. Surendra says

    Garm sevak

  4. Patil Nitin balasaheb says

    Ex Army job kute kute ahe

  5. Sagar Rajput says

    Direct Government job Bharti karaweet Exam nahi gheta

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड