पॉलिटेक्निक प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर; अंतिम गुणवत्ता यादी २३ जूनला – Maharashtra Polytechnic Admission 2025

Maharashtra Polytechnic Admission 2025

तंत्रशिक्षण संचालनालयाने तंत्रनिकेतन पदविका प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. इच्छुक विद्यार्थी २० मे ते १६ जून २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतील. कागदपत्रे अपलोड करण्याची अंतिम तारीखही १६ जून आहे. तात्पुरती गुणवत्ता यादी १८ जून रोजी प्रसिद्ध होईल. अंतिम गुणवत्ता यादी २३ जून रोजी संकेतस्थळावर दिसेल. अधिक माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा. राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित आणि खाजगी विनाअनुदानित तंत्रनिकेतनांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रथम वर्षाच्या १० वी नंतरच्या पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने नुकतेच जाहीर केले आहे.

 

Maharashtra Polytechnic Admission 2025

Polytechnic admission 2025-26 Maharashtra : विद्यार्थ्यांना २० मेपासून १६ जून २०२५ पर्यंत https://poly25.dtemaharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. याच कालावधीत कागदपत्रांची स्कॅन प्रती अपलोड करून, ती पडताळणीसाठी सादर करता येणार आहेत. ही पडताळणी ऑनलाइन तसेच प्रत्यक्ष अशा दोन्ही पद्धतीने होणार आहे. प्रवेश अर्ज भरल्याची आणि कागदपत्र पडताळणीची अंतिम नोंदही १६ जूनपर्यंत करता येणार आहे. त्यानंतर १८ जून रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार असून, १९ ते २१ जून या कालावधीत विद्यार्थ्यांना आपली हरकत नोंदवण्याची संधी दिली जाणार आहे. अंतिम गुणवत्ता यादी २३ जून रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाइन नोंदणी व कागदपत्रे अपलोड – २० मे ते १६ जून
  • कागदपत्र पडताळणी व अर्जाची निश्चिती – २० मे ते १६ जून
  • तात्पुरती गुणवत्ता यादी – १८ जून
  • हरकती स्वीकारण्याचा कालावधी – १९ ते २१ जून
  • अंतिम गुणवत्ता यादी – २३ जून

 

विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन – DTE Maharashtra HelpLine 2025 – 20256 – प्रवेश प्रक्रियेत काही अडचणी आल्यास त्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने ७६६९१००२५७ / १८००३१३२१६४ हे हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. हे क्रमांक सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सुरू राहणार आहेत.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड