स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण घेऊन सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांना एमपीएससीच्या नव्या भरती जाहिरातीमुळे मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, गट-क पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मात्र, या जाहिरातीतील पात्रता निकषांमधून ‘कन्स्ट्रक्शन सुपरवायझर’ आणि ‘आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन’ हे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना वगळण्यात आल्याने त्यांची सरकारी नोकरीची संधी हिरावली गेल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे या पात्रता निकषांवरून उमेदवारांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळामार्फत या दोन्ही अभ्यासक्रमांचे नियमित प्रशिक्षण दिले जाते. मंडळाच्या अंतर्गत ‘कन्स्ट्रक्शन सुपरवायझर’ आणि ‘आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन’ हे अभ्यासक्रम चालवले जात असून, दरमहा सुमारे १० हजार विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांतून उत्तीर्ण होतात. याशिवाय, राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांशी (आयटीआय) संबंधित प्रशिक्षण व्यवस्थेतही या अभ्यासक्रमांना महत्त्वाचे स्थान आहे.
या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण पूर्णवेळ स्वरूपाचे असून, त्यातून उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी आपल्या शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर राज्य शासनाच्या विविध विभागांत स्थापत्य अभियांत्रिकी सहायक तसेच स्थापत्य अभियंता यांसारख्या पदांवर कार्यरत आहेत. त्यामुळे नव्या भरती प्रक्रियेतही या अभ्यासक्रमांना पूर्वीप्रमाणेच पात्रता मिळेल, अशी उमेदवारांची अपेक्षा होती. मात्र, एमपीएससीने पात्रता निकषांमध्ये बदल करून या दोन्ही अभ्यासक्रमांना वगळल्याने अनेक उमेदवारांची सरकारी नोकरीची संधी हुकल्याची भावना व्यक्त होत आहे.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















