JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

आयटी क्षेत्रात कंत्राटी भरतीला चौपट वेग; कुशल उमेदवारांना मोठी मागणी! Contractual IT Job

देशातील रोजगार बाजारपेठेत आयटी क्षेत्राने भरतीच्या बाबतीत आघाडी घेतल्याचे चित्र समोर आले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारतीय आयटी क्षेत्रातील नोकरभरतीत १०.१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. याउलट, इतर क्षेत्रांतील भरतीवाढीचा दर केवळ २.३ टक्के राहिला आहे. त्यामुळे इतर क्षेत्रांच्या तुलनेत आयटी क्षेत्रातील नोकरभरतीचा वेग चौपटपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘सीईएल एचआर’च्या ताज्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

आयटी क्षेत्रात नोकऱ्यांच्या संधी वाढत असतानाच कंपन्यांकडून आता विशेष तांत्रिक कौशल्य असलेल्या अनुभवी उमेदवारांना अधिक पसंती दिली जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग आणि सायबर सुरक्षेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे भरतीचे स्वरूपही बदलत आहे. ‘सीईएल एचआर’च्या अहवालानुसार, कंपन्या बदलत्या व्यावसायिक गरजा आणि तंत्रज्ञानातील प्रगती लक्षात घेऊन ठरावीक कालावधीसाठी तसेच प्रकल्पांच्या आवश्यकतेनुसार कुशल उमेदवारांची नियुक्ती करत आहेत.

अहवालानुसार, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगशी संबंधित कौशल्यांच्या मागणीत ८६.५ टक्के, तर सायबर सुरक्षा आणि डिजिटल ट्रस्ट क्षेत्रातील कौशल्यांच्या मागणीत ८१.८ टक्के वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, एजंटिक एआय इंजिनिअरच्या मागणीत तब्बल २६० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मात्र, या पदांसाठी योग्य उमेदवार शोधून नियुक्ती करण्यासाठी कंपन्यांना सरासरी १० ते १२ आठवड्यांचा कालावधी लागत आहे.

तांत्रिक क्षेत्रातील एकूण भरती मागणीपैकी जवळपास ८० टक्के मागणी अनुभवी व्यावसायिकांसाठी आहे. यामध्ये चार ते आठ वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना सर्वाधिक मागणी आहे. दुसरीकडे, सायबर सुरक्षा आणि एआय-आधारित इंजिनिअरिंग क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची कमतरता हे कंपन्यांसमोरील मोठे आव्हान असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
Contractual IT Job

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड