पुणे फेस्टिव्हलमध्ये विविध कार्यक्रमांची मेजवानी, अजित पवार यांच्या हस्ते १३ सप्टेंबरला उद्घाटन
Pune Festival Schedule time table 2024
Pune Festival अंतर्गत संगीत, नृत्य, मुशायरा, क्रीडा स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी ३६व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते १३ सप्टेंबर रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सायंकाळी साडेचार वाजता उद्घाटन होणार आहे. हा फेस्टिवल म्हणजे पुणेकरांसाठी मस्त विनामूल्य मेजवानी असणार आहे.
हि माहिती पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या पुणे विभागाच्या उपसंचालिका शमा पवार, डेक्कन मुस्लीम इन्स्टिट्यूट पुणेच्या अध्यक्षा आबेदा इनामदार, डॉ. सतीश देसाई या वेळी उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार छत्रपती शाहू महाराज, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद काँग्रेस गटनेते सतेज पाटील, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, इम्रान प्रतापगढी उपस्थित राहणार आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पुणे फेसिव्हलचे उद्घाटन कार्यक्रमात ज्येष्ठ सनईवादक तुकाराम दैठणकर आणि सहकाऱ्यांचे सनईवादन, ज्येष्ठ नृत्यगुरू शमा भाटे यांच्या ‘नादरूप’ संस्थेच्या १४ ते १८ कलाकार विद्यार्थिनींची ‘सेतू’ ही कथक व भरतनाट्यमचा मिलाफ असणारी गणेशवंदना, महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तिपीठांवर आधारित नृत्य सादरीकरण, संबळवादक गौरी वनारसे आणि राजेंद्र बडगे ग्रुपचे संबळवादन आणि हलगीवादन, नृत्यदिग्दर्शिका नृत्यांगना वृंदा साठे आणि कलाकार देवी-दैत्य यांच्यातील युद्ध सादरीकरण करणार आहेत. तसेच गुजराती लोकनृत्य ‘डांग’, गुजराती आदिवासी नृत्य, ‘भवई’ हे राजस्थान आणि गुजरात सीमेवरील लोकनृत्य यांच्या मिश्रणातून ‘डाकला’ या पारंपरिक गुजराती संगीतावर आधारित गरबा नृत्य, नागालँडचा पारंपरिक ‘बांबू डान्स’ हा आदिवासी नृत्याविष्कार, ‘सरहद’ या संस्थेच्या वाटचालीवर आधारित ‘द ग्लोरी ऑफ सरहद’ हा सांस्कृतिक कार्यक्रम, सिम्बायोसिसमध्ये शिकणाऱ्या २१ देशांतील विद्यार्थ्यांचे नृत्य सादरीकरण, ‘ऱ्हिदम ऑफ लावणी’ हे कार्यक्रम होणार आहेत.
गणेश कला क्रीडा रंगमंच येथे १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावरील ‘जाऊ देवाचिया गावा’ हे महानाट्य, रात्री आठ वाजता ‘ऑल इंडिया मुशायरा’ होणार आहे. देशाचे माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद आलम, खासदार इम्रान प्रतापगढी उपस्थित राहणार आहेत. १५ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता हास्यकल्लोळ ‘धम्माल महाराष्ट्राच्या विनोदवीरांची’ हा कार्यक्रम, १६ सप्टेंबर रोजी ‘मिस पुणे फेस्टिव्हल’(Miss Pune Festival 2024) स्पर्धा होणार आहे. सर्व कार्यक्रमांना विनामूल्य प्रवेश मिळणार आहे.
Comments are closed.