www.thane.nic.in online application form
Thane Municipal Corporation Online Apply: The Thane Municipal Corporation (TMC) has announced a significant recruitment drive for the year 2025, aiming to fill a substantial number of vacancies across Group C and Group D positions. This initiative seeks to hire for a total of 1773 posts in various departments, including administrative services, technical services, and public health. The online application process commenced on August 12, 2025, and will conclude on September 2, 2025. Interested candidates are advised to carefully review the eligibility criteria, which vary by post, and submit their applications through the official Thane Municipal Corporation website at thanecity.gov.in. To apply for Thane Municipal Corporation (TMC) recruitment 2025, follow these steps based on information provided in official notification.
ठाणे महानगरपालिकेतर्फे (TMC) २०२५ साली गट क आणि गट ड पदांसाठी एकूण १७७३ जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. प्रशासन, तांत्रिक सेवा आणि सार्वजनिक आरोग्य अशा विविध विभागांमध्ये ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी thanecity.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन १२ ऑगस्ट २०२५ ते २ सप्टेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित पदासाठी आवश्यक असलेले पात्रता निकष काळजीपूर्वक वाचणे महत्त्वाचे आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया : ठाणे महानगरपालिका भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘भरती’ विभागात जावे. तिथे ‘गट क आणि गट ड भरती २०२५’ या लिंकवर क्लिक करून अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. त्यानंतर पोर्टलवर नोंदणी करून ऑनलाइन अर्ज भरावा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. शुल्क ऑनलाइन भरावे लागेल (अनारक्षितसाठी ₹१००० आणि आरक्षितसाठी ₹९००, माजी सैनिकांना वगळून). शेवटी, सादर केलेल्या अर्जाची प्रिंट काढून घ्यावी…
Thane Mahanagarpalika Online Application Process
Thane Mahanagarpalika Saralseva Bharti Registration Process : अर्ज नोंदणी
१. ठाणे महानगरपालिकेच्याwww.thanecity.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन Apply Online या पर्यायावर क्लिक करा जे एक नवीन स्क्रिन उघडेल.
२. अर्ज नोंदणी करण्यासाठी नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ईमेल आयडी प्रविष्ठ करा. प्रणालीद्वारे तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रिनवर प्रदर्शित केला जाईल. उमेदवाराने तात्पुरतानोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवावा. तात्पुरतानोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शविणारा ई-मेल आणि लघुसंदेश देखील पाठविला जाईल.
३. जर उमेदवार एकाच वेळी अर्ज भरु शकत नसेल, तर तो सेव्ह आणि नेक्स्ट टॅब निवडून आधीच एंटर केलेला डेटा जतन करु शकतो. ऑनलाईन अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांना ऑनलाईन अर्जातील तपशीलांची पडताळणी करण्यासाठी सेव्ह आणि नेक्स्ट सुविधेचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे आणि आवश्यक असल्यास त्यात बदल करावा. उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि अंतिम सबमिशन करण्यापूर्वी ते बरोबर असल्याची खात्री करण्यासाठी तपशीलांची पडताळणी करुन घ्यावी.
४. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जातील तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि त्याची पडताळणी करावी, कारण पूर्ण नोंदणी बटणावर क्लिक केल्यानंतर कोणताही बदल शक्य होणार नाही / करणे शक्य होणार नाही.
५. उमेदवाराचे नाव किंवा त्याचे/तिचे वडील/पती इ. चे नाव अर्जामध्ये बरोबर लिहिलेले असावे जसे ते प्रमाणपत्रे / गुणपत्रिका/ओळख पुराव्यामध्ये दिसते. कोणताही बदल/तफावत आढळल्यास उमेदवारी अपात्र ठरु शकते.
६. तुमचे तपशील सत्यापित करा आणि जतन करा आणि पुढील बटणावर क्लिक करुन तुमचा अर्ज जतन करा.
७. फोटो आणि स्वाक्षरी स्कॅनिंग आणि अपलोड करण्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये दिलेल्या वैशिष्ट्यानूसार उमेदवाराने फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यवाही करावी.
८. नोंदणीपूर्वी संपूर्ण अर्जाचे पूर्वावलोकन आणि पडताळणी करण्यासाठी पूर्वावलोकन टॅबवर क्लिक करा.
९. आवश्यक असल्यास तपशील सुधारावा आणि छायाचित्रे, स्वाक्षरी आणि इतर तपशील बरोबर असल्याची पडताळणी आणि खात्री केल्यानंतरच नोंदणी पूर्ण वर क्लिक करा.
१०. पेमेंट टॅबवर क्लिक करा आणि पेमेंटसाठी पुढे जावे व सबमिट बटणावर क्लिक करावे.
परीक्षा शुल्क भरणेः-
ऑनलाईन मोड:-
१. डेबिट कार्ड (Rupay/Visa/Master Card/Maestro), क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, IMPS, कॅश कार्ड्स / मोबाईल वॉलेट वापरुन पेमेंट केले जाऊ शकते.
२. व्यवहार यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर एक ई-पावती तयार होईल.
३. ई-पावती
ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याची सर्वसाधारण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
१. प्रोफाईल निर्मिती / प्रोफाईल अद्ययावत करणे.
२. अर्ज सादरीकरण.
३. शुल्क भरणा.

Thane Mahanagarpalika Saralseva Bharti Registration Process :