Mumbai Police Bharti Question Paper 2023 – मुंबई पोलीस चालक पेपर 14 मे रोजीचा स्पष्टीकरणासह विश्लेषण PDF डाउनलोड करा

Mumbai Police Driver Bharti Question Paper 2023 PDF

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Mumbai Police Bharti Question Paper 2023 -Mumbai Police Driver Exam was conducted on 14th May 2023. Mumbai Police Chalak Question Paper PDF is available for download. Candidates can download Mumbai Police Bharti Question Pdf From below Link :

मुंबई पोलीस भरती 2023 – मुंबई पोलीस चालक परीक्षा 14 मे 2023 रोजी घेण्यात आली. मुंबई पोलीस चालक प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उमेदवार खालील लिंकवरून मुंबई पोलीस चालक भरती प्रश्न पीडीएफ डाउनलोड करू शकतात:

Download Mumbai Police Driver Question Paper with Answer 2023


Mumbai Police Bharti Question Paper 2023 PDF

Mumbai Police Bharti Question Paper 2023 -Mumbai Police Constable Exam was conducted on 7th May 2023. Mumbai Police Constable Question Paper PDF is available for download. Candidates can download Mumbai Police Bharti Question Pdf From below Link :

मुंबई पोलीस भरती 2023 – मुंबई पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा 7 मे 2023 रोजी घेण्यात आली. मुंबई पोलीस कॉन्स्टेबल प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उमेदवार खालील लिंकवरून मुंबई पोलीस भरती प्रश्न पीडीएफ डाउनलोड करू शकतात:

Police Bharti Answer Key: मुंबई पोलीस शिपाई भरती 2023 उत्तरतालिका जाहीर

Download Mumbai Police Shipai Question Paper with Answer 2023


Mumbai Police Bharti Question Paper 2023

Mumbai Police Bharti Question Paper 2023:  Mumbai Police Bharti exam will be conducted soon. As Per last years trend There will be questions based On Mumbai City and its Speciality in Mumbai Police Exam 2023. So to boost Your GK and Other Subject About Mumbai Police Here are some of the important questions for today. Solve this Mumbai Police Bharti Quiz Question which includes 100 Questions and Check your score. This Test is based On Paper held on 26th March 2023 and 2nd April 2023 for various districts. Students who are appearing for Mumbai Police Bharti Must solve this Mumbai Police Bharti Question Paper 2023

11551
Created on By MahaBharti Exam Team
पोलीस भरतीसाठी लागू असलेले शासन निर्णय

Mumbai Police Bharti Question Paper 2023

पोलीस भरती साठी अपेक्षित प्रश्नसंच २६ मार्च व २ एप्रिल ला झालेल्या पेपर वर आधारित !!

1 / 100

पुढील संख्यामालिकेतील रिकाम्या जागा पूर्ण करा.

4 6 8 9 6_9 2 8_2 3 9 2_7

2 / 100

एका संख्येचा शे. 2 म्हणजे 12, तर ती संख्या कोणती?

3 / 100

सर्वात मोठे देश (क्षेत्रफळात) चढत्या क्रमाने लावा.

अ) ब्राझील ब) भारत क) चीन ड) अर्जेंटिना  इ) रशिया

4 / 100

25½÷25=किती?

5 / 100

एका 8 सेंमी त्रिज्या असलेल्या शिशाच्या गोळ्यास वितळवून 1 सेंमी त्रिज्या असलेले लहान लहान गोल तयार केल्यास, असे किती गोल तयार होतील?

6 / 100

एकवचनाचे अनेकवचन करा.

तू परीक्षेची तारीख ठरवायचीस.

7 / 100

रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा:

2, 6, 33, 49, 174, 210,_____

8 / 100

महाराष्ट्रातील भूदृश्यांच्या विकासात खालीलपैकी______या हवामान घटकाची भूमिका महत्वाची आहे?

9 / 100

द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण?

10 / 100

खालील दोन विधाने व दोन अनुमाने दिली आहेत तर त्याखालील योग्य पर्याय निवडा.

विधाने: 1) सर्व सिंह वाघ आहेत.

2) काही सिंह शिकार करतात.

अनुमाने : A) सर्व सिंह वाघ आहेत.

B) सर्व वाघ शिकार करतात.

11 / 100

एक वस्तू 20 रुपयांना खरेदी केली. कोणत्या किंमतीस ती विकली असता शेकडा 20 नफा होईल?

12 / 100

गटातील विसंगत संख्या कोणती ते ओळखा.

97, 89, 85, 79, 73, 71, 67

13 / 100

दिलेल्या शब्दगटातून योग्य समानार्थी शब्द निवडा.

दागिना

14 / 100

6 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद राज्य करील असे कोणत्या कलमात म्हटले आहे?

15 / 100

खालीलपैकी कोणती संघननाची रूपे नाहीत?

16 / 100

हिम्मतरावांनी 10% तोटा सहन करून एक फ्रिज 9090 रुपयांस विकले, तर त्या फ्रिज खरेदी किंमत किती होती?

17 / 100

eeefffgggghhhhiiiii?

या अक्षरांच्या लयबद्ध मांडणीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणत्या अक्षरांचा समूह येईल?

18 / 100

पद्मविभूषण पुरस्कार - 2022 बाबत योग्य जोड्या लावा.

व्यक्तीचे नाव                                    क्षेत्र

अ) प्रभा अत्रे                            I) साहित्य-शिक्षण

ब) राधेश्याम खेमका                 II) लोककल्याण

क) जनरल बिपिन रावत           III) कला

ड) कल्याण सिंह                      IV) नागरी सेवा

19 / 100

पुढील नामाला अयोग्य विशेषणाचा पर्याय निवडा.

भामटा

20 / 100

ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात आणि उत्पादनाचे कार्य आणि उत्पादनाचे विभाजन बाजार यंत्रणे करवी होते अशा अर्थव्यवस्थेला खालीलपैकी कोणती अर्थव्यवस्था म्हणतात?

21 / 100

दिलेल्या धातूचे शक्य क्रियापद ओळखा.

बोलणे

22 / 100

बॉम्बे स्टोक एक्सचेंज मुख्यालय?

23 / 100

30 22

24 / 100

एक कार 2½ तासासाठी प्रति तास 50 मैल या सरासरी वेगाने प्रवास करते आणि मग 1½ तासासाठी प्रति तास 70 मैलांच्या वेगाने प्रवास करते. 4 तासांमध्ये कारने किती अंतर कापले?

25 / 100

ब्रिटिश कायमधारा पद्धती भारताच्या इतर प्रदेशात वाढविली नाही कारण:

अ) कायमधारा पद्धतीत वसाहतीक सत्तेला वाढलेल्या उत्पन्नानुसार आपला हिस्सा वाढविता येत नसे.

ब) ब्रिटिश अधिकारी डेव्हिड रिकार्डोच्या विचारांनी प्रभावित झाले होते आणि त्यांना ते विचार अंमलात आणायचे होते.

क) कायमधारा पद्धतीत अनेक कमतरता होत्या.

26 / 100

एका संख्येच्या 25% मध्ये 64 मिळवल्यास त्या संख्येचे 50% मिळवतात, तर ती संख्या खालीलपैकी कोणती?

27 / 100

1 ते 100 मधील 7 ने निःशेष भाग जाणाऱ्या संख्यांची संख्या किती?

28 / 100

A, D, G, J, M,?

29 / 100

सहा व्यक्तींचे सरासरी वय 39 वर्षे आहे. नवीन व्यक्ती आल्याने सरासरी 1 ने कमी झाली, तर नवीन व्यक्तीचे वय किती?

30 / 100

सर्वसाधारणपणे साथीच्या रोगांपैकी_____% रोग हे दुषित पाण्यामुळे होतात?

31 / 100

कोणत्या योजनेनुसार संविधान सभेची /घटना समितीची स्थापना करण्यात आली होती?

32 / 100

विशिष्ट संकेतांमध्ये, FIRE ला QHEE असे लिहिले जाते आणि FOVE ला UNEE असे लिहिले, जाते, तर MOVE शब्दासाठीचा संकेत काय असेल?

33 / 100

29.791 या संख्येचे घनमूळ काढा.

34 / 100

पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.

तू रोज व्यायाम कर.

35 / 100

हिंदी व मराठी चित्रपट केंद्र?

36 / 100

पुढे दिलेल्या ब्रिटिश व्यापारी केंद्राची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा. पर्यायी उत्तरातून योग्य पर्याय निवडा?

अ) कलकत्ता ब) सुरत क) मद्रास ड) बॉम्बे

37 / 100

मुंबई शहराचे नामकरण मुंबई कसे झाले?

38 / 100

जर  5 × 7 = 47
8 × 9 = 89
6 × 8 = 62
तर  11 × 12 = ?

39 / 100

रणजितसिंहाला लाहोरवर आपली सत्ता प्रस्थापित करण्यास झमानशाहने संमती का दिली?

40 / 100

एका रकमेची 2 वर्षाची रास 5800 रुपये व 5 वर्षाची रास 7000 रुपये आहे, तर ती रक्कम व सरळव्याज दर काढा.

41 / 100

देशातील पहिली रेल्वे कोठून कोठे धावली?

42 / 100

हे प्रश्न हे खालील अक्षर/चिन्ह/संख्येच्या मांडणीवर आधारित आहेत.प्रश्नाचे उत्तर द्या.

A 8 B 6 # 7 H U % 3 $ F V R 2 1 @ ↑ V 1 W E 9 © L 5

उजव्या टोकाकडून पंधराव्याच्या उजवीकडून सातवे खालीलपैकी कोण आहे?

43 / 100

जर आपण (20-5×2+3-18÷9) ला बरोबर सोडवू, तर आपल्याला_____हे उत्तर मिळते.

44 / 100

दोन संख्यांचा ला.सा.वी. 2310 आहे आणि म.सा.वी. 30 आहे. जर एक संख्या 210 असेल तर दुसरी संख्या काय असेल?

45 / 100

खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा:

18, 36, 144, 864, 6912, 691020

46 / 100

एप्रिल 2022 मध्ये_____केंद्रिय मंत्रालयातर्फे 'आझादी की अमृत कहानी' ही एक छोटी व्हिडीओ मालिका प्रकाशित केली आहे.

47 / 100

रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.

'निशी', 'सवे' ही_____अव्ययांची रूपे आहेत.

48 / 100

49 / 100

शेजारच्या आकृतीत चौकोन किती आहेत?

50 / 100

एक बोट प्रवाहाच्या दिशेने 17 km/hr. या वेगाने जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 11 hm/hr. तर बोटेचा संथ पाण्यातील व प्रवाहाचा वेग काढा.

51 / 100

परीक्षेमध्ये प्रत्येकी 100 गुणांचे गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्राचे 3 विषय आहे. गणेशाला गणित आणि विज्ञानामध्ये 60% आणि 80% गुण मिळाले. त्याला एकूण 70% गुण मिळाले. सामाजिक शास्त्रांमधील त्याच्या गुणांची टक्केवारी किती आहे.

52 / 100

ऑर्थर रोड कारागृह जेल कोठे आहे?

53 / 100

तांब्याच्या तारेचे रोधकता (Resistivity) 1.7×10-⁸ Ωm असताना या तारेचा रोध (Resistance) सांगा, जर त्याची लांबी 20Km व त्याचे क्षेत्रफळ 0.2×10-⁵m² इतके आहे?

54 / 100

दिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा.

प्रवाह - खोल X _____

55 / 100

दौलतरावांनी 9 हेक्टर जमिनीतून गव्हाचे सरासरी हेक्टरी उत्पन्न 36 क्विंटल काढले. पहिल्या 7 हेक्टरमधील गव्हाचे उत्पन्न 32 क्विंटल पडले. उरलेल्या दोन हेक्टर क्षेत्रांमधून सारखेच उत्पन्न निघाले, तर त्यांपैकी प्रत्येक हेक्टर क्षेत्रातून किती क्विंटल उत्पन्न निघाले?

56 / 100

भारतीय संविधानात कोणत्या कलमानूसार जिल्हा नियोजन समितीची तरतूद केली आहे?

57 / 100

36 किमी प्रति तास वेगाने धावणारी ट्रेन एका खांबाला 20 सेकंदात ओलांडते, तर त्या ट्रेनची लांबी खालीलपैकी कोणती?

58 / 100

दिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा.

अर्थ - ग्राह्य X ______

59 / 100

खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे?

60 / 100

आरंभकालीन राष्ट्रवाद्यांनी 20 व्या शतकातील स्वातंत्र्यचळवळीसाठी भक्कम पाय घातला?

61 / 100

मुंबईत असलेल्या प्रसिद्ध मशिदीच्या, त्या असलेल्या क्षेत्राप्रमाणे जोड्या लावा:

अ) झकेरिया मशीद                i) मशीद बंदर

ब) सातमाड मशीद                ii) माहीम

क) जुम्मा मशीद                  iii) मांडवी

ड) जुनी मशीद                    iv) शेख मेनन स्ट्रीट

62 / 100

खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेल्या आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा.

3, 9 ,23 ,99, 479, 2881, 20159

63 / 100

एक विक्रेता वस्तूची किंमत खरेदी किंमतीच्या 20% जास्त चिन्हांकित करतो. तो ग्राहकाला सलग 20% आणि 25% ची सूट देतो. परिणामी त्याला 1400 रुपयांचा तोटा होतो. त्याने ग्राहकांना किती किंमतीमध्ये वस्तूची विक्री करावी?

64 / 100

हँगिंग गार्डनला कोणत्या नावाने ओळखतात?

65 / 100

मुंबईच्या टेलिफोन खात्यात नवे मशीन आल्याने 228 मुलींची नौकरी गेली. याची दखल घेत भांडवलशाही व्यवस्थेत भांडवलदार विज्ञाचा व तंत्रज्ञानाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करतात. नवी मशीन ही कामगार कामगार चळवळीपुढील मोठी समस्या आहे असे 'सोशॅलिस्ट' मध्ये कोणी लिहिले?

66 / 100

3, 7, 12, 18,?

67 / 100

68 / 100

इंग्रजी शासनाने 1840 मध्ये 'जस्टीस ऑफ द पीस' म्हणून कोणाची नेमणूक केली होती?

69 / 100

खालील विधानांची सत्यता तपास आणि योग्य पर्याय निवडा.

विधान अ) भारताचा काही भू-भाग उत्तर गोलार्धात असून काही भू-भाग दक्षिण गोलार्धात आहे.

विधान ब) भारताचा दक्षिणोत्तर विस्तार सुमारे 7500 कि.मी. पेक्षा ही जास्त आहे.

70 / 100

दिलेल्या धातूचे योग्य रूप निवडा.

परीक्षेत मला पहिला वर्ग (मिळणे). (विध्यर्थ)

71 / 100

250 मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला 72 कि.मी./तास वेगाने गेल्यास 30 सेकंदात ओलांडते, तर बोगद्याची लांबी किती?

72 / 100

73 / 100

छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय कोठे आहे?

74 / 100

75 / 100

76 / 100

200 रुपये छापील किंमतीची खुर्ची शे. 25 टक्के सूट देऊन विकली तरीही दुकानदाराला शेकडा 50 टक्के नफा झाला तर त्या खुर्चीची मूळ किंमत काय?

77 / 100

जोडशब्द नसलेल्या शब्दाचा पर्याय निवडा.

78 / 100

वरील आकृतीची घडी घातल्यास खालीलपैकी कोणता घन तयार होऊ शकतो?

79 / 100

IIT स्थापना कधी झाली?

80 / 100

1 जानेवारी, 2008 रोजी मंगळवार होता. 1 जानेवारी 2009 रोजी आठवड्याचा कोणता दिवस येईल?

81 / 100

मुंबई जिल्ह्याच्या स्थापनेवेळी मुख्यमंत्री कोण होते?

82 / 100

मुंबई हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो?

83 / 100

'BAFTA Award - 2022' याबाबत सत्य विधान/ने ओळखा.

अ) 'BAFTA Award' हा ब्राझील चा सर्वात प्रसिद्ध चित्रपट पुरस्कार आहे.

ब) 'BAFTA Award' या पुरस्काराची सुरुवात 1975 सामी करण्यात आली आहे.

क) BAFTA Award 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून 'बिट्वीन टू डान्स' या चित्रपटाला देण्यात आला आहे.

(ड) BAFTA Award 2022 चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार 'जोआना स्कॅनलन' यांना दिला आहे.

84 / 100

विधान : "वैज्ञानिकांच्या मते आपल्या आकाशगंगे व्यतीरिक्त आणखी आकाशगंगा विश्वात अस्तित्वात आहेत. या नवीन आकाशगंगेमध्ये पृथ्वीसारखे जीवांचे अस्तित्व असणारे ग्रह आहेत".

गृहतिक : (अ) पृथ्वी आणि पृथ्वीसारख्या ग्रहांवर जीवांचे अस्तित्व आहे.

(ब) विश्वामध्ये फक्त पृथ्वीसारख्याच ग्रहावर जीवांचे अस्तित्व आहे.

85 / 100

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?

86 / 100

केंद्रिय अर्थसंकल्प - 2022-23 बाबत अयोग्य विधान/ने ओळखा.

अ) 5 ते 7.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 8% कर निश्चित केला आहे.

ब) 7.5 ते 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 10% कर निश्चित केला आहे.

क) 10 लाख ते 12 लाख 50 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 15% कर निश्चित केला आहे.

ड) 15 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना 30% प्राप्तिकर असणार आहे.

87 / 100

एका संख्येचे 0.12% काढण्यासाठी तिला कीतीने गुणावे लागेल?

88 / 100

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकासामध्ये खालीलपैकी कोणत्या समितीने त्रि-स्तरीय ग्रामप्रशासनाची शिफारस केली होती?

89 / 100

मुंबई हे शहर इंग्रजांनी पोर्तुंगिजांकडून कधी ताब्यात घेतले?

90 / 100

भारतातील पहिली कापड गिरणी मुंबईत कधी सुरु झाली?

91 / 100

ब्राहुमुंबईतून मुंबई व नवी मुंबई हे दोन जिल्हे कधी निर्माण झाले?

92 / 100

मुंबईचा सिंह कोणाला म्हणतात?

93 / 100

वैज्ञानिक शोधनिबंधांच्या प्रकाशनात जागतिकस्तरावर भारत कितव्या क्रमांकावर आहे?

94 / 100

खालीलपैकी चुकीची तारीख कोणती?

95 / 100

मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे_____येथील होमरूलचे सक्रिय कार्यकर्ते होते.

96 / 100

15 लिटर मिश्रणात 40 टक्के अल्कोहोल आहे, तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता, अल्कोहोलचे प्रमाण 25 टक्के होईल?

97 / 100

मिसेस वर्ल्ड 2022 चे विजेतेपद कोणत्या भारतीय युवतीने पटकावले?

98 / 100

प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय कोठे आहे?

99 / 100

टेनिसपटू 'अँश्ले बार्टी' हिने 23 मार्च 2022 रोजी वयाच्या 25 व्या वर्षी टेनिस मधून निवृत्तीचा निर्णय घेतला असून त्या कोणत्या देशाच्या आहेत?

100 / 100

रमेश, सुरेश आणि देवेश यांच्या वजनाची सरासरी 50 किग्रॅ आहे. रमेशचे वजन 52 किग्रॅ आहे. सुरेशचे वजन 56 किग्रॅ आहे, तर देवेशचे वजन किती?

Your score is

The average score is 22%

0%

Mumbai Police Bharti Quiz Question– GK Quiz

1 thought on “Mumbai Police Bharti Question Paper 2023 – मुंबई पोलीस चालक पेपर 14 मे रोजीचा स्पष्टीकरणासह विश्लेषण PDF डाउनलोड करा”

Leave a Comment


Available for Amazon Prime