How To Fill Talathi Bharti Online Application 2025
तलाठी भरती ऑनलाइन अर्ज 2025 कसा भरायचा याची माहिती
How To Fill Talathi Bharti Online Application 2025 – A well Known Exam in Maharashtra State is Talathi For which Notification from 2019 has not been published, but Now there is So Many Vacancies in all district For Talathi in Mahsul Department Of Maharashtra State. The State Government is Planning to fill those vacant Position for this Talathi Bharti Notification will be published in coming days. As soon as Notification Out, Talathi Recruitment Online Registartion will be begin. Many candidates who are new may or May not Know About How To Apply For Talathi Exam 2025. To help them Out, we are Giving You step By Step Procedure for How To Fill Talathi Bharti Online Application 2025. So go through this and fill Your Talathi Form without any Mistake :
⏰Maharashtra Talathi Bharti 2022 Syllabus Download PDF – 4122 जागांसाठी भरती
How To Prepare For Talathi Bharti Exam – तलाठी पदांच्या परीक्षेची तयारी कशी करावी ?
⏰Talathi Bharti Question Papers Download PDF [From 2013 To 2019 Paper PDF]
MAHA Talathi Recruitment Online Application Form New Updates
महाराष्ट्र राज्यातील तलाठी ही एक सुप्रसिद्ध परीक्षा आहे ज्यासाठी 2019 नंतर अधिसूचना प्रकाशित झालेली नाही, परंतु आता महाराष्ट्र राज्याच्या महसुल विभागात तलाठ्यासाठी सर्व जिल्ह्यात अनेक जागा रिक्त आहेत. या तलाठी भरतीसाठीची रिक्त पदे भरण्याचे राज्य सरकारचे नियोजन आहे, अधिसूचना येत्या काही दिवसांत प्रसिद्ध केली जाईल. अधिसूचना निघताच तलाठी भरतीची ऑनलाइन नोंदणी सुरू होईल. अनेक उमेदवार जे नवीन आहेत किंवा त्यांना तलाठी परीक्षा 2023 साठी अर्ज कसा करायचा याबद्दल माहिती नसू शकते. त्यांना मदत करण्यासाठी आम्ही तुम्हाला तलाठी भरती ऑनलाइन अर्ज 2025 कसा भरायचा याची चरण-दर-चरण प्रक्रिया देत आहोत. याद्वारे जा आणि तुमचा तलाठी फॉर्म कोणतीही चूक न करता भरा :
ज्यांच्या कडे जात वैधता प्रमाणपत्र (Cast Validity) नाही ते जॉईन झाल्यानंतर 6 महिन्यात देऊ शकता .
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण ४६२५ पदांच्या सरळसेवा भरती करीता – जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून दि. १७ ऑगस्ट २०२३ ते दि. १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्रतील एकुण ३६ जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (Computer Based Test) परिक्षा घेण्यात येईल.
तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:
Note : Students this Process is taken form Talathi 2019 Application. But it will be the same this year also. We will Publish the Official Online Application Process Details As soon as the advertisement is Out. You can refer this data about All Application Processes:
Talathi Bharti MOCK Test AS PER IBPS Pattern
सर्वसाधारण पण महत्त्वाचे :
- सदर अर्ज फक्त ऑनलाइन प्रणालीद्वारे स्वीकारला जाणार आहे.
- उमेदवार फक्त एकाच जिल्ह्यासाठी अर्ज सादर करता येईल. वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी किंवा एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास असे अर्ज अपात्र ठरवण्यात येतील.
- शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरच उमेदवार अर्ज सादर करू शकतील.
- अर्ज सादर केल्यानंतर दिलेल्या वेळेत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अर्ज भरण्याची व परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख लक्षात घेऊन उमेदवाराने दिलेय वेळेत अर्ज आणि शुल्क भाराने बंधनकारक राहील.
जिल्हा केंद्र निवडताना :
- प्रस्तुत परीक्षेसाठी विविध केंद्रांचा तपशील http://mahabhumi.gov.in वर परीक्षा योजना/पद्धती या सदरामध्ये उपलब्ध आहे.
- अर्ज सादर करताना जिल्हा (परीक्षा) केंद्राची निवड करणे आवश्यक आहे.
- जिल्हा परीक्षा केंद्र बदलाची विनंती कोणत्याही परिस्थितीत किंवा कारणास्तव मान्य केली जाणार नाही.
Important Documents To Be Uploded During Talathi Exam Form 2023
विहित कागदपत्रे / प्रमाणपत्रे संलग्न (Upload) करणे:- एक) प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने परीक्षेकरिता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे PDF फाईल • फॉरमॅट मध्ये संलग्न (Upload) करावीत.
दोन) विविध सामाजिक व समांतर आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर (Check eligibility) उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे / प्रमाणपत्रे (लागू असलेली) संलग्न (Upload) करणे अनिवार्य आहेविहित कागदपत्रे / प्रमाणपत्रे संलग्न (Upload) करणे:- एक) प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने परीक्षेकरिता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे PDF फाईल • फॉरमॅट मध्ये संलग्न (Upload) करावीत.
दोन) विविध सामाजिक व समांतर आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर (Check eligibility) उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे / प्रमाणपत्रे (लागू असलेली) संलग्न (Upload) करणे अनिवार्य आहे
आवश्यक कागदपत्रे :
- उमेदवाराने प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने परीक्षेकरिता अर्ज सादर करताना उमेदवाराने संबंधित कागदपत्र आणि दाखले पीडीएफ (PDF) स्वरुपात अपलोड करणे अत्यावश्यक आहे.
- उमेदवाराने अर्जातील नावाचा पुरावा म्हणून (एसएससी किंवा तस्यम) गुणपत्रिका सादर करणे गरजेचे आहे.
- वयाचा आणि शैक्षणिक पात्रतेचा पुरावा.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा.
- अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलेअर (NCL) प्रमाणपत्र.
- पात्र दिव्यांग व्यक्ती/माजी सैनिक/खेलाडू/अनाथ/प्रकल्प अथवा भूकंपग्रस्त/ अंशकालीन पदवीधर/ नावात बादल झाला असल्याचा पुरावा.
- वरील प्रमाणपत्र शासनाच्या विहित संकेतस्थळावर सादर केल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही.
सविस्तर सूचना
एक) फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील. दोन अर्ज ) उमेदवारास फक्त एकाच जिल्हयासाठीस अर्ज सादर करता येईल. वेगवेगळया जिल्हयात वेगवेगळे अर्ज सादर करता येणार नाहीत. एकापेक्षा जास्त जिल्हयामध्ये अर्ज सादर केल्यास असे अर्ज अपात्र ठरविण्यात येतील. तथापि, एखादया उमेदवाराने एकाच जिल्हयात एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केला असल्यास त्यापैकी अंतिम अर्ज सादर केला असेल तोच अर्ज ग्राहय धरण्यात येईल. तीन अर्ज सादर करण्याकरिता संकेतस्थळ :- https://mahabhumi.gov.in चार) अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://mahabhumi.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पाच सहा) अर्ज अर्ज सादर केल्यानंतर भरण्याची विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही. व परिक्षाशुल्क भरण्याची अंतिम तारिख संगणकामार्फत निश्चित केली असल्याने पेमेंटगेटवे दिलेल्या तारखेला व वेळेला बंद होणार आहे. त्यामुळे परिक्षार्थी उमेदवारांनी मुदतीतच अर्ज व परिक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.
परीक्षा शुल्क :
- तलाठी-पेसा क्षेत्राबाहेरील खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये तर, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अशा राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
- तलाठी-पेसा क्षेत्रातील राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
- माजी सैनिकांना कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही.
- अर्ज सादरीकरणाचे टप्पे पूर्ण झाल्यावर उपलब्ध होणाऱ्या ‘सबमिट’ बटनावर क्लिक केल्यानंतर ‘पे फी (Pay Fee) वर क्लिक करून अर्ज पूर्ण करायचा आहे.
- परीक्षा शुल्क हे संपूर्णतः Non-Refundable आहे.
How To Select District For Talathi Exam Form 2023
जिल्हा केंद्र निवड :-
१०.१.१ प्रस्तुत परीक्षेकरीता विविध जिल्हा (परीक्षा) केंद्राचा तपशील https://mahabhumi.gov.in संकेतस्थळावरील सदर परीक्षेच्या परीक्षा योजना / पध्दती या सदरामध्ये उपलब्ध आहे.
१०.४.२ अर्ज सादर करताना जिल्हा (परीक्षा) केंद्राची निवड करणे आवश्यक आहे.
१०.४.३ जिल्हा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही.
१०. ४.४ जिल्हा केंद्र निवडीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास उमेदवाराने अर्जामध्ये दिलेल्या कायमस्वरुपी रहिवास पत्याचे आधारे संबंधित महसूली मुख्यालयाच्या जिल्हाकेंद्रावर किंवा नजिकच्या जिल्हाकेंद्रावर प्रवेशपत्र देण्यात येईल. याबाबत शासनाचे त्या त्या वेळचे धोरण व निर्णय अंतिम राहील.
Talathi Bharti 2025 Apply online
१) उमेदवाराला दिलेल्या संकेतस्थळावर लॉग-इन करावे लागेल. उमेदवाराने आपल्या उजव्या बाजूला असलेल्या ‘सूचना या पर्यायावर क्लिक करावे. तिथून उमेदवाराला थेट नोंदणीच्या पोर्टलवर नेले जाईल. पहिल्यांदाच नोंदणी केली जात असल्यास उमेदवाराने नोंदणीच्या पर्यायावर क्लिक करून यूजर नेम, पासवर्ड आणि इमेल आयडी टाकावा. उमेदवाराला त्यानंतर त्याच्या/तिच्या प्रमाणित इमेल आयडीवर सक्रीयतेची लिंक मिळेल जी त्यांच्या साइनअपशी संबंधित असेल. उमेदवाराने त्याचे/तिचे खाते सक्रीय करण्यासाठी त्याच्या/तिच्या इमेल आयडीवर मिळालेल्या सक्रीयतेच्या लिंकवर क्लिक करावे. (Activation लिंक ही 2 दिवसांकरिता activate असेल.) उमेदवाराने त्याची/तिची लॉगइनची माहिती गोपनीय ठेवावी. एकदा खाते सक्रीय झाले की, उमेदवाराला त्यांच्या नोंदणी पोर्टलचे युजरनेम आणि पासवर्ड वापरून केव्हाही लॉग ऑन होता येईल.
Important Instrcution For PESA talathi Online Application form 2025
सर्वसाधारण सूचना :-
एक ) अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.
(दोन) अर्ज सादर करण्याकरिता संकेतस्थळ :- https://mahabhumi.gov.in
तीन ) अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://mahabhumi.gov.in तसेच सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांचे अधिकृत या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
चार) आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
८. १ जिल्हा केंद्र निवड :-
८.१.१ प्रस्तृत परीक्षेकरीता विविध जिल्हा (परीक्षा) केंद्राचा तपशील https://mahabhumi.gov.in संकेतस्थळावरील सदर परीक्षेच्या- – परीक्षी योजना/ पध्दती या सदरामध्ये उपलब्ध आहे.
८.४.२ अर्ज सादर करतानाचा जिल्हा (परीक्षा) केंद्राची निवड करणे आवश्यक आहे.
८.४.३ जिल्हा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही.
८. ४.४ जिल्हा केंद्र निवडीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास उमेदवाराने अर्जामध्ये दिलेल्या कायमस्वरुपी रहिवासाच्या पत्याचे आधारे संबंधित महसूली मुख्यालयाच्या जिल्हाकेंद्रावर किंवा नजिकच्या जिल्हाकेंद्रावर प्रवेश देण्यात येईल. याबाबत शासनाचे त्या त्या वेळचे धोरण व निर्णय अंतिम मानन्यात येईल.
Talathi Bharti Online Registartion Process 2025
टीप: USERNAME आणि PASSWORD जतन करण्याची जबाबदारी उमेदवाराची असेल.
२) उमेदवाराचे नाव, वडीलांचे, पतीचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, जन्मदिनांक, भ्रमणध्वनी क्रमांक, छायाचित्र, स्वाक्षरी ही मुलभूत माहिती आहे जी उमेदवाराला सविस्तर द्यावी लागेल.
३) छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करण्यासंबंधी माहिती कृपया उंची आणि रुंदी प्रत्येकी २०० pixel असलेले छायाचित्र स्कॅन करुन अपलोड करा आणि अर्जामध्ये अपलोड करा. प्रतिमेची उंची ६० पिक्सल आणि रुंदी १४० पिक्सल असावी. प्रतिमेचे आकारमान ३ KB ते ५० KB च्या दरम्यान असावे.
(टिप:- उमेदवाराने अलीकडील छायाचित्र (फोटोग्राफ) अपलोड करणे आवश्यक आहे.)
४) पत्ता टाकण्यासाठी उमेदवाराने आपल्या पत्त्याचा प्रकार निश्चित करावा. उदा. कायमस्वरुपी पत्ता, तात्पुरता पत्ता किंवा दोन्ही आणि त्यानुसार आपले गाव, पोस्ट ऑफिस, राज्य, जिल्हा, पिन कोड इ. सहित माहिती भरावी.
५) त्यानंतर उमेदवाराने अतिरिक्त माहितीच्या पर्यायावर क्लिक करावे आणि आपल्या जात प्रवर्गाबद्दल माहिती भरावी. उमेदवाराकडे जात प्रमाणपत्र असल्यास त्याबद्दल विचारणा केली जाईल. असल्यास ड्रॉपडाऊन मधून त्याने / तिने आपला जात प्रवर्ग निवडावा. उमेदवार जर ST प्रवर्गात मोडत असेल तर त्यास तो ST-PESA प्रवर्गामध्ये अर्ज करू इच्छितो का नाही | याची निवड करावी लागेल. उमेदवार हा एका वेळी फक्त एका जिल्हासाठी अर्ज करू शकतो. जर आपण ST-PESA प्रवर्गातून अर्ज करत असाल तर आपण फक्त आपल्या ST-PESA जिल्हाच्या विभागासाठी | अर्ज करू शकता दुसऱ्या कुठल्याही विभागाकरिता ST-PESA मधून अर्ज करू शकत नाही. जर एका | उमेदवाराने एकापेक्षा अधिक अर्ज केलेलं आहेत असे आढळून आल्यास त्याचा कालक्रमानुसार पहिला अर्ज ग्राह्य धरण्यात येईल.
६) उमेदवाराने तलाठी या पदाकरिता अर्ज करत असताना त्याला ज्या जिल्ह्याच्या पदाकरिता अर्ज करावयाचा आहे तो जिल्हा काळजीपूर्वक निवडणे गरजेचे आहे. (इथे निवडत असलेला जिल्हा आणि तुम्ही तुमच्या | पत्त्यामध्ये निवडत असलेला जिल्हा यांचा कुठलाही संबंध नाही.
उमेदवाराने खाली नमूद केलेल्या फील्ड करीत जिल्ह्याची निवड करावी.
आपण अर्ज करू इच्छित असलेला जिल्हा निवडा.
आपण अर्ज सबमिट केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव या फील्ड मध्ये बदल केला जाणार नाही किंवा तशी विनंती स्वीकारली जाणार नाही.
६) ज्यांच्याकडे आधार क्रमांक आहे त्यांनी तत्संबंधी माहिती भरावी, तसेच उमेदवाराने आधार क्रमांक / आधार नोंदणी क्रमांक याबद्दलची माहिती द्यावी. समांतर आरक्षण (लागू असल्यास) त्यासंबंधीची माहिती द्यावी लागेल. मराठी भाषेतील प्राविण्य, MS-CIT प्रमाणपत्र, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य, अपंगत्वाचा प्रकार लागू असल्यास) यासंबंधीची माहिती द्यावी लागेल.
८) शैक्षणिक माहितीच्या जागी उमेदवाराने आपली सविस्तर शैक्षणिक माहिती भरावी. शैक्षणिक पात्रतेमध्ये जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे माहिती देणे अनिवार्य आहे, तरच आपणास त्या पदासाठी अर्ज करता येईल.
एकदा शैक्षणिक तपशिल प्रविष्ट केले की अर्जदार पुढे या बटणावर क्लिक करावे लागेल, त्या बटणावर क्लिक केल्यानंतर अर्जदाराकडून पुष्टीची विनंती केली जाईल की त्यांनी ते बटण क्लिक केल्यास मागील तपशील संपादित करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
१०) आता उमेदवारास पदाची निवड करावी लागेल. (तलाठी / Talathi)
११) त्यानंतर उमेदवारास सर्व पदांसाठी आवश्यक असलेली पात्रतेबद्दलची माहिती देऊन ती सेव्ह करणे आवश्यक आहे.
१२) उमेदवाराने नोंदणी अर्जामध्ये दिल्याप्रमाणे परिक्षा केंद्राकरिता तीन प्राधान्यक्रम निवडू शकतो. उमेदवाराने आपल्या अर्जात उपलब्ध करून देण्यात आलेल्या तीनही पसंतीक्रमाच्या यादीतील प्रत्येकी एका पर्यायांची निवड करणे आवश्यक आहे. तीनही पसंतीक्रमात उमेदवाराने निवडलेल्या पर्यायांपैकी एकही परीक्षा केंद्र उपलब्ध नसल्यास, उमेदवारास उपलब्ध केंद्रापैकी केंद्र नेमून देण्यात येईल.
१३) उमेदवाराने सगळया नियम व अटी वाचून मान्यता दर्शविण्यासाठी दिलेल्या जागी क्लिक करावे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने (इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड, भीम UPI) आवश्यक तो परीक्षा शुल्क भरणा करावा. मान्यता दर्शविल्यानंतरच अर्ज दाखल करण्यासाठीचा सबमिट हा पर्याय उपलब्ध होईल. उमेदवाराला त्याचा अर्ज डाऊनलोड किंवा प्रिंट करण्याचा पर्याय असेल.
१४) ऑनलाईन अर्ज स्विकारण्याच्या अंतिम तारखेस मध्यरात्री १२.०० वाजल्यानंतर संकेतस्थळावरील लिंक बंद केली जाईल.
१५) जर कोणत्याही उमेदवाराने एकापेक्षा अधिक लॉगिन आयडीसह नोंदणी केली असेल तर उमेदवारांची पहिली यशस्वी नोंदणी फक्त पुढील प्रक्रिया जसे हॉल तिकीट, परीक्षेत उपस्थिती, गुणवत्ता यादी आणि अन्य संबंधित प्रक्रियांसाठी विचारात घेण्यात येईल, कोणत्याही डुप्लीकेट नोंदणीस अवैध नोंदणी मानले जाईल आणि कोणत्याही प्रकारचे पैसे परतफेड केले जाणार नाहीत
नोंद:- नोंदणी मधील तपशील जसे की वापरकर्ता नाव (USERNAME), ई मेल आयडी, प्रवर्ग आरक्षण (लागू, समांतर किंवा प्रवर्ग आरक्षण), पसंतीचे स्थान, जन्मतारीख उमेदवाराचे छायाचित्र (फोटोग्राफ) आणि स्वाक्षरी इत्यादी फॉर्म सादर केल्यानंतर बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही.
How to Apply Online Maharashtra Talathi Application Form 2025|
Mandal Adhikari Bharti 2025 Application Fill
- Go To The official website of Maha Revenue and Forest Department –https://mahabhumi.gov.in/mahabhumilink
- Search to the “Latest News” section on the home page.
- Click On a “Mahsul Vibhag Talathi & Mandal Adhikari Bharti 2023” Link
- Open Notification and Read each & every instruction carefully
- It would be helpful in avoiding any mistake at a later stage.
- Check Your eligibility after reading
- Fill up all the deatils fields without any Mistake
- Upload all Your Documents given
- Now Pay Talathi Application Form Fee 2023 as per Your category
- Now Take a Print Out Of Mahsul Vibhag Talathi Online Application Form 2025 for Future referance
New Update
new Information