GMC Miraj Recruitment Exam Pattern and Syllabus: As per the notification issued by the Directorate of Medical Education and Research, Mumbai, under the Department of Medical Education and Drugs, Government of Maharashtra, applications are invited through online mode from eligible candidates for direct recruitment to various vacant posts under Group-D (Class 4) at Government Medical College, Miraj; Government Medical College and Hospital, Miraj; Padmabhushan Vasantrao Patil Government Hospital, Sangli; and the Health Education Unit, Tasgaon. The entire recruitment process will be conducted by IBPS (Institute of Banking Personnel Selection). Detailed information about the application process and official information website links will be made available in due course on www.gmcmiraj.edu.in
Regarding the syllabus and exam pattern, the written examination will be objective in nature (Multiple Choice Questions – MCQs). The paper will typically cover subjects such as General Knowledge, Marathi Language, General Science, and Intelligence Test. The question paper will be available in Marathi language, and each correct answer will carry one mark. There may or may not be negative marking; candidates are advised to check the official notification once published. The selection will be purely on the basis of written examination merit, followed by document verification.
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या अधिनस्त संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या मार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज; शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज; पद्मभूषण वसंतराव पाटील शासकीय रुग्णालय, सांगली; तसेच आरोग्य शिक्षण पथक, तासगाव यांच्या आस्थापनेवरील व कक्षेतील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील विविध रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. संपूर्ण भरती प्रक्रिया IBPS (Institute of Banking Personnel Selection) या संस्थेमार्फत राबविण्यात येणार आहे. अर्ज प्रक्रिया व अधिकृत संकेतस्थळ यासंदर्भातील सविस्तर माहिती लवकरच www.gmcmiraj.edu.in व sangli.gov.in या संकेतस्थळांवर प्रसिद्ध केली जाईल.
अभ्यासक्रम व परीक्षेच्या स्वरूपाबाबत सांगायचे झाल्यास, लेखी परीक्षा ही बहुपर्यायी प्रश्नपत्रिका (MCQ) स्वरूपाची असणार आहे. परीक्षेत मुख्यतः सामान्य ज्ञान, मराठी भाषा, सामान्य विज्ञान, आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयांचा समावेश असेल. प्रश्नपत्रिका मराठी भाषेत असेल आणि प्रत्येक बरोबर उत्तरास एक गुण दिला जाईल. नकारात्मक गुणांकन असण्याची शक्यता आहे की नाही, याबाबतची अधिकृत माहिती जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर समजेल. उमेदवारांची निवड केवळ लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व नंतरच्या कागदपत्र पडताळणीवर आधारित असेल.