JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC परीक्षेत मोठा बदल! आता CBT आणि नॉर्मलायझेशन पद्धत लागू, जाणून घ्या पूर्ण माहिती!- CBT & Normalization in MPSC

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC परीक्षेत मोठा बदल! आता CBT आणि नॉर्मलायझेशन पद्धत लागू, जाणून घ्या पूर्ण माहिती!- CBT & Normalization in MPSC – The MPSC chief said CBT and normalisation were not new to the commission, which had already conducted around 140 examinations using the system. He described the CBT mode as a scientific and judicially accepted method that was widely followed across the country. Citing examples, Bhimanwar said the Staff Selection Commission, Railway Recruitment Board, National Testing Agency and Maharashtra’s State Common Entrance Test Cell were already conducting large-scale examinations through the CBT mode with normalisation.

 

CBT & Normalization in MPSC – मित्रांनो MPSC संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज आणखी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठा निर्णय जाहीर केला आहे. उमेदवारांचा मानसिक ताण कमी करण्यासाठी आणि त्यांना अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या तिन्ही परीक्षा आता वर्षातून दोन किंवा अधिक वेळा घेतल्या जाणार आहेत. हा महत्त्वपूर्ण बदल सन २०२७ च्या पूर्व परीक्षांपासून लागू करण्यात येणार आहे. सध्याच्या पद्धतीनुसार या तिन्ही पूर्व परीक्षा वर्षातून केवळ एकदाच घेतल्या जातात. या परीक्षांना लाखो उमेदवार बसतात, परंतु जागांच्या मर्यादेमुळे बहुतांश उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी पात्रता मिळवता येत नाही. वर्षभर सतत अभ्यास करूनही एकाच संधीवर सर्व भवितव्य अवलंबून असल्याने उमेदवारांवर प्रचंड मानसिक दडपण येत असे. उमेदवारांना जास्तीच्या संधी उपलब्ध करून देऊन हा अनावश्यक ताण दूर करणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोगाने प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे.

MPSC Latest Updates 2026

परीक्षा आता CBT म्हणजेच संगणकावर होणार
नव्या निर्णयानुसार, या तिन्ही पूर्व परीक्षा आता पारंपारिक ओएमआर शीट ऐवजी संगणक प्रणालीवर आधारित (Computer Based Test – CBT) पद्धतीने घेतल्या जातील. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्यामुळे त्या अधिक पारदर्शक आणि गतीने पार पडण्यास मदत होईल.

नॉर्मलायझेशन पद्धतीचा वापर आणि मुख्य परीक्षेची पात्रता
परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये घेतली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन आयोगाने गुणांचे समानीकरण (Normalization) करण्याची पद्धत निश्चित केली आहे.

मुख्य परीक्षेसाठी संधी: वर्षातून दोन किंवा अधिक वेळा होणाऱ्या पूर्व परीक्षांपैकी कोणत्याही एका पूर्व परीक्षेत जे उमेदवार पात्र ठरतील, ते सर्व उमेदवार त्या वर्षाच्या संबंधित सेवेच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र मानले जातील. मुख्य परीक्षा वर्षातून एकदाच: पूर्व परीक्षा दोन किंवा अधिक वेळा होणार असली, तरी संबंधित सेवांची मुख्य परीक्षा मात्र वर्षातून केवळ एकदाच घेतली जाईल.

प्रमुख घटकजुनी पद्धतनवीन पद्धत – २०२७ पासून
परीक्षेची वारंवारतावर्षातून केवळ १ वेळावर्षातून २ किंवा अधिक वेळा
परीक्षेचे माध्यमओएमआर शीट (पेन आणि पेपर)संगणकावर आधारित चाचणी (CBT On-Line)
गुणांचे निकषप्रत्यक्ष मिळालेले गुणनॉर्मलायझेशन पद्धत लागू (गुणांचे समानीकरण)
मुख्य परीक्षा पात्रताएकाच परीक्षेच्या कट-ऑफवरकोणत्याही एका पूर्व परीक्षेत पात्र झाल्यास संधी

या दोन्ही किंवा अधिक पूर्व परीक्षांमधून उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी नेमके कसे पात्र ठरवले जाईल, याच्या सविस्तर कार्यपद्धतीबाबत आयोग लवकरच एक स्वतंत्र प्रसिद्धीपत्रक काढून माहिती देणार आहे.

Table of Contents