MPSC Steno Test Instruction In Marathi – आयोगाकडून टंकलेखनासाठी साठी सूचना,  हे करू नका !

MPSC Steno Test Instruction In Marathi

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MPSC Steno Test Instruction In Marathi: In accordance with the shorthand-typing test conducted by the Commission, important instructions for the candidates are being published on the website of the Commission under the heading ‘Important Instructions to Candidates for Steno Test’ at Candidates Information > Instructions > General Instructions. Candidates should observe these instructions. The shorthand notebook will be provided to candidates for dictation. In which first 2 pages shall be used for mock dictation and later pages shall be used for actual dictation. (Please note that for evaluation of dication only pages from 3 to 20 will be considered).

आयोगाकडून घेण्यात येणा-या लघुलेखन-टंकलेखन चाचणीच्या अनुषंगाने उमेदवारांसाठी ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावरील Candidates Information > Instructions > General Instructions येथे ‘Important Instructions to Candidates for Steno Test’ या सदराखाली प्रसिध्द करण्यात येत आहेत. सदर सूचनांचे उमेदवारांनी अवलोकन करावे. तसेच जर आपण MPSC ची तयारी करत असाल तर या लिंक वरून मोफत टेस्ट सिरीज सोडवण्यास विसरू नका, फक्त रजिस्टर करा आणि रोज नवीन पेपर्स लॉगिन करून सोडवा. तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

MPSC लघुलेखक आणि लघुटंकलेखक भरती निवड प्रक्रिया

MPSC Stenographer Exam Paper PDF

टंकलेखनासाठी साठी सूचना –

२.१ वास्तविक श्रुतलेखन पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना ज्या ठिकाणी श्रुतलेखन घेतले आहे त्याच ठिकाणी दिलेल्या संगणकावर श्रुतलेखन टंकलिखित करावे लागेल. कोणत्याही उमेदवाराला स्वतःचा कीबोर्ड आणण्याची परवानगी दिली जाणार नाही.
२.२ संगणकावर सूचना वाचल्यानंतर, घोषणा स्वीकारा आणि “I’m ready to begin” वर क्लिक करा.
२.३ मराठी टंकलेखनासाठी कीबोर्ड लेआउट रेमिंग्टन मराठी असेल. तसेच इंग्रजी टंकलेखनासाठी कीबोर्ड लेआउट इंग्रजी (यूएस) असेल. जे QWERTY कीबोर्ड लेआउट आहे.
२.४ मराठी टायपिंगमध्ये अक्षर पूर्ण करण्यासाठी उमेदवार फक्त K कळ (Key) वापरू शकतात, Shift + A कळ (Key) नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
२.५ कोणताही चुकीचा शब्द दुरुस्त करण्यासाठी बॅकस्पेस कळ (Key) आणि नेव्हिगेशन/एरो कळ (Key) चा वापर करावा.
२.६ टंकलेखनाचा वेळ संपल्यानंतरच सबमिट बटण कार्यान्वित केले जाईल. सबमिट न केल्यास, तुमचा वास्तविक टंकलेखन केलेला उतारा विहित वेळेनंतर स्वयंचलितपणे सबमिट होईल.
२.७ परिच्छेद क्रमांक २.११ मध्ये नमूद केल्यानुसार कोणत्याही अडचणी उद्भवल्यास त्याबाबत उमेदवारांनी काळजी करू नये, तशा परिस्थितीमध्ये तुम्हाला पुन्हा लॉगिन करण्याची परवानगी दिली जाईल तसेच टंकलेखनासाठी विहित पूर्ण वेळ प्रदान केला जाईल.
२.८ टंकलेखना दरम्यान उमेदवारांनी कोणतीही आवश्यक नसलेली विशेष कळ (Special Key) वापरू नये.
२.९ उमेदवारांनी Caps Lock व Scroll Lock कळ (Key) चालू नाही याची स्वतः खात्री करावी.
२.१० टंकलेखनाचा विहित वेळ पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांनी त्यांची लघुलेखन पुस्तिका समवेक्षकांनी गोळा
करेपर्यंत आणि त्यांचा हिशोब होईपर्यंत प्रतीक्षा करावी व त्यांच्या जागेवर बसून रहावे. श्रुतलेखनासाठी दिलेला
वेळ संपल्यानंतर उमेदवारांनी लघुलेखन पुस्तिकेत काहीही लिहू अथवा मिटवू नये. २.११ हे करा – खालीलपैकी कोणतीही त्रुटी आढळल्यास, कृपया धीर धरा आणि समवेक्षकांशी संपर्क साधाः- अ) कीबोर्ड त्रुटी, ब) मशीन ऑटो लॉक, क) वीज व्यत्यय, ड) स्वयंचलितरित्या चाचणीमधून बाहेर पडल्यास

Important Instructions to Candidates for Steno Test

Language Speed Exam Structure Exam Duration
English/Marathi 120 Mock Dictation (1 Min) + Break (3 mins) + Actual

Dictation (3 Mins) + Break (5 mins) + Keyboard Test (5

mins) + Break (5 mins) + Typing (40 mins)/{48 Mins for

Divyang Candidates)

62 mins

(For Divyang

Candidate 70 Mins)

English/Ma rath i 100 Mock Dictation (1 Min) + Break (3 mins) + Actual

Dictation (3 Mins) + Break (5 mins) + Keyboard Test (5

mins) + Break (5 mins) + Typing (35 mins)/(42 Mins for

Divyang Candidates)

57 mins

(For Divyang

Candidate 64 Mins)

English/Marathi 80 Mock Dictation (1 Min) + Break (3 mins) + Actual

Dictation (3 Mins) + Break (5 mins) + Keyboard Test (5

mins) + Break (5 mins) + Typing (25 mins)/(30 Mins for

Divyang Candidates)

47 mins

(For Divyang

Candidate 52 Mins)

1. Instructions for Dictation –

The shorthand notebook will be provided to candidates for dictation. In which first 2 pages shall be used for mock dictation and later pages shall be used for actual dictation. (Please note that for evaluation of dication only pages from 3 to 20 will be considered).
2 Candidates have to fill only required fields of cover page of dictation notebook.
3 Dictation will be given to all the candidates through audio system at the place of seating of the candidate.
4 Note that candiates only have to bring Pen, Pencil, Sharpner, hall ticket, original ID proof and copy of that original ID proof. (Candidates should not bring eraser to the examination hall as they are not allowed to use eraser during the test)
5 Candidates will be given dictation of one mock passage of one minute duration. Candidates are advised to put a cross mark on the transcribed trial passage written in the notebook, so that during the actual typing candidate will not get confused between the trial passage and actual passage.
6 Divyang candidates claiming Hearing Impairment category can bring their hearing aid equipment for test.

 हे करू नका –

अ) दिलेला मजकूर टंकलिखीत करण्यासाठी आवश्यक असलेल्या कळ (Key) व्यतिरिक्त इतर कोणतीही कळ (Key) किंवा कळ संयोजन (Key Combination) वापरू नका.
ब) दिलेल्या मजकूरात नमूद केल्याखेरीज कोणतेही विशेष वर्ण/चिन्ह प्रविष्ट करू नका. त्यामुळे टंकलिखित केलेला शब्द वगळू शकतो, टंकलेखन त्रूटी होऊ शकते, टंकलेखन चूक म्हणून त्याचे मूल्यांकन केले जाऊ शकते.
क) कोणत्याही कारणास्तव भाषा आणि कीबोर्ड इनपुट दरम्यान अदला बदल करू नका.
ड) एकदा चाचणी सबमिट केल्यानंतर आणि सारांश प्रदर्शित झाल्यानंतर बॅक स्पेस किंवा इतर कोणतीही कळ (Key) दाबू नका.

३. उमेदवारांनी त्यांची लघुलेखन पुस्तिका किंवा कोणतेही पृष्ठ परीक्षा हॉलच्या बाहेर नेऊ नये.
४. परीक्षेची मुदत संपेपर्यंत उमेदवारांना परीक्षा हॉल सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही.
५. उमेदवाराने श्रुतलेखन आणि टंकलेखन चाचणीमध्ये कोणतीही दुर्भावनापूर्ण कृती केल्यास किंवा अनुचित मार्ग वापरल्यास सदर उमेदवारास आयोगास योग्य वाटेल अशा इतर कोणत्याही कृतीसह पूर्वग्रह न ठेवता भरतीसाठी अपात्र ठरवले जाईल.
६. कीबोर्ड मध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नसल्यास केवळ उमेदवाराच्या मागणीवरून कोणत्याही उमेदवारास कीबोर्ड बदलुन मिळणार नाही.
७. कीबोर्डमध्ये तांत्रिक बिघाड नसतानाही उमेदवाराने कीबोर्ड बदलून देण्याचा आग्रह केल्यास सदर उमेदवाराचे कृत्य हे परीक्षा आयोजनामध्ये अडथळा समजण्यात येईल व अशा उमेदवारांवर आयोगाच्या संकेतस्थळावरील सर्वसाधारण सूचना मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.

Download MPSC Steno Test Instruction PDF 2024