Vasantrao Naik Loan Yojana

VJNT Loan Scheme @ www.vjnt.in Application Form


Vasantrao Naik Loan Yojana

Under the Vasantrao Naik Loan Yojana http://www.vjnt.in – the financial assistance of Rs.1 lakh is provided to the beneficiary to start a business. Beneficiaries from Vimukta Jati, Nomedic Tribes and special backward classes, destitute, widowed women etc. of the state are given immediate benefit. Also, no interest is charged to the beneficiaries who make regular loan repayments. Government participation under this scheme is 100%. Preference will be given to experienced and experienced young boys/girls who have undergone technical training through Skill Development Department of Govt. Read the complete information given here and apply from the given link.

The main Objectives of VJNT Loan schemes are implemented for the social, economic and educational upliftment of the economically weaker sections of the Vimukta Jati, Nomadic Tribes and Special Backward Classes.

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना 2023

वसंतराव नाईक थेट कर्ज योजनेअंतर्गत लाभार्थ्यास उद्योग सुरु करण्यासाठी १ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य्य करण्यात येते राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील निराधार, विधवा महिला इत्यादी लाभार्थ्यांना तात्काळ लाभ दिला जातो. तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज आकारण्यात येत नाही. या योजनेअंतर्गत शासनाचा सहभाग १००% आहे. शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत तसेच शासकीय/निमशासकीय संस्थांमधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेली तसेच अनुभवी तरुण मुले/मुली यांना प्राधान्य देण्यात येते.

Eligibility for Vasantrao Naik Loan Yojana

वसंतराव नाईक कर्ज योजनेची पात्रता

  1. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ निवासी असणे आवश्यक.
  2. अर्जदार विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील असावा.
  3. अर्जदाराचे वय १८ वर्ष ते ५५ वर्ष दरम्यान असावे.
  4. लाभार्थीचे कर्ज खाते आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
  5. उमेदवार कोणत्याही बॅंकेचा / वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
  6. वेबपोर्टल / महामंडळ संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य आहे.
  7. उमेद्वाराने अर्ज करतेवेळी या प्रकल्पासाठी व यापूर्वी महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  8. उमेद्वाराने कर्ज प्रकरण हे सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे प्रकरण हातालन्यास सक्षम असलेल्या बँकेत केलेले असावे.
  9. कुटुंबातील एक व्यक्तीला केवळ एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल.

Vasantrao Naik Loan Yojana

Required Documents for Vasantrao Naik Loan Yojana

वसंतराव नाईक कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. निवास प्रमाण पत्र
  3. डोमेसाइल सर्टिफिकेट
  4. राशन कार्ड
  5. पॅन कार्ड
  6. जातीचा दाखला
  7. जन्म प्रमाणपत्र
  8. मोबाईल नंबर
  9. ई-मेल आयडी
  10. पासपोर्ट साईज फोटो
  11. व्यवसायाचे कोटेशन
  12. स्वयं घोषणापत्र
  13. बँक खाते

Vasantrao Naik Loan Yojana Terms and Condition

  1. महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही
  2. अर्जदाराने या आधी कधी या योजनेचा लाभ घेतला असता कामा नये
  3. अर्जदाराने या आधी कधी शासनाच्या व्यवसायासाठी कर्ज योजनेचा लाभ घेतला असता कामा नये
  4. अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार असता कामा नये
  5. वसंतराव नाईक कर्ज योजनेअंतर्गत १ लाखांपैकी ७५०००/- रुपये पहिला हफ्ता स्वरूपात दिला जाईल आणि योजनेचा दुसरा हफ्ता २५०००/- रुपये प्रत्यक्ष उद्योग सुरु झाल्यावर साधारणतः ३ महिन्या नंतर जिल्हा व्यवस्थापकांच्या तपासणी अभिप्रायानुसार दिला जाईल
  6. लाभार्थ्याला नियमित ४८ महिने मुद्दल २०८५/- रुपये परतफेड करावी लागेल
  7. नियमित कर्जाची परतफेड न करणाऱ्या लाभार्थ्यांना जेवढे कर्जाचे हफ्ते थकीत होतील त्या रकमेवर द.सा.द.शे. ४% व्याज आकारण्यात येईल
  8. ५५ वर्षे वयाच्या वरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही
  9. अर्जदाराचे एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा जास्त नसावे (सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या प्रमाणानुसार)
  10. एका वेळी कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल
  11. अर्जदाराचे वय ५५ वर्षापेक्षा जास्त नसावे
  12. अर्जदाराने आधार कार्ड संलग्न बँक खात्याचा तपशील सादर करावा
  13. अर्जदार महामंडळाच्या कोणत्याही (केंद्र व राज्य) योजनेचा थकबाकीदार नसावा
    लाभार्थ्यांच्या शेतजमीनीचे नोंदणीकृत गहाणखत करणे आवश्यक, शेतजमीनीचे मुल्यांकन व गहाणखत केल्यानंतर शेतजमीनीच्या ७/१२ किंवा मिळकत उता-यावर महामंडळाच्या कर्ज रक्कमेचा बोजा नोंद करणे आवश्यक
  14. सदर योजनेसाठी दोन जामीनदार असणे आवश्यक त्यापैकी एक शासकीय/निमशासकीय पगारी जामीनदारअसावा.(महाराष्ट्र शासन/जिल्हापरिषद/महानगरपालिका/नगरपालिका/ नगरपरिषद/नगरपंचायत/महामंडळे/शासन मान्य महाविद्यालये/शासनमान्य शाळा, आश्रमशाळा इ.) शासकीय जामीनदाराची सेवा किमान ८ वर्षे शिल्लक असावी.
  15. जामीनदार शासकीय कार्यालयाचा कायमस्वरूपी (Permanent) कर्मचारी असावा.
  16. दुसऱ्या जामीनदाराकडे लाभार्थीला दिलेल्या कर्जा इतकी स्थावर मालमत्ता अथवा जमीनजुमला असणे आवश्यक आहे.लाभार्थ्याच्या नावावर ७/१२ / मिळकत नसल्यास त्याच्याकडे असलेल्या शेतीवर अथवा मालमत्तेवर महामंडळाने दिलेल्या कर्जाचा बोजा उतरवल्याची नोंद करण्यात यावी.
  17. संबंधित दोन्ही जामीनदार यापूर्वी कोणत्याही वित्तीय संस्थेत व इतर कोठेही जामीनदार नसावा. तसेच भविष्यात या हमीपत्राद्वारे महामंडळाचे सर्व कर्ज रक्कम वसुल होईपर्यंत सदर जामीनदाराचे हमीपत्र अन्य कर्ज प्रकरणात सदर कार्यालयाकडून निर्गमित केले जाणार नाही, अशी खात्री सदर आस्थापनेकडून हमीपत्राची पडताळणी करून घेण्यात येईल
  18. सदर प्रकरणात कर्जाचा निधी लाभार्थीच्या आधार संलग्न बैंक खात्यात वर्ग करण्यात येऊन त्याचवेळी लाभार्थीकडून कर्जाच्या परतफेडीच्या रक्कमेचे पुढील दिनांकाचे आगाऊ धनादेश घेण्यात येतील
  19. सदर कर्जातून लाभार्थीसाठी जी मत्ता निर्माण होणार आहे ती ज्यांच्याकडून निर्माण होईल त्यांचेकडून ती मत्ता अचल (Immovable) असेल तर परस्पर वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाकडे गहाण (Mortgage) ठेवण्यात येईल जर ती मत्ता चल (Movable) असेल तर ती महामंडळाकडे तारणगहाण (Hypothecate) करण्यात येईल
  20. कर्ज परतफेडीबाबत लाभार्थीकडून शपथपत्र घेण्यात येईल
  21. या योजनेवर होणारा खर्च शासनाने महामंडळासाठी मंजूर केलेल्या भाग भांडवलाच्या तरतूदीच्या मर्यादेत उपलब्ध असलेल्या भाग भांडवलातून करण्यात येईल
  22. महामंडळाने आपला भांडवली अर्थसंकल्प विहीत कालमर्यादेत शासनाकडून मान्य करून घेणे बंधनकारक राहील.
  23. लाभार्थ्याने स्थापन केलेल्या व्यवसायाचा विमा स्वखर्चाने उतरविणे तसेच दरवर्षी विम्याचे नुतनीकरण करणे बंधनकारक राहिल.

Vasantrao Naik Loan Scheme Maharashtra

वसंतराव नाईक कर्ज योजनेअंतर्गत सुरु करण्यात येणारे व्यवसाय

  1. मत्स्य व्यवसाय
  2. कृषी क्लिनिक
  3. पॉवर टिलर
  4. हार्डवेअर व पेंट शॉप
  5. सायबर कॅफे
  6. संगणक प्रशिक्षण
  7. झेरॉक्स
  8. स्टेशनरी
  9. सलुन
  10. ब्युटी पार्लर
  11. मसाला उद्योग
  12. पापड उद्योग
  13. मसाला मिर्ची कांडप उद्योग
  14. वडापाव विक्री केंद्र
  15. भाजी विक्री केंद्र
  16. ऑटोरिक्षा
  17. चहा विक्री केंद्र
  18. सॉफ्ट टॉईज विक्री केंद्र
  19. डी. टी. पी. वर्क
  20. स्विट मार्ट
  21. ड्राय क्लिनिंग सेंटर
  22. हॉटेल
  23. टायपिंग इन्स्टीटयुट
  24. ऑटो रिपेअरींग वर्कशॉप
  25. मोबाईल रिपेअरिंग
  26. गॅरेज
  27. फ्रिज दुरूस्ती
  28. ए. सी. दुरुस्ती
  29. चिकन/मटन शॉप
  30. इलेक्ट्रिकल शॉप
  31. आईस्क्रिम पार्लर
  32. मासळी विक्री
  33. भाजीपाला विक्री
  34. फळ विक्री
  35. किराणा दुकान
  36. आठवडी बाजारामध्ये छोटसे दुकान
  37. टेलिफोन बुथ किंवा अन्य तांत्रिक लघु उद्योग इत्यादी
  38. अशा लघु व्यवसायासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

Vasantrao Naik Karj Yojana

वसंतराव नाईक कर्ज योजना कर्ज वितरण कार्यपद्धती

कर्ज योजनांसाठी योग्य लाभार्थ्यांची निवड व मंजूर प्रकरणात आवश्यक वैधानिक दस्तऐवज पुर्तता विहीत कालावधीत करून घेण्याची तसेच महामंडळामार्फत देण्यात येणा-या कर्जाच्या वसुलीची संपुर्ण जबाबदारी जिल्हास्तरीय कार्यालयाची राहील व त्यांचेवर प्रादेशिक कार्यालय यांचे नियंत्रण राहील. याबाबत साधारणपणे पुढीलप्रमाणे कार्यपध्दती अनुसरण्यात येईल. या सुधारीत योजनेअंतर्गत कर्ज मिळण्यासाठी लाभार्थ्यांना नव्याने अर्ज करावा लागेल.

१. शासन निर्णय दि. ०६/०७/२०१९ अन्वये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या जिल्हा लाभार्थी निवड समितीमार्फत लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.
२. महामंडळाच्या संबंधीत जिल्हास्तरीय कार्यालयातून या योजनेच्या लाभार्थी निवड व कर्ज वसुलीची संपूर्ण कार्यवाही केली जाईल व त्यावर संबंधीत प्रादेशिक कार्यालयाचे नियंत्रण राहील.
३. संबंधीत जिल्हा व्यवस्थापक योजनेचे अंमलबजावणी अधिकारी असतील व त्यांचेवर संबंधीत प्रादेशिक व्यवस्थापक हे नियंत्रक अधिकारी असतील.
४. महामंडळाचे जिल्हा कार्यालयांमार्फत कर्ज प्रकरणासाठी स्थानिक वर्तमानपत्रातून व प्रमुख शासकीय/निमशासकीय कार्यालयातील सुचना फलकावर (Notice Board) जाहिरात प्रसिध्द करण्यात येईल व त्याचवेळी कार्यालयात अर्जाचा नमुना व कागदपत्राची सुची सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध करतील.
५. संबंधीत जिल्हा व्यवस्थापक प्राप्त अर्जाची संपूर्ण छाननी/तपासणी करून पात्र व अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार करतील व परिपूर्ण अर्ज संबंधीत प्रादेशिक व्यवस्थापकांकडे तपासणीकरीता सादर करतील. तद्नंतर संबंधीत प्रादेशिक व्यवस्थापक मुख्यालयाकडे लाभार्थीनिहाय निधीची शिफारस करतील, यासाठी पुढील बाबी विचारात घेणे अनिवार्य असेल.

अ) उद्योग/व्यवसायाची वर्धनक्षमता,
ब) लाभार्थ्यांची सक्षमता / व्यवसायाचे ज्ञान,
क) परतफेडीची क्षमता / जामीनदारांची क्षमता

६. कर्ज मंजूरी प्रकरणातील आर्थिक वर्षात कार्यवाही पूर्ण करणे आवश्यक असल्याने लाभार्थी निवड समितीच्या बैठका वेळोवेळी घेण्यात येतील.
७. जिल्हा निवड समितीच्या मंजूरीनंतर पात्र लाभार्थीचे त्रुटीरहित परिपूर्ण कर्ज प्रस्ताव मुख्यालयाकडे मंजूरीसाठी / निधी मागणीसाठी संबंधीत जिल्हा व्यवस्थापक यांनी संबंधीत प्रादेशिक व्यवस्थापक यांचेमार्फत सादर करतील. पात्र लाभार्थीच्या कर्ज प्रस्तावांना व्यवस्थापकीय संचालक यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालय लाभार्थी निवड समितीमार्फत मंजूरी प्रदान करण्यात येईल.

Vasantrao Naik Loan Scheme Loan Recovery Procedure

वसंतराव नाईक कर्ज योजना कर्ज वसुली कार्यपध्दती

  1. कर्जाची परतफेड ही कर्ज वितरीत केल्याच्या ९० दिवसांनंतर सुरू करण्यात येईल.
  2. कर्ज परताव्याचे मासिक हप्ते ठरवून द्यावेत व कर्ज वसुलीच्या दृष्टीने लाभार्थ्यांकडून पुढील दिनांकांचे आगाऊ धनादेश घेऊन तसेच ECS (इलेक्टॉनिक क्लिअरन्स सिस्टम) पध्दतीने वसुली करण्यात येईल
  3. एवढे करूनही वसुली न झाल्यास महामंडळाकडे ठेवलेल्या तारण तसेच जामीनदारांद्वारे कर्ज वसुली करण्यात यावी. जामीनदाराकडून कर्ज वसुली शक्य न झाल्यास जमीन महसूल संहितेच्या कलम २२१ अंतर्गत (आर. आर. सी.) नुसार जिल्हाधिकारी यांना याबाबत संपूर्ण माहिती सादर करून कर्ज वसुली करण्यात येईल.

VJNT Loan Scheme Application Form

वसंतराव नाईक कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत:

  1. First of all the applicant has to go to the official website of the Govt
  2. On the home page you have to click on the registration option
  3. Now the scheme application form will open in front of you.
  4. You have to click on the option Personal Loan Interest Repayment Scheme and fill the personal information asked
  5. After filling all the information click on submit button Now you have to fill your address details
  6. Now you have to fill the Income/Occupation/Bank details
  7. Now you have to fill the document details You have to tick all the items in the qualification and documents to be uploaded like- proof of receipt, Caste Certificate, Ration card, Proof of income, Aadhar Card, Quotation, Proof of date of birth etc.,
  8. Now you have to tick the manifest and click on the submit button
  9. Now you need to download the printout of your filled application form and keep it with you In this way your application for Vasantrao Naik Loan Yojana will be completed

Online Apply Link

Important Document List for VJNT Loan Scheme

कागदपत्र
डाउनलोड करा
सरकारी जीआर वैयक्तिक कर्ज डाउनलोड करा
शासकीय जीआर ग्रुप कर्ज डाउनलोड करा

Help link number of VJNT Loan Scheme

विभागांचे नाव:  अमरावती
कार्यालय क्षेत्र कार्यालयाचा पत्ता ई-मेल संपर्क क्रमांक
प्रादेशिक कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, ए विंग, २ रा मजला, पोलीस आयुक्‍त कार्यालयाच्‍या मागे, जिल्‍हा अमरावती ४२२ १०१ [email protected] ०७२१-२५५०५०३
अमरावती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, ए विंग, २ रा मजला, पोलीस आयुक्‍त कार्यालयाच्‍या मागे, जिल्‍हा अमरावती ४२२ १०१ [email protected] ०७२१-२५५११९१
अकोला श्री. अमोल बाबाराव फाले, श्रवणी प्‍लॉट, हॉटेल स्‍कायलार्क समोरील गल्‍ली, माजी नगरसेवक श्री. पवन पाडीया यांच्‍या घरासमोर, जिल्‍हा अकोला ४४४ ००१ [email protected] ०७२४-२४२९९३७
बुलढाणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, चिखली रोड, जिल्‍हा बुलढाणा. ४४३ ००१. [email protected] ०७२६२-२४७४३९
यवतमाळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, दक्षता भवन मागे, द्वारका रोड, जिल्‍हा यवतमाळ. ४४५ ००१. [email protected] ०७२३२-२४७८४५
वाशिम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, सिव्हिल लाईन, जिल्‍हा वाशिम ४४४ ५०५ [email protected] ०७२५२-२८८०७३
विभागांचे नाव:  औरंगाबाद
कार्यालय क्षेत्र कार्यालयाचा पत्ता ई-मेल संपर्क क्रमांक
प्रादेशिक कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, ३ रा मजला, शिवाजी हायस्‍कुल जवळ,खोकडाडुरा, जिल्‍हा औरंगाबाद ४३१ ००१ [email protected] 0240-2357454
औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, ३ रा मजला, शिवाजी हायस्‍कुल जवळ,खोकडाडुरा, जिल्‍हा औरंगाबाद ४३१ ००१ [email protected] ०२४०-२३५७४५४
बीड 1डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, बि विंग, ३ रा मजला, , जिल्‍हा बीड ४३१ ००१ [email protected] ०२४४२-२२५५७०
परभणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, जाकवाडी वसाहत, कोरेगांव रोड, जिल्‍हा परभणी ४३१ ४०१ [email protected] ०२४५२-२१९०६०
जालना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, इमारत अ १ ला मजला, जिल्‍हाधिकारी कार्यालया समोर, जिल्‍हा जालना ४३१ ००१ [email protected] ०२४८२-२३२७९०
विभागांचे नाव:  कोकण
कार्यालय क्षेत्र कार्यालयाचा पत्ता ई-मेल संपर्क क्रमांक
प्रादेशिक कार्यालय कक्ष क्रमांक २०3, ए विंग, दुसरा मजला, मंगळेश्वर हाइट्स, नीलकंठा हाइट्स नेबरहुड मजीवाडा गाव, जिल्हा ठाणे (पश्चिम) 400601 [email protected] ०२२-२५४२८९०७
बांद्रा गृहनिर्माण भवन, खो. क्र. ३३, तळ मजला, कलानगर, बांद्रा ( पू. ), मुंबई – ४०० ०५१ [email protected] ०२२-२६५९००५६
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, 5th वा मजला, विभागीय समाज कल्याण कार्यालयाजवळ, कोर्ट नाका, जिल्हा – ठाणे (प), 400602 [email protected] ०२२-२५४२०७२४
पालघर आफरीन अपार्टमेंट, खो. क्र. २०१, नवली रोड, विक्रीक कार्यालया शेजारी, जिल्‍हा पालघर – ४०१ ४०४ [email protected] ०२५२५-२५१२३१
रायगड डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, तळमजला, खो. क्र. ०५, रायगड जिल्‍हा परिषद शाळेच्‍या मागे, गोंधळपाडा, अलिबाग, जिल्‍हा रायगड ४०० २०४ [email protected] ०२१४१-२२१३०७
रत्‍नागिरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, १ ला मजला, पाटबंधारे स्‍टॉप, कुवारबाव, जिल्‍हा रत्‍नागिरी – ४१५ ६३९ [email protected] ०२३५२-२३००६३
सिंधूदुर्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, १ ला मजला, सिुधूदुर्गनगरी, औरस बुद्रुक, ता. कुडाळ, जिल्‍हा सिुधूदुर्ग ४१६ ८१२. [email protected] ०२३६२-२२८१५६
विभागांचे नाव:  नागपूर
कार्यालय क्षेत्र कार्यालयाचा पत्ता ई-मेल संपर्क क्रमांक
प्रादेशिक कार्यालय डॉ. बाबसाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, खो.क्र.३०४, ३ रा मजला, बी बिंग, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेसमोर, जिल्‍हा नागपूर – ४४० ०२०. [email protected] ०७१२-२२४६८९४
नागपूर डॉ. बाबसाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, खो.क्र.३०४, ३ रा मजला, बी बिंग, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेसमोर, जिल्‍हा नागपूर – ४४० ०२०. [email protected] ०७१२-२२४६८९४
भंडारा डॉ. बाबसाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, सिव्हिल लाईन कामगार, कल्‍याण कोर्टासमोर, जिल्‍हा भंडारा ४४१ ९०४ [email protected] ०७१८४-२५५०२८
वर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, सेवाग्राम रोड, जिल्‍हा वर्धा ४४२ ००१ [email protected] ०७१५२-२५५७४५
चंद्रपूर डॉ. बाबसाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, रयतवारी रोड, जलनगर, आर.टी. ओ. ऑफीस जवळ, जिल्‍हा चंद्रपूर ४४२४०२ [email protected] ०७१७२-२७१६६१
गडचिरोली डॉ. बाबसाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, १ला मजला, आय.आय.टी. कॉम्‍प्‍लेक्‍सच्‍या मागे, जिल्‍हा गडचिरोली ४४२ ६०५ [email protected] ०७१३२-२२३०२६
गोंदिया डॉ. बाबसाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या मागे, आमगाव रोड, पतंगा मैदान, पी फुलचुर, जिल्‍हा गोंदिया ४४१ ६०१ [email protected] ०७१८२-२३४६६५
विभागांचे नाव:  नाशिक
कार्यालय क्षेत्र कार्यालयाचा पत्ता ई-मेल संपर्क क्रमांक
प्रादेशिक कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, बि विंग, २ रा मजला, नासर्डी पुलाजवळ, नाशिक पुणे रोड, जिल्‍हा नाशिक- ४२२ १०१ [email protected] ०२५३-२२३६०५१
नाशिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, बि विंग, २ रा मजला, नासर्डी पुलाजवळ, नाशिक पुणे रोड, जिल्‍हा नाशिक- ४२२ १०१ [email protected] ०२५३-२२३६०५१
धुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, २ रा मजला, साक्री रोड, सिंचन भवनाच्‍या पाठीमागे, जिल्‍हा धूळे ४२४ ००१. [email protected] ०२५६२-२७७६००
जळंगाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, मायादेवी नगर , महाबळ रोड, जिल्‍हा जळगाव -४२५ ००१ [email protected] ०२५७-२६३४०२
अहमदनगर आनंद हवेली, महात्मा फुले चौक, मार्केट यार्ड, कॉर्पोरेशन बँकेसमोर, जिल्हा अहमदनगर.-4१4 ०००१ [email protected] ०२४१ – २३२४०
नंदूरबार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, जिल्‍हा परिषद समोर, टोकरतलाव रोड, जिल्‍हा नंदूरबार ४२५ ४१२ [email protected] ०२५६४-२१०६६६
विभागांचे नाव:  पुणे
कार्यालय क्षेत्र कार्यालयाचा पत्ता ई-मेल संपर्क क्रमांक
प्रादेशिक कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, बी विंग, तळ मजला, मेंटल हॉस्‍पींटल कॉर्नर, आळंदी रोड, विश्रांतवाडी, जिल्‍हा पुणे ४११ ०१५ [email protected] ०२०-२६१२०७७६
पुणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, बी विंग, तळ मजला, मेंटल हॉस्‍पींटल कॉर्नर, आळंदी रोड, विश्रांतवाडी, जिल्‍हा पुणे ४११ ०१५ [email protected] ०२०-२६१२०७७६
कोल्‍हापूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, ३ रा मजला, खो. क्र. २, विचारे माळ, ( कावळा नाका ), ताराराणी चौक, जिल्‍हा – कोल्‍हापूर, ४१६ ००३ [email protected] ०२३१-२६६२३१३
सांगली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, १ रा मजला, जुना बुधगाव रोड, रेल्‍वे क्रॉसिंग जवळ, संभाजी नगर, ता. मिरज, जिल्‍हा सांगली-४१६ ४१६ [email protected] ०२३३-२३७६३८३
सातारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, सर्व्हे नं. २२ अ, जुनी एम.आय.डी.सी. रोड, बॉम्बे रेस्टॉरंट उड्डाण पुलाजवळ, जिल्‍हा सातारा-४१५ ००३ [email protected] ०२१६२-२३३४२५
सोलापूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, २ रा मजला, सात रस्‍ता, जिल्‍हा – सोलापूर ४१४ ००४ [email protected] ०२१७ -२३१५४७
विभागांचे नाव:  लातूर
कार्यालय क्षेत्र कार्यालयाचा पत्ता ई-मेल संपर्क क्रमांक
प्रादेशिक कार्यालय डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तळ मजला, जिल्हा लातूर – ४२२ १०१ [email protected] ०२३८२-२५३१५५
लातूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, तळ मजला, जिल्‍हा लातूर – ४१३ ४३१ [email protected] ०२३८२-२५३१५५
नांदेड डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल जस्टिस बिल्डिंग, तिसरा मजला, कामठा रोड, जिन्माता स्कूल समोर, जिल्हा बीड 431601 [email protected] ०२४६२-२८४२४४
उस्‍मानाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, जिल्‍हा उस्‍मानाबाद ४१३ ५०१ [email protected] ०२४७२-२२५१२७
हिंगोली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन, जिल्‍हा हिंगोली ४३१ ५१३ [email protected] ०२४५६-२२३९२१


5 Comments
    Test22
  1. Bharat sabale says

    Poytri from

  2. Test22
  3. MahaBhartiYojana says

    Vasantrao Naik Loan Yojana

  4. Test22
  5. Dattatray Ananda ohol says

    Mi Hindu mhar ahe mala lon milel ka

  6. Test22
  7. Dattatray Ananda ohol says

    Mi Hindu Mahar ahe mala lon milel ka

  8. Test22
  9. Sushma londhe says

    Online form kasa

Leave A Reply

Your email address will not be published.