Soyabean Tokan Yantra

Required Documents for Soyabean 50% Anudan Apply here


Soyabean Tokan Yantra Apply Here

Soyabean Tokan Yantra Details and How to apply for it are given briefly below on this page. Farmers with small and marginal landholdings cannot afford to sow (perani) with the help of tractors. Soybean Token Yantra is given to such farmers through Panchayat Samiti on 50% subsidy. Now farmers will get 50 percent subsidy for soybean token machine. To apply for Soybean Token Machine, farmers should first take xerox copies of all the required documents. Farmer should submit the relevant documents and application form at the Zilla Parishad / Panchayat Samiti of your district. After submitting the application, if the beneficiaries are selected, the beneficiaries will have to purchase the soybean token yantra of their choice from the open market and submit all the documents in the next one month. So let’s know the detailed information about this.

soyabeen tokan yantr

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ योजनेंतर्गत मिळणार निम्म्या किंमतीत सोयाबीन टोकण यंत्र

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. येथे देशातील जवळपास 65 टक्के नागरिक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. म्हणूनच शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. जेणेकरून शेतकऱ्यांना शेती करण्यास मदत मिळेल. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी करणे परवडण्याजोगे नसते. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पंचायत समितीमार्फत 50 टक्के अनुदानावर सोयाबीन टोकन यंत्र दिलं जातं. आता शेतकऱ्यांना सोयाबीन टोकन यंत्रासाठी 50 टक्के अनुदान मिळणार आहे. चला तर मग याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Soyabean Tokan Anudan Yojana Details

50 टक्के अनुदानावर सोयाबीन टोकण यंत्र

  • लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हा परिषद लातूर सेस फंडाअंतर्गत सोयाबीन टोकण यंत्र 50 टक्के अनुदानावर डी.बी.टी तत्वावर देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येते. शेतकऱ्यांनो दिवाळीच्या मुहूर्तावर घरी आणा नवा ट्रॅक्टर! सरकारकडून मिळणार 50 टक्के अनुदान, त्वरित घ्या लाभ.
  • या योजनेसाठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी 20 आक्टोबर 2022 पर्यंत पंचायत समिती कार्यालयाकडे वर दिलेल्या कागदपत्रासह अर्ज करण्याचे अवाहन कृषि विकास अधिकारी व मा. अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर यांच्या माध्यमातून करण्यात आले आहेत. तसेच शेतकरी महाडीबीटी फार्मर पोर्टल या वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Required Documents for Soyabean 50% Anudan

आवश्यक कागदपत्रे

  1. 7 /12, 8-अ
  2. आधार कार्ड
  3. बँक पासबुकाच्या झेरॉक्स
  4. अनु. जाती, अनु. जमातीचे असल्यास जातीचे प्रमाणपत्र
  5. अपंग लाभार्थीसाठी अपंगत्वाच्या दाखल्याच्या झेरॉक्स प्रतिसह आपल्या पंचायत समितीकडे अर्ज करावा लागेल.

How to Apply for this Scheme

त्वरित करावा अर्ज

  1. सोयाबीन टोकन यंत्रासाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांनी वरील नमून सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती काढून घ्याव्यात. आपल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद / पंचायत समिती या ठिकाणी संबंधित कागदपत्रे व अर्जाचा नमुना दाखल करावा.
  2. अर्ज दाखल केल्यानंतर लाभार्थ्यांची निवड झाल्यास पुढील एक महिन्यात लाभार्थ्यांनी खुल्या बाजारातून आपल्या पसंतीने सोयाबीन टोकन यंत्र खरेदी करून त्याबद्दलची सर्व कागदपत्रे जमा करावी लागतील.

Benefits of Soyabean Tokan anudan

सोयाबीन टोकन यंत्राचे फायदे

  1. अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सोयाबीन टोकन यंत्र खूपच उपयोगाचे आहे.
  2. कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन टोकन यंत्राचा चांगलाच फायदा होतो.
  3. बीबीएफ पद्धतीने सोयाबीन पेरणी करते वेळेस सोयाबीन टोकण यंत्र महत्त्वाची भूमिका बजावतो.

Soyabean Tokan Yantra Anudan

सोयाबीन टोकन यंत्र अनुदान

  1. खरेदी करावयाची अवजारे अधिकृत सक्षम संस्थांनी तपासणी व परीक्षण करून BSI अथवा संस्थांनी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार / तांत्रिक निकषानुसार असावीत.
  2. अशा प्रकारच्या यंत्रणा 50 टक्केपर्यंत अनुदान देण्यात येईल.
  3. ज्याची कमाल मर्यादा 10,000 रुपयापर्येंत असते, म्हणजेच साधारणतः सोयाबीन टोकन यंत्र बाजारामध्ये ७ हजारांपासून ९ हजारपर्येंत उपलब्ध होतो.
  4. या रकमेच्या ५० टक्के म्हणजेच जवळपास शेतकऱ्यांना सोयाबीन टोकन यंत्रासाठी ३५०० रु ते ४५०० रु अनुदान देण्यात येतं.
  5. सोयाबीन टोकन यंत्रासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झाल्यास, लक्षांकानुसार सोडत पद्धतीने संबंधित पंचायत समिती स्तरावर करण्यात येईल.
  6. पात्र लाभार्थ्यांना टोकन यंत्र अनुदान त्यांच्या आधार लिंक बँक खात्यावर हस्तांतरित ( Bank Transfer ) करण्यात येईल.

Online Apply for Soyabean Tokan Anudan yojana

  1. सोयाबीन टोकन यंत्र Mahadbt पोर्टलच्या माध्यमातूनसुध्दा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं जातं.
  2. त्यामुळे तुम्हाला Mahadbtmahait farmer च्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येतो.



6 Comments
    Test22
  1. Prashant Dattatray Dukre says

    What is a sabsydy

  2. Test22
  3. Kunal shrikrushna sarkate says

    Ok

  4. Test22
  5. MahaBhartiYojana says

    Soyabean 50% Anudan Apply here

  6. Test22
  7. Harishchndra Jagannath Arjugade says

    Soyabin tokan yantra

  8. Test22
  9. Vilas Giri says

    ऑनलाइन केल्यावर किती दिवसात घेता येते यंत्र

  10. Test22
  11. Ganesh Ravsahe Raut says

    अर्ज़ कोठे करायचा

Leave A Reply

Your email address will not be published.