Shetkari Yojana Maharashtra Details

Maharashtra Shetkari Protsahan Anudan Yojana


Shetkari Yojana Maharashtra Details

Here we provide the complete information of Shetkari Yojana Maharashtra. See the below listed Yojana in Maharashtra State for the Farmer. Online Registration Portal Link also provided in this page. Candidates read the details like eligibility for the scheme, required documents to apply for the scheme and how to apply for various scheme which is belongs to Shetkari are given here. Keep visit us for further details…

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या टॉप 4 योजना ! तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ मिळतोय ? पहा.

The central and state governments are implementing various schemes for the farmers of the state. India is an agricultural country. More than half of the country’s population is dependent on agriculture. Even in the state, more than half of the population is directly related to agriculture. Due to this, various schemes are being run by the central and state governments for the farmers and persons associated with agriculture in the state. Meanwhile, we will now know about 4 farmer schemes of the Centre and the state being implemented for the farmers.

केंद्र आणि राज्य शासन राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. राज्यातही निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष प्रत्यक्षरीत्या शेतीशी निगडित आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि शेतीशी निगडित व्यक्तींसाठी केंद्र अन राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना चालवल्या जात आहेत. दरम्यान आता आपण शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात असलेल्या केंद्राच्या आणि राज्याच्या 4 शेतकरी योजनांची माहिती जाणून घेणार आहोत.

  1. पीएम किसान सन्मान निधी योजना : या योजनेची सुरुवात मोदी सरकारने केली आहे. ही योजना 2019 मध्ये सुरू झाली. तेव्हापासून ही योजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये दिले जात आहेत. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे एकूण तीन हप्त्यात या योजनेचे पैसे शेतकऱ्यांना ट्रान्सफर केले जातात. दर चार महिन्यांनी एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण होत आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 16 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. या योजनेचा सतरावा हप्ता हा लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी शक्यता आहे.
  2. नमो शेतकरी योजना : नमो शेतकरी महा सन्माननिधी योजना ही शिंदे सरकारने सुरू केलेली स्कीम आहे. पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेला नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे. पी एम किसान योजनेप्रमाणेच या योजनेचे ही निकष आहेत. पी एम किसान अंतर्गत जो लाभ मिळत आहे तोच लाभ नमो शेतकरी अंतर्गत ही दिला जात आहे. आतापर्यंत या योजनेचे तीन हफ्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत.
  3. पीएम किसान मानधन योजना : देशभरातील शेतकऱ्यांना उतार वयात पेन्शन उपलब्ध व्हावी यासाठी या योजनेची सुरुवात झाली आहे. पीएम किसान मानधन योजना ही केंद्रीय पुरस्कृत योजना असून केंद्र शासनाच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा 3,000 रुपये आणि वर्षाला 36,000 रुपयांची पेन्शन दिली जात आहे. पण या योजनेंतर्गत लाभ मिळवण्यासाठी आधी शेतकऱ्यांना काही पैसे गुंतवावे लागतात. ही एक ऐच्छिक योजना आहे. म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळत नाही. जें शेतकरी या योजनेत सहभागी होतील आणि या योजनेत गुंतवणूक करतील त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत ते पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मिळालेल्या हप्त्यातून त्यांच्या प्रीमियमची रक्कम देखील कपात करू शकतात. अशाप्रकारे शेतकरी कोणताही पैसा खर्च न करता या योजनेचा मोफत लाभ घेऊ शकतात.
  4. पीएम कुसुम योजना : या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जात आहेत. या अंतर्गत सौर पंपावर 60 टक्के अनुदान दिले जाते. यातुन शेतकऱ्यांना सौर पंप बसवून 24 तास सिंचनाची सुविधा मिळू शकते. सौर पंपावर सबसिडी व्यतिरिक्त, तुम्ही बँकेकडून 30 टक्के कर्ज देखील मिळवू शकता. अशा परिस्थितीत शासनाच्या कुसुम योजनेंतर्गत केवळ 10 टक्के रक्कम खर्च करून शेतकरी आपल्या शेतात सौरपंप बसवून वीज बिल कमी करू शकतात.

Shetkari Anudan Yojana 50,000 subsidy

SHETKARI

कृषी सिंचन योजना येथून अर्ज करा

Protsahan Anudan Yojana

शेतकऱ्यांना ५० हजाराचे अनुदान

राज्यातील २०१९ मध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या आणि नैसर्गिक आपत्तीच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या; पण नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. तीनपैकी दोन वर्षे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही ५० हजारांचे अनुदान दिले जाईल.

एखादा शेतकरी मरण पावल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्ज परतफेड केली असल्यास त्या वारसालासुद्धा या अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. आधीच्या ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयांमधील बंधने दूर करीत नवीन सरकारने हा निर्णय घेतला. एकूण १४ लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि सरकारच्या तिजोरीवर ६ हजार कोटी रुपयांचा भार पडेल. नैसर्गिक आपत्तीत मदत मिळालेल्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील शेतकऱ्याचा समावेश यापूर्वीच्या निर्णयात करण्यात आलेला नव्हता. आता तो सरसकट सर्व शेतकऱ्यांना दिला जाईल.

कशी होणार अंमलबजावणी?  – नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान देण्यासाठी २०१७ पासून तीन वर्षे नियमित कर्जफेड केलेली असावी, अशी अट आधीच्या सरकारने ठेवलेली होती. आता या तीनपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांत नियमित पूर्ण परतफेड केली असेल तरीही अनुदान दिले जाईल. योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. अल्पमुदत कर्जाची रक्कम ५० हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास कर्जाच्या मुद्दलाच्या रकमेइतका लाभ दिला जाणार आहे.

anudan

कृषी योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

चालू खरीप हंगामामध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत सोयाबीन, मका, बाजरी, मूग, उडीद, तूर यांचे प्रमाणित बियाणे ५० टक्के अनुदानावर व प्रात्यक्षिकांसाठी १०० टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार असून शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे. राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ‘वैयक्तिक शेतकरी योजना’ या शीर्षकांतर्गत ‘बियाणे’ या घटकाचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यासाठी शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर जाऊन ‘शेतकरी योजना’ हा पर्याय निवडावा. शेतकरी बांधव संगणक, लॅपटॉप, सामुदायिक सुविधा केंद्र, ग्रामपंचायतींचे संग्राम केंद्र या ठिकाणांवरून अर्ज करू शकतील. वैयक्तिक लाभार्थी म्हणून अर्ज करू इच्छिणाऱ्या शेतकरी बांधवांना आपला आधार क्रमांक प्रमाणित करून घ्यावा लागणार आहे.

Krushi Yojana apply here

कृषी विभागाच्या विविध योजनांची सोडत काढण्यात आली असून ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे त्यांनी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. कागदपत्रांचा तपशील मेनू मधील ‘कागदपत्रे अपलोड करा/ Upload document’ ह्या टॅब मध्ये जाऊन पाहाव

कृषी योजनेची संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा…

Lists of Shetkari Yojana Maharashtra Details



5 Comments
    Test22
  1. राहुल चाटे says

    स्पिंकलर संच साठी काही योजना आहे का

  2. Test22
  3. Rohit babasaheb hivrale says

    डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वखवलंबन योजना.

  4. Test22
  5. Arun Rathod says

    माला विहीर मजूरी

  6. Test22
  7. MahaBhartiYojana says

    Shetkari Protsahan Anudan Yojana

  8. Test22
  9. Manoj vitthal karale says

    Mala vihir yojana

Leave A Reply

Your email address will not be published.