PMVVY Scheme Complete Details

Pradhanmantri Vaya Vandana Yojana Details


PMVVY Scheme Complete Details

प्रधानमंत्री वय वंदना योजना 2022 क्या है ?

PMVVY Scheme complete details are given here. As you know PMVVY Scheme – Pradhan Mantri Vaya Vandana Yojana is a social security scheme and pension scheme. Government of India launched Pradhan Mantri Vaya Vandana Yojana on 4 May 2017 for senior citizens of the country. This scheme is administered by Life Insurance Corporation of India (LIC). The main objective of Vaya Vandana Yojana is to provide pension to senior citizens of the country. But now the period of this scheme is going to end after four-and-a-half months i.e. on 31st March 2023 and it cannot be assured that this period will be extended any further. Senior citizens must take advantage of this scheme during the remaining four-four and a half months, considering all the aspects of security, extra interest than bank deposits, regular income and loan in case of difficulty. Investment in this scheme can be done only through Life Insurance Corporation of India (LIC).

PMVVY Scheme

पंतप्रधान वय वंदना योजना सविस्तर माहिती

  1. ज्येष्ठांचा आर्थिक आधार असणाऱ्या योजनेसाठी उरले शेवटचे साडेचार महिने
  2. साडेचार महिन्यांनी म्हणजे ३१ मार्च २०२३ रोजी ‘पंतप्रधान वय वंदना योजना’ गुंडाळली जाईल आणि यापुढे तिला मुदतवाढ मिळेल याची खात्री देता येत नाही.
  3. सुरक्षितता, बँकेतील ठेवींपेक्षा मिळणारे जास्तीचे व्याज, नियमित उत्पन्न व प्रसंगी अडचणीच्या वेळी मिळणारे कर्ज याचा विचार करता उर्वरित चार-साडेचार महिन्यांच्या कालावधीत ज्येष्ठांनी या योजनेचा जरूर लाभ घ्यावा.
  4. सध्याचे बँकांचे ठेवीवरील ६ ते ६.२५ टक्क्यांदरम्यानचे व्याजदर ही ज्येष्ठांसाठी एक चिंतेची बाब आहे. त्यातच जास्त परतावा देणाऱ्या शेअर्स आणि म्युचुअल फंडातील गुंतवणुकीतून निश्चित उत्पन्न मिळण्याची नसलेली खात्री व त्यातील जोखीम हे ज्येष्ठांसाठी योग्य नाही आणि त्यांना परवडणारीही नाही. या सर्व बाबींचा विचार करून केंद्र सरकारने १७ मे २०१७ पासून ‘पंतप्रधान वय वंदना योजना’ हा पर्याय ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध करून दिला.
  5. सुरुवातीला ‘पंतप्रधान वय वंदना योजना’ ही फक्त ३१ मार्च २०१८ पर्यंतच उपलब्ध होती. तथापि ज्येष्ठांचा वाढता प्रतिसाद व गरज लक्षात घेऊन हा कालावधी सरकारने वेळोवेळी वाढवत आणला आहे. मात्र आता या योजनेचा कालावधी चार-साडेचार महिन्यांनी म्हणजे ३१ मार्च २०२३ रोजी संपणार आहे व यापुढे हा कालावधी वाढेल याची खात्री देता येत नाही. सुरक्षितता, बँकेतील ठेवींपेक्षा मिळणारे जास्तीचे व्याज, नियमित उत्पन्न व प्रसंगी अडचणीच्या वेळी मिळणारे कर्ज या सर्व बाबींचा विचार करता उर्वरित चार-साडेचार महिन्यांच्या कालावधीत ज्येष्ठांनी या योजनेचा जरूर लाभ घ्यावा. या योजनेत गुंतवणूक केवळ भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) मार्फतच करता येते.

Eligibility for PMVVY Scheme

  1. किमान वय : ६० वर्षे पूर्ण
  2. कमाल वय : कितीही
  3. योजनेचा कालावधी : १० वर्षे
  4. व्याजाचा दर : ७.४ टक्के प्रति वर्ष
  5. किमान / कमाल गुंतवणूक : रु. १,००० दरमहा उत्पन्न मिळेल इतकी किमान गुंतवणूक (सोबत दिलेला कोष्टक पाहावे) आणि कमाल १५ लाख रुपये
  6. पेन्शन: मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक पद्धतीने सोयीनुसार मिळविता येते.
  7. मिळणारी पेन्शन आपण निवडलेल्या पर्यायानुसार एनईएफटी किंवा ‘आधार’समर्थित देयक प्रणालीद्वारे बँक खात्यात जमा होते.
  8. सरेंडर व्हॅल्यू : अपवादात्मक परिस्थितीत म्हणजे पेन्शनर किंवा त्याची पती/पत्नी यांच्या गंभीर आजारपणात खर्चासाठी पॉलिसीतील गुंतवणूक थांबवून ती मोडावीदेखील लागू शकते. म्हणजेच ही पॉलिसी मुदतीआधी ‘सरेंडर’ करता येऊ शकते आणि तोवर गुंतविलेल्या रकमेच्या ९८ टक्के इतकी रक्कम परत मिळविता येऊ शकते.
  9. कर्ज सुविधा : पॉलिसी घेतल्यापासून तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर, गरज पडल्यास कर्ज मिळू शकते आणि असे कर्ज जास्तीत जास्त आपण एकरकमी भरलेल्या रकमेच्या ७५ टक्के इतके मिळू शकते. या कर्जावर सहामाही पद्धतीने व्याज आकरणी होते आणि हे व्याज मिळणाऱ्या पेन्शनमधून वसूल केले जाते आणि मुद्दल रक्कम मुदतीनंतर मिळणारी रक्कम किवा त्याआधी (सरेंडर केल्यास/ पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास) मिळणाऱ्या रकमेतून वसूल केली जाते.
  10. पॉलिसीचा १० वर्षांचा कालावधी संपल्यावर गुंतविलेली रक्कम अधिक शेवटचा पेन्शनचा हप्ता अशी एकत्रित रक्कम परत दिली जाते. (पॉलिसीच्या कालावधीत मृत्यू झाल्यास गुंतविलेली रक्कम वारसास दिली जाते.)
  11. ही पेन्शन पॉलिसी ‘एलआयसी’ एजंटमार्फत अथवा ऑनलाइन पद्धतीनेसुद्धा घेता येते. ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी https://www.licindia.in/ या साइटवर लॉग-इन करावे लागेल. या योजनेत रकम गुंतविताना ‘केवायसी’ची पूर्तता करणे आवश्यक असते तसेच आधार क्रमांकही संलग्न करावा लागतो.
  12. आपण घेतलेल्या पेन्शन पॉलिसीबाबत आपण जर साशंक अथवा असमाधानी असाल तर आपण ही पॉलिसी ‘फ्री लुक पिरियड’मध्ये रद्द करू शकता. आपण पॉलिसी एजंटमार्फत घेतली असेल तर हा ‘फ्री लुक पिरियड’ पॉलिसी घेतल्या तारखेपासून १५ दिवसांपर्यंत असतो आणि जर आपण ती ऑनलाइन घेतली असेल तर हा कालावधी ३० दिवसांपर्यंत असतो. अशा पद्धतीने पॉलिसी रद्द केली गेल्यास, भरलेल्या रकमेतून स्टँप ड्युटी व तत्सम खर्च वजा करून उर्वरित रक्कम परत केली जाते.
  13. सामान्य विमा योजनांमध्ये मुदतीच्या विम्यावर १८ टक्के ‘जीएसटी’ आकारला जातो. परंतु ‘पंतप्रधान वय वंदना योजने’वर ‘जीएसटी’ आकारला जात नाही. या योजनेंतर्गत गुंतवणूक करणाऱ्यास प्राप्तिकर कायद्याच्या ‘कलम ८०सी’अंतर्गत वजावट मिळत नाही. मिळणाऱ्या पेन्शनवर गुंतवणूकदाराच्या उत्पन्नानुसार प्रचलित आणि वेळोवेळी लागू होणाऱ्या कराच्या दरानुसार कर आकारला जातो.

PMVVY Pension details :

गुंतवणूक तितकी पेन्शन.

‘पंतप्रधान वय वंदना योजने’त दरमहा/ तिमाही/ सहामाही / वार्षिक किमान व कमाल पेन्शन मिळण्यासाठी किती रक्कम गुंतवावी लागेल हे खालील तक्त्यावरून सहज ध्यानात येईल. पेन्शन-प्राप्ती किमान पेन्शन / किमान गुंतवणूक कमाल पेन्शन / कमाल गुंतवणूक

  1. दरमहा १,००० / १६२,१६२ ९,२५० / १५,००,०००
  2. तिमाही ३,००० / १६१,०७४ २७,७५० / १४,८९,९३३
  3. सहामाही ६,०००/ १५९,५७४ ५५,५०० / १४,७६,०६४
  4. वार्षिक १२,००० / १५६,६५८ १११,००० / १४,४९,०८६ (सर्व आकडे रुपयांत)

जर वार्षिक पद्धतीने पेन्शन घेण्याचा पर्याय निवडल्यास कमाल गुंतवणूक १४,४९,०८६ रुपये इतकी करावी लागते (१५ लाखांपर्यंतच्या कमाल मर्यादेपर्यंतच योजनेत गुंतवणूक करता येते) व मिळणारा प्रभावी व्याज परतावा हा ७.६६ टक्के इतका असतो.
थोडक्यात असे म्हणता येईल की, जर नियमित उत्पन्न व सुरक्षित गुंतवणूक हवी असेल तर ज्येष्ठांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. परंतु योजनेत गुंतवणुकीची अंतिम मुदत ३१ मार्च २०२३ ही जवळ आली आहे, हेही ध्यानात घेऊन गुंतवणुकीचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा लागेल.

PMVVY Scheme Interest Rate

प्रधानमंत्री वय वंदना योजना ही सामाजिक सुरक्षा योजना आणि पेन्शन योजना आहे. भारत सरकारने ४ मे २०१७ रोजी देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रधानमंत्री वय वंदना योजना सुरू केली. ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळाद्वारे (LIC) चालवली जाते. वय वंदना योजनेचा मुख्य उद्देश देशातील ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन उपलब्ध करून देणे हा आहे.

  1. इतका व्याजदर : – प्रधानमंत्री वय वंदना योजनेत गुंतवणूकीची कमाल मर्यादा १५ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना इतर योजनांच्या तुलनेत गुंतवणुकीवर अधिक व्याज मिळते. या योजनेत ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक मासिक किंवा वार्षिक पेन्शन योजना निवडू शकतात. मासिक पेन्शन योजना निवडल्यास १० वर्षांसाठी ८ टक्के व्याज मिळेल. तर वार्षिक पेन्शन निवडल्यास १० वर्षांसाठी ८.३ टक्के व्याज मिळेल.
  2. गुंतवणूक कशी करावी :-  प्रधानमंत्री वय वंदना योजनेमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही अर्ज करू शकता. तुम्ही एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकता. पेन्शनचा पहिला हप्ता रक्कम जमा केल्यानंतर १ वर्ष, ६ महिने, ३ महिने, १ महिन्यानंतर मिळेल. तुम्ही कोणता पर्याय निवडता यावर ते अवलंबून आहे. गुंतवणुकीवर अवलंबून दरमहा १००० ते ९२५० रुपये पेन्शन दिली जाते. सर्व सामान्य विमा योजनांमध्ये मुदतीच्या विम्यावर १८ टक्के जीएसटी आकारला जातो. परंतु प्रधानमंत्री वय वंदना योजनेवर जीएसटी आकारला जात नाही. या योजनेंतर्गत गुंतवणूक करणाऱ्या नागरिकाकडून प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत वजावटीचा दावा केला जाऊ शकत नाही. परताव्यावर प्रचलित कर कायद्यानुसार आणि वेळोवेळी लागू होणाऱ्या कराच्या दरानुसार कर आकारला जातो.
  3. किती गुंतवणुकीवर किती पेन्शन :- ६० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला मासिक १,००० रुपये पेन्शन हवे असेल तर त्यांना १.६२ लाख रुपये गुंतवावे लागतील. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त ९२५० रुपये पेन्शन मिळू शकते. यासाठी ज्येष्ठ नागरिकांना १५ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.
  4. योजना परत करता येते :- पॉलिसी घेतल्यानंतर काही दिवसांत तुम्हाला त्यात गुंतवणूक चालू ठेवायची नाही असे वाटत असल्यास, तुम्ही ती परत करू शकता. तुम्ही ही पॉलिसी ऑनलाइन खरेदी केली असेल तर ३० दिवसांच्या आत आणि ऑफलाइन पॉलिसीच्या बाबतीत १५ दिवसांच्या आत परत करू शकता.

How to apply fro PMVVY Scheme

अर्ज कसा करायचा?

वय वंदना योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही अर्ज करता येतात. ऑनलाइन अर्ज एलआयसीच्या वेबसाइटद्वारे करता येतो. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला एलआयसीच्या शाखेत जावे लागेल.

Step by step Details of Online apply process

  1. Interested beneficiaries of the country who want to apply under Pradhan Mantri Vaya Vandana Yojana can apply online and offline, 
  2. First of all the applicant has to go to the official website of LIC.
  3. After visiting the official website, the home page will open in front of you.
  4. On this home page, you will see the option of Registration, you will have to click on that option.
  5. After this, the application form will open in front of you.
  6. After this, you will have to fill all the information asked in the form like name, address, Aadhaar number etc.
  7. After filling all the information, you have to upload all your documents and then finally click on the submit button.
  8. In this way your online registration will be completed.

Pradhanmantri Vaya Vandana Yojana Offline Application Process

  1. First of all the applicant has to contact his nearest LIC branch.
  2. After this, going to the branch, he will have to give all his documents to the officer and give all his information.
  3. LIC agent will make your application under this scheme.
  4. After the verification of the application, the LIC agent will initiate your policy of this scheme.

Required Documents for PMVVY Yojana

आवश्यक कागदपत्रे

  1. – आधार कार्ड
  2. – पॅन कार्ड
  3. – जन्म प्रमाणपत्र
  4. – पत्त्याचा पुरावा
  5. – उत्पन्न प्रमाणपत्र
  6. – बँक खाते पासबुक
  7. – अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  8. – सेवानिवृत्ती पडताळणी दस्तऐवज



2 Comments
    Test22
  1. Murlidhar Raoji Mainkar says

    माझे ८५ वय ३० जानेवारी २०२३ रोजी पूरेहोत आहे. माझी बहुतेक नोकरी खाजगीकंपनीमध्ये झाली आहे. त्यामुळे माझ्याकडे कंपनी सोडल्याची सर्टिफिकेटे नाहीत. बाकी लागणारी कागदपत्रे माझ्या कडे आहेत. मी आन लाईन फार्म कसा भ रू?

  2. Test22
  3. MahaBhartiYojana says

    PMVVY Scheme Complete Details

Leave A Reply

Your email address will not be published.