PMC Disability Welfare Scheme Details


PMC Disability Welfare Scheme Details

PMC DWS Complete details are available here. PMC Disability Welfare Scheme is for Backward Classes of Pune Municipal Corporation which are mention briefly below. Candidates go to the complete article to understand the PMC Disability Welfare Scheme. Various schemes and Training program has been organised for Disable candidates. Divyang Kalyanakari Yojana implemented by Pune Municipal Corporation includes free bus travel pass scheme, financial assistance for purchase of artificial limbs, financial assistance for self-employment, financial assistance for vocational training, financial assistance for higher education etc., See more details below …

Pune Mahanagarpalika Divyang Yojana Online Apply

महिला व बाल कल्याण योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, युवक कल्याणकारी योजना दिव्यांग कल्याणकारी योजना या योजनांअंतर्गत युवक, युवती, महिला, पुरूषांकडून खालील योजनांसाठी ऑनलाईन. पद्धतीने अर्ज मागविणेत येत आहे. उपरोक्त योजनांचे अर्ज दि. २४ एप्रिल २०२३ ते दि. ३० जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने dbt.punecorporation.org या संकेतस्थळावरती भरणेत यावेत. तसेच या बाबतचा तपशील व अटी व शर्ती या पुणे महानगरपालिकेच्या dbt punecorporation.org या संकेतस्थळावरती बघण्यात यावे. अधिक माहितीसाठी संपर्क क्र. १८००१०३०२२२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

Complete Details of Divyang Yojana

पुणे महानगरपालिकेने राबविलेल्या दिव्यांग कल्याणकारी योजने मध्ये मोफत बसप्रवास पास योजना, कृत्रिम अवयव खरेदीसाठी अर्थसहाय्य, स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य, व्यावसायिक प्रशिक्षणासाठी अर्थसहाय्य, उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य अश्या अनेक योजनांचा समावेश आहे… सविस्तर माहिती खाली पहा…

पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग, कल्याणकारी योजनांचे जाहीर प्रकटन

दिव्यांग कल्याणकारी योजना, महिला व बाल कल्याण योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, युवक कल्याणकारी योजना अंतर्गत

  1. १) अपंग (दिव्यांग) व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य
  2. २) अपंग (दिव्यांग) व्यक्तींना अल्पकालीन व्यवसाय प्रशिक्षण घेण्यासाठी अर्थसाहाय्य
  3. ३) अपंग (दिव्यांग) विद्याथ्यांना दीर्घ मुदतीचे शैक्षणिक वा तांत्रिक अभ्यासक्रमासाठी अर्थसाहाय्य
  4. ४) अंध, अपंग (निः समर्थ), विकलांग, मूकबधिर व्यक्तींना कृत्रिम अवयव घेणेसाठी योजना
  5. ५) महापालिका क्षेत्रातील मतिमंद व्यक्तींचा सांभाळ करणाऱ्या महापालिका हद्दीतील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेस अथवा मतिमंद व्यक्तीच्या पालकांस अर्थसाहाय्य
  6. ६) दिव्यांग दिव्यांग, दिव्यांग अव्यंग व्यक्तींच्या विवाहासाठी अर्थसाहाय्य
  7. ७) दिव्यांग व्यक्तींनी स्थापित केलेल्या कला पथकास वाद्यखरेदीसाठी अर्थसाहाय्य
  8. ८) दिव्यांग व्यवसाय गटांनी सुरू केलेल्या व्यवसायाच्या वृद्धीकरिता अर्थसाहाय्य
  9. ९) किमान ६०% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग व्यक्तींना वार्षिक अर्थसाहाय्य
  10. १०) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता सायकल सुविधा
  11. ११) परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुदान
  12. १२) पुणे मनपातील घाणभत्ता मिळणाऱ्या मागासवर्गीय सेवकांचे मुलांसाठी अर्थसाहाय्य
  13. १३) पुणे महानगरपालिका हद्दीतील कचरावेचक व बायोगॅस प्रकल्पावर काम करणारे तसेच कचऱ्याच्या संबंधित काम करणाऱ्या सर्व असंघटित कष्टकरी कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्यासाठी अर्थसाहाय्य
  14. १४) कमवा व शिका
  15. १५) स्वयंरोजगारासाठी अनुदान
  16. १६) व्यसनमुक्तीसाठी अर्थसाहाय्य
  17. १७) लाडकी लेक (मुलगी दत्तक) योजना
  18. १८) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या कुटुंबांना प्रोत्साहनपर योजना
  19. १९) विधवा महिलांना अर्थसाहाय्य
  20. २०) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त माता रमाई भीमराव आंबेडकर योजनेअंतर्गत गवनि घोषित व शहरी गरीब योजनेतील पात्र ठरणाऱ्या विधवा, निराधार महिलांसाठी प्राथमिक आरोग्य संगोपनकरिता अर्थसाहाय्य
  21. २१) माता रमाई स्वावलंबन योजनेअंतर्गत सर्व स्तरांतील विधवा, परितक्त्या, निराधार महिलांना प्राथमिक आरोग्य संगोपनकरिता अर्थसाहाय्य
  22. २२) झोपडी दुरुस्तीसाठी अर्थसाहाय्य
  23. २३) वैयक्तिक नळ कनेक्शनसाठी अर्थसाहाय्य
  24. २४) वैयक्तिक वीज कनेक्शनसाठी अर्थसाहाय्य
  25. २५) वैयक्तिक शौचालय बांधणेसाठी अर्थसाहाय्य

या योजनांचे अर्ज dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावरती दि. ०१ जुलै २०२३ ते दि. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत नागरिकांना उपलब्ध करण्यात येत असून, ज्या नागरिकांना पुणे मनपाच्या योजनांचे लाभ घ्यावयाचे आहेत, त्यांनी योजनांसाठीची पात्रता तपासून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज ऑनलाइन पद्धतीने dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावरती भरावेत. अ. क्र. २२ ते २५ या योजनांची अंमलबजावणी क्षेत्रीय कार्यालयामार्फत केली जाईल.
याबाबतचा तपशील व अटी व शर्ती या पुणे महानगरपालिकेच्या dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावरती बघण्यात यावे. अधिक माहितीसाठी संपर्क क्र. १८००१०३०२२२या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा अथवा नजीकच्या क्षेत्रीय कार्यालयात समूहसंघटिकांशी संपर्क साधावा.

पुणे महानगरपालिकेने राबविलेल्या दिव्यांग कल्याणकारी योजना

पुणे महानगरपालिकेने राबविलेल्या दिव्यांग कल्याणकारी योजनांची माहिती खालीलप्रमाणे:

  1. मोफत बसप्रवास पास योजना पुणे शहरातील सर्व दिव्यांग व्यक्तींना पीएमपीएमएल बसेसचे मोफत वार्षिक पासेस दिले जातात. या पासेसची रक्कम पुणे महानगरपालिकेकडून पीएमपीएमलला दिली जाते.
  2. कृत्रिम अवयव खरेदीसाठी अर्थसहाय्य पुणे महानगरपालिकेच्या समाजविकास विभागातर्फे दिव्यांग व्यक्तींना श्रवणयंत्र, व्हीलचेअर, तीनचाकी वाहन व अन्य कृत्रिम अवयवांच्या खरेदीसाठी रु. २०,००० पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते.
  3. स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य पुणे महानगरपालिकेतर्फे १८ ते ४५ वयोगटातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी रु. ५००० इतके अर्थसहाय्य दिले जाते.
  4. व्यावसायिक प्रशिक्षणासाठी अर्थसहाय्य – पुणे महानगरपालिकेच्या समाजविकास विभागातर्फे सरकारमान्य संस्थांमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या व्यक्तींना रु.१०,००० इतके अर्थसहाय्य दिले जाते.
  5. उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्यः पुणे महानगरपालिकेतर्फे वैद्यकीय, संगणकविषयक, इंजिनिअरिंग, एमबीए इत्यादी पदविका, पदवी व तत्सम शासनमान्य संस्थेत व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या पुर्ण कालावधीत दरवर्षी रु. १०,००० अर्थसहाय्य दिले जाते. यासाठी विद्यार्थ्याला दरवर्षी किमान उत्तीर्ण गुण मिळणे आवश्यक आहे.

योजनांविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही ठिकाणी संपर्क साधाः

  • प्रभाग पातळीवरील समुह संघटिकांचे कार्यालय, पुणे
  • तुमच्या जवळील क्षेत्रिय कार्यालय
  • समाज विकास कार्यालय, एस.एम. जोशी हॉल, दारुवाला पूल, रास्ता पेठ, पुणे
  • अधिक माहितीसाठी संपर्क साधा- ०२०-२५५०१२८१/८२/८३/८४

Various Disability Welfare Scheme in PMC

In order to support and empower the differently – abled citizens of India, Pune Municipal Corporation have launched several schemes for them. The schemes are as follows:

  1. Free bus pass scheme: The scheme provides an annual free pass to the all differently-abled citizens to travel through local government transport i.e. PMPML buses, provided citizen resides in the jurisdiction area of Pune Municipal Corporation. The number of application received for the Free bus pass scheme decides the amount to be paid to the PMPML by PMC.
  2. Financial aid for the Prosthetic device to the disabled: SDD gives financial aid up to Rs. 20,000 for purchasing a hearing aid, wheelchair and tricycle.
  3. Financial assistance for self-employment to Disabled people: Under this scheme, financial assistance of Rs.5000 is provided to the differently abled individuals between the age group of 18 to 40 years to start their own business.
  4. Grant for Vocational training: Social Development Department of Pune Municipal Corporation provides a training cost of Rs. 10,000 to the differently-abled people who have completed a vocational training course at government approved centers.
  5. Grant for higher education: Under this scheme, the students, who are opting for higher education through government-approved degree/diploma, are given financial aid of Rs. 10,000 by Pune Municipal Corporation. The grant is given every year until the course ends. The students have to earn minimum passing marks throughout the course.

How to Apply for PMC Disability Welfare Scheme

To know more about the schemes of Social Development Department, please contact

  • Office of Group Organizer (Samuhsanghatika) Pune
  • Nearest Ward Office
  • Social Development Office, SM Joshi Hall, Daruwala Pool, Rasta Peth, Pune
  • Contact number: 020-25501281/82/83/84


5 Comments
    Test22
  1. MahaBhartiYojana says

    PMC दिव्यांग कल्याणकारी योजना

  2. Test22
  3. Gopal Khavale says

    आई अपंग आहे 40%

  4. Test22
  5. मंगेश वसंत वराडे says

    अपंग आहे 80% कानाने

  6. Test22
  7. सौरभ घोडके says

    दिवयांग बस प्रवास पास काढुन 15 दिवस झालेत . पास केव्हा मिळणार.

  8. Test22
  9. Madhav Sonaba Shete says

    My son permanently mentally retardefd 90 per cent. Can I apply for direct benefits.

Leave A Reply

Your email address will not be published.