Mhada Zopu Yojana
Mhada Zopu Yojana – The Mumbai board of MHADA has taken the first step to implement the zopu Yojana, which includes 14,000 huts in Malad and Malwani. As many as 21 stalled slum rehabilitation schemes of the Slum Rehabilitation Authority have been handed over to MHADA. This is the biggest sleep scheme among them. Under this, it has been decided to appoint a consultant and architect for the rehabilitation plan of Rajiv Gandhi Nagar, located on 51 hectares of land, for which the Mumbai Board issued a tender on Saturday. Accordingly, the architect will manage the project to implement the tender process, including preparing the project plan. The project will take six years to complete.
म्हाडाची सर्वात मोठी झोपु योजना – मालवणीतील १४ हजार झोपड्यांचे सहा वर्षांत पुनर्वसन
Mhada Zopu Yojana – मालाड, मालवणी येथील १४ हजार झोपड्यांचा समावेश असलेली झोपु योजना मार्गी लावण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने पहिले पाऊल उचलले आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या रखडलेल्या २१ झोपडपट्टी पुनर्वसन योजना म्हाडाकडे सोपविण्यात आल्या आहेत. त्यापैकी ही सर्वात मोठी झोपु योजना आहे. याअंतर्गत ५१ हेक्टर जागेवर वसलेल्या राजीव गांधी नगरच्या पुनर्वसन योजनेसाठी सल्लागार आणि वास्तुविशारदाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी यासाठी शनिवारी मुंबई मंडळाने एक निविदा प्रसिद्ध केली. त्यानुसार वास्तुविशारद प्रकल्प आराखडा तयार करण्यासह निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन करणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी लागणार आहे.
- आतापर्यंत म्हाडाच्या तीन योजनांना आशय पत्र – राज्य सरकारच्या निर्देशानुसार झोपु प्राधिकरणाने सोपविलेल्या २१ झोपु योजनांपैकी १७ व्यवहार्य योजना म्हाडाचे मुंबई मंडळ मार्गी लावणार आहे. मंडळाने जोगेश्वरीतील साई बाबा झोपु योजना, कुर्ल्यातील श्रमिक नगर आणि चेंबूरमधील जागृती झोपु योजना हाती घेतल्या आहेत. या तिन्ही योजना १५०० ते २००८ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या असून त्यासाठी झोपु प्राधिकरणाकडून मंडळास आशय पत्र (एलओआय) प्राप्त झाले आहे. मात्र, मंडळाच्या गोरेगाव विभागाने हाती घेतलेल्या राजीव गांधी नगर पुनर्वसन योजनेअंतर्गत ५१ हेक्टरवरील तब्बल १४ हजार झोपड्यांचे पुनवर्सन केले जाणार आहे.
- १५ वर्षांपासून रखडलेली योजना – राजीव गांधी नगर झोपु योजना खासगी विकासकाच्या माध्यमातून मार्गी लावण्यात येणार होती. त्यासाठी विकासकाची नियुक्तीही करण्यात आली होती. मात्र आर्थिक आणि तांत्रिक कारणामुळे १५ वर्षांपासून ती रखडली. आता सहा वर्षांत झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसनाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
- रमाबाई नगरच्या धर्तीवर पुनर्वसन – एमएमआरडीए घाटकोपरमधील माता रमाबाई नगर, कामराज नगरचे पुनर्वसन संयुक्त भागीदारी तत्वावर करीत आहे. ही योजनेप्रमाणेच राजीव गांधी नगर योजनाही मार्गी लावली जाणार आहे. रमाबाई नगरप्रमाणेच राजीव गांधी नगरमधील झोपड्यांची संख्याही १४ हजार इतकी आहे.
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |
Mhada Zopu Yojana