MaherGhar Scheme
गर्भवती महिलांसाठी राज्यभरात 'माहेर योजना'
Table of Contents
MaherGhar Scheme Details & Benefits
MaherGhar Scheme is also know as Maher Yojana or Native Yojana. On the occasion of Women’s Day, R. B. G. The Foundation has launched ‘Maher Yojana’. Under this scheme, Maher Yojana van will be available at women’s doorsteps to provide free medical services to needy pregnant women. This scheme will try to reduce maternal and infant mortality to zero. The Main Objective of this scheme to provide accommodation to the expectant mother and her child for ascertainment of pregnancy in a safe and medical facility.
Most of the tribal population lives in slums in the hilly areas. There are no paved roads in many places in the tribal padas. Also, paved roads do not guarantee timely availability of convenient transportation for pregnant women to reach the nearest primary health center. This is a major reason for the rise in maternal and child mortality. By providing transport system to every tribal pada, the state government has started Maher Ghar Yojana under the National Health Campaign from the year 2010-11, keeping in mind the problems of broken telephone and mobile service in remote tribal areas, which are economically impossible.
गर्भवती महिलांसाठी राज्यभरात ‘माहेर योजना’
माहेर योजना उद्दिष्टेः- सुरक्षित व वैद्यकीय संस्थामध्ये बांळतपण निश्चित करण्यासाठी गरोदर मातेला व तिच्या लहान मुलाला निवासाची सोय उपलब्ध करुन देणे.
बहुतांश आदिवासी लोकसंख्या ही डोंगराळ प्रदेशात पाडयांमध्ये वास्तव्यास असते. आदिवासी पाडयांमध्ये अनेक ठिकाणी पक्के रस्ते नाहीत. तसेच पक्के रस्ते असल्यास गर्भवती महिलांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहचण्यासाठी सोयस्कर वाहतुक व्यवस्था वेळेवर उपलब्ध होईल याची शाश्वती नसते. हे माता व बाल मृत्यचे प्रमाण वाढण्यास महत्वाचे कारण आहे. प्रत्येक आदिवासी पाडयास वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध करुन आर्थिकदृष्टया अशक्य, दुर्गम आदिवासी भागात खंडीत दुरध्वनी व मोबाईल सेवा या अडचणी लक्षात घेऊन राज्य शासनाने सन २०१०-११ पासून राष्ट्रीय आरोग्य अभियनांतर्गत माहेर घर योजना सुरु करण्यात आलेली आहे.
Overview of MaherGhar Scheme
- राज्यभरातील शहरांमधील झोपडपट्टय़ांसह गाव, वाडय़ा, वस्त्या, आदिवासी पाडे, तांडय़ांवरच्या गर्भवती आणि तिच्या नवजात बाळाची काळजी घेण्यासाठी महिला दिनाचे औचित्य साधून आर. बी. जी. फाऊंडेशनने ‘माहेर योजना’ सेवेत आणली आहे. या योजनेअंतर्गत गरजू गर्भवतींना मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी माहेर योजनेची व्हॅन महिलांच्या दारात उपलब्ध असेल. या योजनेमुळे प्रसूती काळातील गर्भवती आणि अर्भकाच्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याचा प्रयत्न राहणार आहे.
- गाव, खेडे, वाडय़ा-वस्त्यांमध्ये पुरेशा आरोग्य सुविधा नसल्याने गर्भवती महिलांचे हाल होतात. वेळेत उपचार न मिळाल्याने काही जणींना जीव गमवावा लागला आहे. ग्रामीण भागातील अशा गरजू गर्भवती महिलांना चांगल्या सुविधा देण्याचा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर गरजू गर्भवतींच्या घरी जाऊन सुरक्षित प्रसूतीची हमी देण्यासाठी आर. बी. जी. फाऊंडेशनने ‘माहेर योजने’चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. महिला दिनाचे औचित्य साधून या योजनेतून विविध भागांत २५ व्हॅन सुरू होणार आहेत.
- गर्भवतींची नोंद ठेवण्यापासून त्यांच्या नियमित तपासण्या, त्यावरचे उपचार, त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर आणि अन्य कर्मचारी सेवेत असतील. ज्यामुळे प्रत्येक जणींना घरातून हॉस्पिटलपर्यंत सुखरूप नेऊन नेमके उपचार पुरविणे सोयीचे होईल, अशी माहिती आर. बी. जी. फाऊंडेशनच्या अध्यक्ष मधुरा गेठे यांनी दिली.
Benefits of Maher Ghar Scheme
माहेर घरामध्ये देण्यात येणारे लाभः-
- माहेर घरांमध्ये खाटा, शौचालय आणि स्नानगृह, धुर विरहीत चुलीसह एक किचन ओटा व गरम पसण्यासाठी खोलीच्या छपरावर सोलर वॉटर सिस्टमची सोय उपलब्ध करण्यात आलेली आहे.
- या योजनेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात एक खोली (माहेर घर) बांधण्यात आलेली आहे.
- माहेर घरामध्ये गर्भवती महिला प्रसूतीपुर्वी चार ते पाच दिवस अगोदर भर्ती करण्यात येते.
- गर्भवती माहिलेची प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांकडून नियमित तपासणी करण्यात येते आणि तपासणी दरम्यान गुंतागुंत आढळल्यास तिला जवळच्या आरोग्य संस्थेत संदर्भीत करण्यात येते.
- माहेर घरामध्ये गर्भवती माहिला, तिचे लहान मुल व एक नातेवाईक यांची राहण्याची सोय करण्यात आलेली आहे.
- माहेर घरांची देखभाल ठेवण्यासाठी व गर्भवती महिला, तिचे लहान मूल व एक नातेवाईक यांना भोजनाची सोय करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीमार्फत महिला स्वंयसहाय्यता बचत गट किंवा दारिद्रय रेषेखालील कुंटूंबाची निवड करण्यात आलेली आहे.
- निवड करण्यात आलेल्या बचत गटाला किंवा दारिद्रय रेषेखालील कुंटुंबाला एका लाभार्थीमागे रु. ५००/- देण्यात येत आहेत.
How to work Maher Ghar Scheme
- कार्यक्रमाची सद्यस्थितीः- माहेर घर ही योजना राज्यातील नऊ आदिवासी जिल्हयामधील ५७ प्राथमिक आरोग्य केंद्रात राबविण्यात येत आहे.
- सेवा देणा-या संस्था:- राज्यात ९ जिल्हयातील ५७ प्राथमिक आरोग्य केंद्रात माहेर घर बांधण्यात आले आहे. माहेर घर ही योजना ठाणे (४), नाशिक (२), नंदुरबार (९), नांदेड (३), यवतमाळ (२), गोंदिया (१३), चंद्रपूर (७), गडचिरोली (८) व अमरावती (९) इ. कार्यरत आहेत.
- निर्देशक निहाय झालेले कार्यः- सन २०१०-११ या वर्षात ९६९ गरोदर मांतानी योजनेचा लाभ घेतलेला आहे. तसेच सन २०११-१२ या वर्षात १,७४४ गरोदर मातानी योजनेचा लाभ घेतलेला आहे. सन २०१२-१३ या वर्षासाठी केंद्र सरकारने या योजनेसाठी रु. ७६ लक्ष अनुदान मंजूर करण्यात आलेले आहेत. १ एप्रिल २०१२ ते ३१ डिंसेबर २०१२ पर्यंत १७८८ गरोदर मांतांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे.
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |
MaherGhar Scheme Details & Benefits
Asha worker banne ke liye form kahan bhare
Me Frome kasa bharu
Mala paise nahi bhetla garbhabati che