MahaDBT Scholarship

Shahu Maharaj Scholarship


MahaDBT Scholarship Application Process

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी नवीन आणि नूतनीकरणाचे अर्ज प्रक्रिया सुरू

MahaDBT Scholarship 2022-2023 | स्कॉलरशिप अप्लिकेशन फॉर्म आणि अर्जाची लिंक : The online acceptance of fresh and renewal applications for the post-matric scholarship has been started now. The post-matric scholarship Scheme for the students implemented by the Department of Social Justice for the current academic year 2022-23 for students belonging to scheduled castes has been started from September 22, 2022. From the academic year 2018-19 through the system “MahaDBT Portal” Government of India Post Matric Scholarship, State Government Tuition Fee, Examination Fee Reimbursement Scheme, Rajarshi Shahu Maharaj Post Matric Merit Scholarship and Subsistence Allowance (Tuition Allowance) etc. Plans are implemented. Read the more details given below:

Mahajyoti – महाज्योती मार्फत पोलीस-सैन्यदल भरतीसाठी प्रशिक्षण

Shahu Maharaj Scholarship Date extension

Scholarship

MahaDBT Aaple sarkar portal

MahaDBT Scholarship

MahaDBT Scholarship 2022 Apply Link

mahadbt

  1. सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता राबविण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांची चालू शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता महाडीबीटी पोर्टलवरून नवीन आणि नूतनीकरणच्या अर्जाची ऑनलाईन स्वीकृती २२ सप्टेंबर २०२२ पासून सुरू करण्यात आली आहे. जिल्हा पातळीवर सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयांकडून त्यांच्या अधिनस्त असलेल्या शैक्षणिक व महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्या प्रत्यक्ष बैठका घेऊन वेळापत्रकानुसार तंतोतंत अंमलबजावणी करण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाकडून दिले आहेत.
  2. सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून “महाडीबीटी पोर्टल” या प्रणालीद्वारे भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, राज्य शासनाच्या शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क प्रतीपूर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज मॅट्रीकोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यवसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना निर्वाह भत्ता (विद्यावेतन) इत्यादी योजना राबविण्यात येतात. या शैक्षणिक वर्षापासून महाडीबीटी पोर्टलवरून प्रामुख्याने भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती तसेच राज्य शासनाची शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क प्रतीपूर्ती योजनेअंतर्गत प्रतिवर्षीची अर्ज संख्या लक्षात घेता तसेच या योजनेबाबत केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचना नुसार नोंदणीकृत होणाऱ्या अर्जावर तात्काळ ऑनलाईन प्रक्रिया करून हे अर्ज विहीत वेळेत निकाली काढणे आवश्यक आहे.
  3. कनिष्ठ महाविद्यालयातील अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीसाठी प्राप्त झालेले नवीन अर्ज दिनांक 8 ऑक्टोबर, २०२२ पर्यंत संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी ऑनलाईन अग्रेषित करणे आवश्यक आहे तर संबंधित जिल्ह्याच्या सहायक आयुक्तांनी प्राप्त झालेले अर्ज मंजूर करण्याची कार्यवाही १५ ऑक्टोबर, २०२२ पर्यंत करणे आवश्यक राहील. तर नूतनीकरण अर्जासाठी महाविद्यालयांसाठी ही मुदत १५ ऑक्टोबर, २०२२ तर सहायक आयुक्तांसाठी २२ ऑक्टोबर ही असेल.
  4. वरिष्ठ महाविद्यालयातील बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीसाठी प्राप्त झालेले नवीन अर्ज दिनांक २० ऑक्टोबर, २०२२ पर्यंत संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी ऑनलाईन अग्रेषित करणे आवश्यक आहे तर संबंधित जिल्ह्याच्या सहायक आयुक्तांनी प्राप्त झालेले अर्ज मंजूर करण्याची कार्यवाही ३१ ऑक्टोबर, २०२२ पर्यंत करणे आवश्यक राहील. तर नूतनीकरण अर्जासाठी महाविद्यालयांसाठी ही मुदत १५ ऑक्टोबर, २०२२ तर सहायक आयुक्तांसाठी ३१ ऑक्टोबर ही असेल.
  5. वरिष्ठ महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीसाठी प्राप्त झालेले नवीन अर्ज दिनांक ७ नोव्हेंबर, २०२२ पर्यंत संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी ऑनलाईन अग्रेषित करणे आवश्यक आहे तर संबंधित जिल्ह्याच्या सहायक आयुक्तांनी प्राप्त झालेले अर्ज मंजूर करण्याची कार्यवाही १५ नोव्हेंबर, २०२२ पर्यंत करणे आवश्यक राहील. तर नूतनीकरण अर्जासाठी महाविद्यालयांसाठी ही मुदत ३१ ऑक्टोबर, २०२२ तर सहायक आयुक्तांसाठी ७ नोव्हेंबर, २०२२ ही असेल असे समाजकल्याण विभागाकडून प्रसिध्दीस देण्यात आले आहे.
Apply Link


4 Comments
    Test22
  1. Purushottam janrao says

    प्रोफेशनल कोर्स ला एकदा स्कोरलशिप घेतल्यावर नंतर व्यवसायिक कोर्स दुसरे वर्ष तिकडे स्कोरशिप मिळेल का

  2. Test22
  3. Purushottam janrao says

    बी कॉम ला स्कॅलशिप घेतल्यावर नंतर व्यवसायिक कोर्स घेतल्यावर तिकडे स्कोरशिप मिळेल का

  4. Test22
  5. Anjali says

    A

  6. Test22
  7. MahaBhartiYojana says

    Shahu Maharaj Scholarship

Leave A Reply

Your email address will not be published.