Kanyadan Yojana Maharashtra


Kanyadan Yojana Maharashtra

Kanyadan Yojana Maharashtra is a social welfare program administered by Social Justice & Special Assistance Department https://sjsa.maharashtra.gov.in. Kanyadan Yojana’s main objective is to Finacial Assistance to newly married couples. This scheme intends to provide financial assistance and utility gifts to newly married couples of the poor family. The Maharashtra Government has launched this welfare scheme to support the well-being of the poor families of the state.

कन्यादान योजनेत मिळणार 20 हजार रुपये

April 2021 updates : मागास प्रवर्गातील गरीब मुला-मुलींच्या लग्नात आर्थिक मदत व्हावी, यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सुरू केलेल्या कन्यादान योजनेत दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

 • सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन विवाह करणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील मुलींच्या पालकांना 20 हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. ही रक्‍कम पूर्वी 10 हजार होती व ती वस्तुरूपाने दिली जायची; मात्र आता मुलीच्या आईच्या नावाने या रकमेचा लग्नसमारंभ पार पडल्यानंतर धनादेश दिला जाणार आहे.
 • लग्नसोहळ्यातील अनाठायी खर्चापायी कर्जबाजारी होणे व त्यातून वधुपित्याला आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागतो. यातून मार्ग काढण्यासाठी व विवाहात होणारा अनावश्‍यक खर्च टाळण्यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करणाऱ्या वरील प्रवर्गातील मुलींच्या लग्नासाठी समाजकल्याण विभागाकडून कन्यादान योजना 2003-04 पासून राबविण्यात येत आहे.
 • सुरवातीला सोहळ्यात लग्न करणाऱ्या नवबौद्धांसह अनुसूचित जाती, विमुक्‍त जाती, धनगर, वंजारींसह भटक्‍या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील वधूंना पूर्वी 6 हजार रुपयांचे मंगळसूत्र व 4 हजार रुपयांचे संसारोपयोगी साहित्य दिले जायचे. त्यात नुकताच बदल करण्यात आला आहे. आता ही आर्थिक मदत 20 हजार रुपये करण्यात आली आहे. पूर्वी वस्तूंच्या रूपात दिली जाणारी मदत आता धनादेशाद्वारे वधूच्या आई किंवा वडिलांच्या नावाने देण्यात येणार आहे.

कन्यादान योजनेखाली नवदाम्पत्यांना अर्थसहाय्य (विजाभज)

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
1 योजनेचे नांव कन्यादान योजनेखाली नवदाम्पत्यांना अर्थसहाय्य (विजाभज)
2. योजनेचा प्रकार राज्य
3. योजनेचा उद्देश महाराष्ट्रात अनुसूचित जाती,विमुक्त जाती,भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील वेगवेगळया जाती, जमातीतील लोंकाचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणा कमी करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे
4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अनुसूचित जाती/विमूक्त जाती/भटक्या जमाती/इतर मागासवर्ग / विशेष मागासवर्ग
5. योजनेच्या प्रमुख अटी वधु व वर हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असले पाहिजे

Latest updates वराचे वय 21 वर्ष व वधुचे वय 18 21 वर्षपेक्षा कमी असू नये

जातीचे प्रमाणपत्र सक्षम व प्राधिकृत अधिका-याने दिलेले असावे

वधु-वर यांच्या प्रथम विवाहासाठी हे अनुदान अनुज्ञेय राहील

नवदांपत्यांतील वधू/वर यापैकी दोन्ही किंवा एक जण हे अनुसूचित जाती (नवबौध्दासह) विमुक्त जाती, भटक्या जमाती (धनगर व वंजारीसह ) विशेष मागास प्रवर्गातील असावेत.

बाल विवाह प्रतिबंध कायदा व हुंडा प्रतिबंध कायदयांतर्गत असलेल्या कोणत्याही कलमाचा भंग या दाम्पंत्य/कुटूंब यांचे कडून झालेला नसावा या बाबत लेखी प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक

6. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप महाराष्ट्रात अनुसुचित जाती (नवबौध्दांसह ) विमुक्त जाती, भटक्या जमाती (धनगर व वंजारीसह ) विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्टया कमकुवत असलेल्या मागासवर्गीय कुटुंबातील सामुहिक विवाह सोहळयामध्ये सहभागी होऊन विवाह करणा-या जोडप्यांना रु 10000/-(20000/-) इतके अर्थसहाय्य देण्यात येते.
सामुहिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्या-या संस्था व संघटनांना प्रत्येक जोडप्या मागे रु 2000/- असे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते.
या योजनेचा लाभ फक्त प्रथम विवाहासाठी तथापि विधवा महिलेस दुस-या विवाहाकरिता अनुज्ञेय आहे.
7. अर्ज करण्याची पध्दत संबधीत स्वंयसेवी संस्थेने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचेकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.
8. योजनेची वर्गवारी सामाजिक सुधारणा
9. संपर्क कार्यालयाचे नांव संबधीत जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी

Required Documents for Kanyadan Yojana

 1. Composite Code – Registration card under the labour cadre
 2. BPL Card for beneficiaries living below the poverty line
 3. Court order in case of ex-husband’s
 4. Death Certificate in case of a widow
 5. Applicant’s voter ID
 6. Residence certificate
 7. Income certificate

How to Apply for Kanyadan Yojana

 • The concerned NGO is required to submit a proposal to the Assistant Commissioner of Social Welfare.

Official Website1 Comment
  Test22
 1. Sk Imran sk hasan Kureshi says

  Job

Leave A Reply

Your email address will not be published.