EPFO Pension
EPFO Pension Calculator, Apply & Withdraw Process
Table of Contents
EPFO Pension Apply & Withdraw Process given here. If you want to get a huge amount as pension after retirement, there is good news for you. Employees’ Provident Fund Organization (EPFO) has started the application process for higher pension under the Employees’ Pension Scheme. For this, members and employers can apply jointly. The Supreme Court had given four months to the employees who did not opt for the revised scheme. With 15 days left for the expiry of the four-month deadline given by the Supreme Court, the EPFO has withdrawn the circular and issued instructions. Read the complete details given below:
EPS Calcultor, EPS Benefits
तुमची कंपनी खरचं तुमच्या पीएफ खात्यात पैसे टाकतेय का? कसं समजेल?
नवीन ठिकाणी नोकरी सुरू केली तर एचआर तुम्हाला तुमच्या पगाराचं पूर्ण स्वरुप सांगत असतात. त्यात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पीएफमध्ये टाकले जाणारे पैसे. तुमची कंपनी तुमच्या पगारातून किती पैसे पीएफसाठी कापते आणि कंपनीचा त्यात सहभाग किती हे जाणून घेणं आवश्यक आहे. कंपनी दर महिन्याला कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी म्हणजेच पीएफ म्हणून तुमच्या पगारातून पैसे कापत असते. या पीएफच्या खात्यात जमा झालेल्या पैशांवर काही वार्षिक व्याज देखील मिळत असते.
कोणत्याही कर्मचाऱ्याचा बेसिक पे आणि डीएचा १२ टक्के भाग पीएफ खात्यात जमा केला जातो. कंपनीकडूनही कर्मचाऱ्याच्या खात्यात १२ टक्के योगदान दिलं जातं. कंपनीकडूनही कर्मचाऱ्याच्या खात्यात १२ टक्के योगदान दिलं जातं. कंपनी सहभागातून ३.३७ टक्के रक्कम ईपीएफ खात्यात क्रेडिट केली जाते. तर ८.३३ टक्के रक्कम पेन्शन स्कीममध्ये जमा केले जातात.
How To Check PF Account Money
किती पैसे आले कसं कराल चेक
- यासाठी तुमच्या ईपीएफ खात्याचं पासबूक तपासावं लागेल.
- पैसे कधी आणि किती जमा केले याचा तपशील तुमच्या पासबूकमध्ये असेल.
- तुम्ही ईपीएफओ पोर्टलला भेट देऊन हे तपासता येईल.
- आधी ईपीएफओ पोर्टल https://www.epfindia.gov.in/site_en/index.php वर जा. यासाठी तुम्ही तुमचा UAN (Universal Account Number) सक्रीय करावा लागेल.
- साईट ओपन झाल्यानंतर our services टॅबवर जावे लागेल. त्यानंतर ड्रॉप-डाऊन मेनमधून For Employees हा पर्याय निवडावा लागेल.
- सर्व्हिस कॉलमखाली तुम्हाला मेबर पासबूक या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर पुढच्या पेजवर तुम्हाला युएएन आणि पासवर्ड एन्टर करावा लागेल. - लॉग इननंतर मेंबर आयटी टाका. त्यानंतर EPF Balance दिसेल. यामध्ये तुम्हाला खात्यातील शिल्लक, सर्व ठेवींचे तपशील, एस्टॅबलिशमेंट आयटी, मेंब आयडी, कंपनीचं नाव, कर्मचाऱ्याचा योगदान आणि कंपनी किती पैसे टाकते याची माहिती असेल.
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार पैसे, EPFO ने दिले अपडेट
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे म्हणजेच EPFO चे सदस्य कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे पैसे जमा होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु अजूनही त्यांचे पैसे मिळणे बाकी आहे. अशातच जर तुम्हीही EPFO चे सदस्य असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण EPFO ने आपल्या कोट्यवधी खातेदारांना मोठी भेट दिली आहे. लवकरच PF व्याजाचे पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. याबाबत EPFO कडून एक नवीन अपडेट जारी करण्यात आले आहे. जाणून घेऊयात सविस्तर.
- कधी जमा होणार पैसे? जाणून घ्या
- EPFO ने याबाबत माहिती दिली आहे की 2022-23 या आर्थिक वर्षासाठी खात्यात व्याजाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. लवकरच ते जमा केले जातील. EPF खात्यातील व्याज फक्त मासिक आधारावर मोजण्यात येते. ते आर्थिक वर्षाच्या शेवटी सभासदांच्या खात्यात जमा करण्यात येते.
- 24 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, आर्थिक वर्ष 2022-23 साठी, पीएफ खात्यातील ठेवींवरील व्याजदर 8.10% वरून 0.05% वरून 8.15% पर्यंत वाढवले आहे. हे पैसे या महिन्यापर्यंत ६.५ कोटी ईपीएफओ सदस्यांच्या खात्यात जमा होतील. महत्त्वाचे म्हणजे 2021-22 या आर्थिक वर्षासाठी EPFO ने EPF खात्यासाठी 8.10 टक्के व्याजदर निश्चित केला.
- पगारातून कापले जातात पैसे – कोणत्याही कर्मचाऱ्याच्या बेस पे आणि महागाई भत्त्याच्या 12 टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा करण्यात येते. यावर ती संबंधित कंपनी कर्मचार्यांच्या पीएफ खात्यात 12% रक्कम जमा करत असते. तसेच कंपनीने केलेल्या योगदानापैकी 3.67 टक्के रक्कम EPF खात्यामध्ये जाते, तर उरलेली 8.33 टक्के पेन्शन योजनेमध्ये जाते.
- जाणून घ्या फायदा – आता PF च्या गणिताबद्दल बोलायचे झाले तर जर तुमच्या PF खात्यात 31 मार्च 2023 पर्यंत एकूण 10 लाख रुपये जमा असल्यास तर आतापर्यंत तुम्हाला 8.10 टक्के दराने 81,000 रुपये व्याज मिळत होते. तर दुसरीकडे, आता सरकारने पीएफचा व्याजदर 8.15 टक्के इतका केला आहे, त्यानुसार, खात्यात जमा करण्यात आलेल्या 10 लाखांवर तुम्हाला 500 रुपयांचा थेट लाभ मिळेल.
EPF Calculator Input
Pension Calculator
EPFO Pension : निवृत्तीनंतर भरीव पेन्शन मिळवण्यासाठी काय करायचं? नव्या सर्क्युलरमध्ये काय नियम आहेत?
EPFO Pension : निवृत्तीनंतर पेन्शन म्हणून मोठी रक्कम मिळवायची असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) कर्मचारी पेन्शन योजने अंतर्गत उच्च पेन्शनसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यासाठी सदस्य आणि नियोक्ते (Employer) संयुक्तपणे अर्ज करु शकतील. सुधारित योजनेची निवड न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांची मुदत दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली चार महिन्यांची मुदत संपण्यासाठी 15 दिवस शिल्लक असताना ईपीएफओने परिपत्रक काढून सूचना जारी केल्या आहेत.
सुप्रीम कोर्टाने नोव्हेंबर 2022 मध्ये कर्मचारी पेन्शन (सुधारणा) योजना 2014 वैध घोषित केली होती. त्यापूर्वी 22 ऑगस्ट 2022 रोजी EPS मध्ये केलेल्या दुरुस्तीमध्ये, पेन्शनपात्र पगाराची मर्यादा 6500 रुपये प्रति महिन्यावरुन 15,000 रुपये करण्यात आली होते. यामध्ये, जर पगार या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर ते ईपीएसमध्ये वास्तविक पगाराच्या 8.33 टक्के योगदान देण्याचीही परवानगी दिली होती.
3 मार्च 2023 ची डेडलाईन
- सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार पात्र कर्मचारी निकालाच्या तारखेच्या चार महिन्यांच्या आत ईपीएसद्वारे वाढीव पेंशनचा पर्याय निवडू शकतात.
- हा निकाल 4 नोव्हेंबर रोजी आला होता. या निकालाची चार महिन्यांची मर्यादा म्हणा अथवा डेडलाईन 3 मार्च 2023 रोजी संपत आहे.
कशी असेल प्रक्रिया?
- सुधारित योजनेची निवड न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांची मुदत दिली होती.
- ईपीएफओने म्हटले आहे की, “सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे कर्मचारी आणि त्यांचे नियोक्ते उच्च पेन्शनसाठी संयुक्त पर्याय निवडू शकतात.
- यासाठी, 1 सप्टेंबर 2014 किंवा त्यापूर्वी EPFO चे सदस्य बनलेल्या कर्मचाऱ्यांसाठी लवकरच एक ऑनलाईन सुविधा सुरु केली जाईल.
- संबंधित यूआरएलमध्ये आवश्यक बदल लवकरच केले जातील. हे झाल्यानंतर, प्रादेशिक पीएफ आयुक्त सूचना फलक आणि बॅनरद्वारे विस्तृत माहिती देतील.
- अर्ज नोंदवून डिजिटली नोंद (लॉग) केल्यानंतर अर्जदाराला पावती क्रमांक दिला जाईल. यासंबंधीचे निर्णय संबंधित विभागीय अधिकाऱ्याकडून घेतले जातील आणि अर्जदाराला ई-मेल आणि एसएमएसद्वारे त्याची माहिती दिली जाईल.
जास्त पगाराच्या आधारे योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना अर्ज करावा लागेल
- तर ज्या कर्मचाऱ्यांनी आधीच उच्च वेतनासाठी योगदान दिले आहे, पण औपचारिकता पूर्ण केलेली नाही त्यांना आता ईपीएफओ प्रादेशिक कार्यालयामध्ये अर्ज करावा लागेल.
- भविष्य निर्वाह निधीपासून पेन्शन फंडात पैसे वाटप किंवा निधी पुन्हा जमा करण्यासंबंधी कोणतेही काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना संयुक्त पर्याय फॉर्ममध्ये विशिष्ट माहिती द्यावी लागेल.
वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
- जास्त पेन्शन मिळविण्यासाठी, EPS सदस्याला जवळच्या EPFO कार्यालयात जावे लागते.
- तेथे त्यांना अर्जासोबत मागितलेली कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.
- आयुक्तांनी दिलेल्या पद्धतीनुसार आणि स्वरुपानुसार अर्ज द्यावा लागणार आहे.
- संयुक्त पर्यायामध्ये डिस्क्लेमर आणि डिक्लेरेशन देखील असेल.
- भविष्य निर्वाह निधीमधून निवृत्ती वेतन निधीमध्ये अॅडजस्टमेंट करण्याची आवश्यकता असल्यास, संयुक्त अर्जात कर्मचार्यांची संमती आवश्यक असेल.
- एक्झम्प्टेड प्रॉव्हिडंट फंड ट्रस्टकडून पेन्शन फंडात निधी हस्तांतरित करण्याच्या बाबतीत, ट्रस्टीला हमीपत्र सादर करावे लागेल.
- अर्ज सबमिट केल्यानंतर लवकरच URL (युनिक रिसोर्स लोकेशन) सूचित केले जाईल.
How To Withdraw PF Online
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |
Reetierment 15 mahine baki ahe mi arg karu shakto ka
Maz age 29 ahe me form bharu shekel ka
You are so interesting! I do not suppose I’ve read something like that before. So nice to find someone with a few genuine thoughts on this subject. Seriously.. thank you for starting this up. This site is something that is required on the web, someone with a little originality!
maza epfo account cha name aadhar nusar nhi ahe te kas ahe te samju sakel ka karan epfo cha account active dakhvat ahe pan open nhi hit name miss match show karat ahe
maza epfo account cha name aadhar nusar nhi ahe te kas ahe te samju sakel ka karan epfo cha account active dakhvat ahe pan open nhi hot ahename miss match show karat ahe
माझं आहे भविष्य निर्वाह खात पण मला माही मिळत आहे pf मी crstal कम्पनी मार्फत काम करत मला मदत करा सर मदत करा सर