CGHS Scheme

Central Government Health Scheme


Central government health scheme | CGHS Scheme Details are given here. New updates of CGHS Scheme is Till now this scheme was available only for female employees. Now male employees are also included in this. There is good news from the Modi government for the male employees of the central government. Now male employees can also make their parents and in-laws beneficiaries under the Central Government Health Scheme (CGHS). Earlier this facility was available only for women employees. After this new order both female and male central employees will be able to avail the benefit of this scheme. Let’s know what is this scheme of Modi government and how male central government employees can benefit from it.

केंद्र सरकारची ‘ही’ योजना आता पुरुष कर्मचाऱ्यांसाठीही!

आतापर्यंत फक्त महीला कर्मचाऱ्यांसाठी ही योजना उपलब्ध होती. आता पुरुष कर्मचाऱ्यांनाही यामध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या पुरुष कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारकडून आनंदाची बातमी आहे. आता पुरुष कर्मचारी देखील केंद्र सरकारच्या आरोग्य योजना (CGHS) अंतर्गत त्यांचे आई-वडील आणि सासरच्या लोकांना लाभार्थी बनवू शकतात. यापूर्वी ही सुविधा फक्त महिला कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध होती. या नव्या आदेशानंतर महिला आणि पुरुष केंद्रीय कर्मचारी या दोघांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. चला जाणून घेऊया मोदी सरकारची ही योजना काय आहे आणि केंद्र सरकारचे पुरुष कर्मचारी त्याचा कसा फायदा घेऊ शकतील.

Overview of CGHS Scheme

CGHS योजना म्हणजे काय?

आयुष्मान भारत योजनेप्रमाणे CGHS ही देखील भारत सरकारची एक महत्त्वाची आरोग्य योजना आहे. याअंतर्गत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना स्वस्त दरात रुग्णालयांमध्ये उपचाराचा लाभ मिळतो. CGHS अंतर्गत कर्मचार्‍यांना विशेष उपचार, औषधे आणि मोफत रोग तपासणी यांसारख्या सुविधा देखील उपलब्ध आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांचा खर्चही कमी होतो, ज्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणे सोपे जाते.

New notification of CGHS Scheme

नवीन अधिसूचना काय?

या योजनेतील नवीन अधिसूचनेसह, पुरुष कर्मचाऱ्यांना त्यांचे आई-वडील किंवा सासरे यांना CGHS चे लाभार्थी म्हणून समाविष्ट करण्याची संधी मिळाली आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे आई-वडील किंवा सासरचे लोक त्यांच्यासोबत राहतात आणि त्यांच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहेत, त्यांच्यासाठीही ही सुविधा फायदेशीर ठरेल. यामुळे कौटुंबिक अभ्यासाची काळजी घेण्यास आणि भविष्यातील चिंता कमी करण्यास देखील मदत होईल.

Benefits of CGHS Scheme

Central Government Health Scheme

आतापर्यंत फक्त महीला कर्मचाऱ्यांसाठी ही योजना उपलब्ध होती. आता पुरुष कर्मचाऱ्यांनाही यामध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या या आरोग्य योजनेचा लाभार्थ्यांमध्ये केंद्र सरकारचे कर्मचारी, विद्यमान आणि माजी खासदार, माजी राज्यपाल आणि नायब राज्यपाल, स्वातंत्र्य सैनिक, माजी राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांचे वर्तमान आणि माजी न्यायाधीश, केंद्र सरकारकडून मान्यताप्राप्त पत्रकार, दिल्लीतील कर्मचारी यांचा समावेश आहे. पोलीस, रेल्वे बोर्ड कर्मचारी आणि पोस्ट ऑफिसचे कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Central Government Health Scheme

‘या’ सुविधा मिळणार

या योजनेच्या लाभार्थ्यांना ओपीडीमधील उपचार आणि औषधांचा खर्च, शासकीय रुग्णालयातील उपचार सुविधा, कृत्रिम अवयवांसाठीचा खर्च, खासगी व मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत खर्च होणारा पैसा, इत्यादींचा लाभ मिळतो.

OFFICIAL WEBSITE



1 Comment
    Test22
  1. MahaBhartiYojana says

    Central Government Health Scheme Details

Leave A Reply

Your email address will not be published.