ABHA Health Card


ABHA Health Card

ABHA Health Card complete details and how to apply for it is given here. Abha (ABHA) stands for Ayushman Bharat Health Account Number. It is a digital health card that will store information related to citizens’ health. This card will be similar to your Aadhaar card and will have a 14 digit number on it. By using this number, the doctor can know all the medical history of the patient. Which disease of which person was cured in this? When and in which hospital did it happen? What tests were done? What drugs were given? What health problems does the patient have? Which health plan is he linked to? All this information will be stored digitally through this card. Read the complete details given about it below and apply from the given link.

Ayushman Card Yojana – required documents, apply here

काय असते ‘आभा’ हेल्थ कार्ड: याचा नेमका काय होतो फायदा, ऑनलाईन ABHA कार्ड कसे काढणार; जाणून घ्या सविस्तर

आभा हेल्थ कार्ड ही खऱ्या अर्थानं तुमच्या आरोग्याची कुंडली असते. या कार्डमध्ये रुग्णाची आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती नोंदवली जाते. या कार्डच्या मदतीनं डॉक्टर तुमच्या संपूर्ण आरोग्याच्या माहिती मिळवू शकतो. म्हणजेच या कार्डद्वारे कोणत्याही रुग्णाचा वैद्यकीय इतिहास अगदी सहज मिळवता येतो. चला तर आज जाणून घेवूया, आभा हेल्थ कार्ड नेमकं काय असते. त्याचा काय फायदा होतो, ते कसे मिळवायचे, ऑनलाईन पद्धतीने कसे मिळवता येईल.

What is ABHA HEALTH CARD

आभा हेल्थ कार्ड म्हणजे नक्की काय :

  1. आभा (ABHA) म्हणजेच आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट नंबर. हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे ज्यात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित माहिती साठवली जाईल.
  2. हे कार्ड एकप्रकारे आपल्या आधार कार्डसारखं असेल आणि यावर एक 14 अंकी नंबर असेल. याच नंबरचा वापर करून रुग्णाची सगळी मेडिकल हिस्ट्री डॉक्टरांना माहिती होऊ शकेल.
  3. यात कोणत्या व्यक्तीच्या कोणत्या आजारावर इलाज झाला? तो कधी व कोणत्या दवाखान्यात झाला?
  4. कोणत्या टेस्ट करण्यात आल्या? कोणती औषधं देण्यात आली? रुग्णाला आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या आहेत? तो कोणत्या आरोग्यविषयक योजनेशी जोडला गेलाय?
  5. ही सगळी माहिती या कार्डच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीनं साठवली जाईल

Benefits of ABHA Health Card

ABHA हेल्थ कार्डचे हे आहेत फायदे :

  1. तुम्ही नवीन डॉक्टर किंवा हॉस्पिटलमध्ये गेल्यास, तुम्हाला वैद्यकीय अहवाल आणि प्रिस्क्रिप्शन सोबत ठेवण्याची गरज नाही.
  2. तुमचा रक्तगट कोणता आहे, तुम्हाला कोणता आजार झाला आहे, सोबत तुम्ही कोणत्या डॉक्टरांकडे कधी गेला होता. ही सर्व माहिती ऑनलाइन उपलब्ध होईल.
  3. तुमचे सर्व वैद्यकीय अहवाल आणि प्रयोगशाळेतील अहवालांची माहिती आभा कार्डमध्ये राहील.
  4. ऑनलाइन उपचार घेणाऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा होईल, ते आभा कार्ड दाखवून ऑनलाइन डॉक्टरांना सर्व माहिती सहज देऊ शकतात.
  5. आभा हेल्थ कार्ड विमा कंपन्यांशी जोडले गेले आहे. ज्याद्वारे तुम्हाला विम्याचा दावा करणे देखील सोपे होईल.
  6. तुमच्या मेडिकल स्लिप्स, रिपोर्ट्स इत्यादी गहाळ होण्याची भीती राहणार नाही. तुम्ही सहजपणे तुमचे रेकॉर्ड ऑनलाइन ठेवू शकाल.

How to apply for ABHA Health Card

तुम्ही घरबसल्या बनवू शकता आभा हेल्थ कार्ड

  1. यासाठी सगळ्यात आधी https://ndhm.gov.in/ असं सर्च करा
  2. त्यानंतर ‘आयुष्मान भारत डिजिटल मिशन’ योजनेची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.
  3. इथल्या Create ABHA Number या रकान्यात क्लिक करायचं आहे.
  4. इथं तुम्ही एकतर आधार कार्ड किंवा मग ड्रायव्हिंग लायसनचा वापर करून आभा हेल्थ कार्ड काढू शकता.
  5. आधार कार्ड वापरून काढायचं असेल तर त्यासाठी तुमचं आधार मोबाईल क्रमांकाशी लिकं असणं गरजेचं आहे.
  6. तशी सूचना इथं दिलेली असेल. मग next या पर्यायावर जा.
  7. सुरुवातीला आधार नंबर टाकायचा आहे. तिथं दिलेली सूचना काळजीपूर्वक वाचायची आहे.
  8. सहमत असाल तर रकान्यात टिक करायचं आहे. खाली दिलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. मग नेक्स्टवर क्लिक करायचे आहे.
  9. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP पाठवला जाईल. तो टाकून पुढे जा.
  10. पुढे स्क्रीनवर तुम्हाला आधार कार्डवरील तुमचं नाव, लिंग, फोटो, जन्मतारिख, पत्ता तिथं दिसून येईल.
  11. Aadhaar Authentication Successful झाल्याचीही सूचना तिथे येईल. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचे.
  12. त्यानंतर नवीन पेज ओपन होईल. तिथं तुम्हाला आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. मग next वर क्लिक करायचं आहे.
  13. तुम्ही तुमचा ई-मेल अॅड्रेसही आभा क्रमांकाशी जोडू शकता.
  14. आता स्क्रीनर तुमचा आभा नंबर तयार झाल्याची सूचना स्क्रीनवर दिसेल. त्याखाली आभा नंबर नमूद केलेला असेल. आता इथल्या Link ABHA Address या रकान्यात क्लिक करा.
  15. इथं सुरूवातीला तुम्हाला तुमचे Profile Details दाखवले जातील. ते नीट वाचून तुम्हाला ABHA Address तयार करायचा आहे.
  16. खालच्या रकान्यामध्ये तुम्ही तुमचं नाव, जन्मतारिख यापैकी जे लक्षात राहण्यासाठी सोपं आहे ते टाकून आभा अ‌ॅड्रेस तयार करू शकता. हे टाकून झालं की create and link या रकान्यात क्लिक करा.
  17. तुमचा आभा नंबर आभा अॅड्रेस लिंक झाल्याचा मेसेज स्क्रिनवर येईल. ​​​​​​​

How to apply for ABHA Health Card

Required Documents for ABHA Card

आभा कार्ड बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स​​​​​​​
  2. पासपोर्ट आकाराचा फोटो
  3. मोबाईल नंबर

राज्यातील सर्व नागरिकांनी ‘आभा’ कार्डसाठी नोंदणी करावी

आयुष्मान भारत डिजिटल मिशन (आभा) चा एक भाग म्हणून भारत सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते) हा उपक्रम सुरु केला आहे. राज्यातील सर्व नागरिकांसाठी हे हेल्थ कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी या आभा कार्डसाठी नोंदणी करावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

  1. रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि ती ही डिजिटल स्वरूपात मिळावी, म्हणून आभा कार्ड सुरू करण्यात आले आहे. सामान्यतः रुग्ण आजारी पडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये कागदी फाईल दिली जाते. दरवेळी तपासणीसाठी रुग्णांना फाईल सोबत बाळगावी लागते. त्याचप्रमाणे डॉक्टरांनासुद्धा मागील सर्व रिपोर्ट्स तपासून पहावे लागतात. या सर्व बाबीचा विचार करता शासनाकडून आता नागरिकांना आभा आरोग्य कार्ड दिले जाणार आहे. आभा आरोग्य कार्ड म्हणजेच आयुष्मान भारत आरोग्य खाते होय. आभा कार्ड नावाने डिजिटल स्वरूपातील हेल्थ आयडी मिळणार असून, या कार्डवर तुमचा वैद्यकीय इतिहास, चाचण्या, केलेले उपचार इत्यादी माहिती साठविली जाणार आहे. ही सर्व माहिती डिजिटल स्वरूपात आभा कार्डवर साठविली जाणार असल्यामुळे नागरिकांना तसेच डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांना रुग्णांची पार्श्वभूमी म्हणजेच मागील आजार, निदान, उपचार आदींची माहिती जलद आणि सोयीस्करपणे समजण्यास मदत होणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे.
  2. आभा हेल्थ कार्डच्या मदतीने देशभरातील सर्व हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड बनविले जाणार आहे. या हेल्थ कार्डचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी नोंदणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
  3. आभा कार्डसाठी आधार कार्ड आणि आधार संलग्न असलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. आभा कार्ड मुळे उपचार करण्यासाठी प्रत्येक जागी रिपोर्ट आणि कागदपत्र घेऊन जाण्याची गरज नाही. आभा कार्डमध्ये तुमचा ब्लड ग्रुप, आजार, मेडिकल इत्यादीबदलची संपूर्ण माहिती असेल. ऑनलाईन उपचार, टेलिमेडिसिन, ई- फार्मसी, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड इत्यादी सुविधा यामध्ये नागरिकांना मिळतील. आपला मेडिकल रिपोर्ट किंवा रेकॉर्ड सहजरित्या तुम्ही हॉस्पिटल, मेडिकल, इन्शुरन्स यांना शेअर करू शकाल, असे अनेक फायदे आभा कार्डचे आहे.

How you will get Abha Arogya Card

असे काढाल आभा आरोग्य कार्ड

  1. तुम्ही भारतात कुठेही राहत असाल, तरी ही तुमच्या मोबाईल द्वारे ऑनलाईन पध्दतीने हेल्थ कार्ड काढू शकता.
  2. कार्ड बनविण्यासाठी नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या अधिकृत संकेतस्थळ healthid.ndhm.gov.in वर जावे लागेल.
  3. नंतर होम पेज वर ‘Create ABHA Number’ असे बटन असेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
  4. त्यानंतर पुढच्या पेजवर तुमच्या समोर आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (ABHA) तयार करण्यासाठी दोन पर्याय दिसतील. म्हणजेच तुम्ही तुमच्या 1) आधार कार्ड, 2) ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर करून तुमचे हेल्थ कार्ड तयार करू शकता.
  5. जर तुमच्या आधार कार्डला मोबाइल क्रमांक लिंक नसेल, तर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स पर्याय निवडा. कारण पुढे जेव्हा तुम्ही आधार कार्ड क्रमांक टाकणार आहात तेव्हा तुम्हाला आधार लिंक मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल.
  6. पुढील पेजवर तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर आणि ‘I Agree’ वर क्लिक करून ‘i am not robot’ वर क्लिक करायचे आहे व कॅप्चा व्यवस्थित भरायचा आहे. त्यानंतर ‘Submit’ या बटनवर क्लिक करायचे आहे.
  7. नंतर आधार लिंक मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. तो बॉक्स मध्ये टाकून ‘Next’ बटनवर क्लिक करायचे आहे.
  8. त्यानंतर तुम्हाला ‘Aadhaar Authentication Successful’ असा मेसेज दिसेल, आणि आधारमध्ये फिड असलेली तुमची वैयक्तिक माहिती खाली दिसेल. ती एकदा तपासून नंतर तुम्हाला Next बटनवर क्लिक करायचे आहे.
  9. आता आपला मोबाइल क्रमांक टाकायचा आहे, जो ‘ABHA’ कार्डला लिंक होईल व पुढे जाऊन तो लॉगिन करताना कामी येईल.
  10. पुढच्या पेज वर तुमचा ‘ABHA’ क्रमांक तयार झाल्याचा मेसेज दिसेल. हा क्रमांक ऑटोमॅटिक तयार होतो, जसा आधार क्रमांक असतो तसा. हा 14 अंकी क्रमांक लक्षात ठेवणे कठीण जाते. त्यामुळे ‘आभा’ने आभा ऍड्रेस ही सुविधा चालू केली आहे.
  11. यामध्ये आपण आपले आवडते नाव ऍड्रेस म्हणून वापरू शकतो जसे, name1234@abdm त्यासाठी तुम्ही आधी ‘Link ABHA Address’ बटनवर क्लिक करा. नंतर ‘No’ वर टिक करून ‘Sign Up for ABHA Address’ बटनवर क्लिक करायचे आहे.
  12. आता आपल्याला आवडते नाव ABHA ऍड्रेस म्हणून तयार करायचे आहे, त्यासाठी खाली बॉक्स मध्ये ते टाईप करून Create And Link बटन वर क्लिक करायचे आहे. नंतर तुमच्यासमोर ABHA क्रमांक, ABHA ऍड्रेसला यशस्वीपणे लिंक झाल्याचा मेसेज दिसेल. नंतर Go Back to your ABHA… बटनवर क्लिक करायचे आहे.
  13. त्यानंतर लॉगिन करण्यासाठी तुम्हाला, ABHA क्रमांक किंवा तुमचा मोबाइल क्रमांक आणि जन्म वर्ष टाकून Continue बटन वर क्लिक करायचे आहे. पुढे OTP साठी कोणत्या मोबाइल क्रमांकावर OTP पाठवावा ते विचारले जाईल आधार लिंक मोबाइल नंबर किंवा ABHA नंबर लिंक मोबाइल क्रमांक. योग्य तो पर्याय निवडून Continue बटन वर क्लिक करायचे आहे. पुढच्या पेज वर तुमचे ABHA क्रमांक कार्ड/हेल्थ कार्ड तयार होऊन येईल. तुम्ही ते Download ABHA number Card बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकता.
  14. जर कार्डमध्ये काही माहिती चुकलेली असेल, तर वरती My Account मेनू वर क्लिक करून Edit Details ऑप्शनवर क्लिक करा. उघडलेल्या पेजवर तुम्ही तुमची नवीन माहिती टाकून Submit बटन वर क्लिक करा. तसेच तुम्ही Set Password ऑपशन वर क्लिक करून आभा अकाउंटचा पासवर्ड सेट करू शकता.
  15. या डिजिटल आभा आरोग्य कार्डचा लाभ घेण्यासाठी राज्यातील सर्व नागरिकांनी आपले ‘आभा’ कार्ड बनवून घ्यावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

FAQ Regarding ABHA Health Card

  1. ABHA साठी अॅप आहे का – होय, तुम्ही प्ले स्टोअरवरून ABHA अॅप डाउनलोड करू शकता. या अॅपचे पूर्वीचे नाव एनडीएचएम हेल्थ रेकॉर्ड होते.
  2. ABHA CARD मधून वैद्यकीय इतिहास कसा काढायचा – प्रत्येक आभा हेल्थ कार्डवर 14 अंकी युनिक आयडी क्रमांक उपलब्ध असेल आणि एक QR कोड उपलब्ध असेल ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा वैद्यकीय इतिहास काढू शकता.
  3. गोपनीयतेसाठी आभा कार्डमध्ये काय सुविधा – आभा कार्ड बनवून तुमची हिस्ट्री कोणाकडेही जाण्याची भीती आहे. असा विचार करत असाल तर तसे अजिबात नाही. गोपनीयतेसाठी सरकारनेही एक चांगलं पाऊल उचललं आहे. तुमच्या संमतीशिवाय तुमचा मेडिकल हिस्ट्री कोणीही जाणून घेऊ शकत नाही. कारण जो मोबाईल क्रमांक आभा हेल्थ कार्डसाठी दिलेला आहे. त्यावर लागलीच OTP येतो. ज्याद्वारे तुमच्या कार्ड वापरासंबंधी संमती विचारली जाईल.
  4. आयुष्यमान कार्ड आणि आभा हेल्थ कार्ड यामध्ये काय फरक आहे- जाणून घ्या
    1. आयुष्यमान कार्ड हे हेल्थ इंश्युरन्स आहे. आभा कार्ड हे डिजीटल हेल्थ अकाऊंट आहे.
    2. हे कार्ड फक्त विशिष्ट वर्गांसाठी आहे, गरीब कुटुंबातील लोकांसाठी आभा कार्ड देशातील कोणताही व्यक्ती बनवू शकतो.
    3. उपचारादरम्यान आर्थिक मदतीसाठी उपयुक्त उपचारादरम्यान वैद्यकीय हिस्ट्री समजून घेण्यासाठी शहर आणि ग्रामीण भागात वेगवेगळे कार्ड बनविण्याचा नियम याला कोणताही नियम लागू नाही.

Official Website

Online Registration



1 Comment
    Test22
  1. MahaBhartiYojana says

    ABHA Health Card

Leave A Reply

Your email address will not be published.