LIC Jeeen Dhara Yojana एलआयसी’तर्फे जीवन धारा – २ योजना
LIC Jeeen Dhara -2 Scheme
LIC Jeeen Dhara Yojana एलआयसी’तर्फे जीवन धारा – २ योजना – The Life Insurance Corporation of India (LIC) has launched a new insurance scheme on the occasion of the Shri Ram Murti Pranpratishtha ceremony in Ayodhya. The scheme, called Jeevan Dhara-II, has been made available for purchase from Monday (March 22).
It is a non-linked, non-participating as well as individual level savings and annuity benefits. According to the LIC circular, investments can be made online or offline in the Jeevan Dhara II scheme. The minimum age can be invested in the scheme from the age of 20, while the maximum age limit is 80 years, 70 years and 65 years as per the option of annuity. The guarantee of annuity is a special feature of this scheme.
LIC Jeeen Dhara Yojana The scheme offers 11 annuity options, guaranteed annuity from day one and provides for a higher annual rate with increasing age. Policyholders can also opt for one-time or regular payment option.
It also has a loan facility. The first option is of regular premium, in which the annuity period is five years to 15 years, while in the single premium option, the annuity period is one year to 15 years and the third option is of single or combined annuity.
Annuities can be taken in any one of the monthly, quarterly, half-yearly and annual ways. Once one of these options is selected, there is no provision to change it. All the details of the scheme are available on lic.gov.in. It can be purchased from lic’s website or through an agent,” lic said.
LIC Jeeen Dhara एलआयसी’तर्फे जीवन धारा – २ योजना
अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) नवी विमा योजना दाखल केली आहे. जीवन धारा-दोन असे या योजनेचे नाव असून, ती सोमवारपासून (ता. २२) खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.
LIC Jeeen Dhara Yojana
- ही नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग तसेच वैयक्तिक स्तरावरील बचत आणि ॲन्यइटीचा लाभ देणारी योजना आहे.
- एलआयसीच्या परिपत्रकानुसार, जीवन धारा दोन या योजनेत ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने गुंतवणूक करता येऊ शकते. किमान २० व्या वर्षांपासून या योजनेत गुंतवणूक करता येते, तर कमाल वयोमर्यादा ॲन्युइटीच्या पर्यायानुसार, ८० वर्षे, ७० वर्षे आणि ६५ वर्षे आहे. अॅन्युइटीची हमी हे या योजनेचे खास वैशिष्ट्य आहे.
- या योजनेत ११ अॅन्युइटी पर्याय उपलब्ध असून, पहिल्या दिवसापासून ॲन्युइटीची हमी देण्यात आली असून, वाढत्या वयानुसार उच्च वार्षिक दराची तरतूद आहे. पॉलिसीधारक एकरकमी किंवा नियमित पेमेंट पर्यायाची निवडही करू शकतात.
- यावर कर्जसुविधाही आहे. पहिला पर्याय नियमित प्रीमियमचा आहे, ज्यामध्ये ॲन्युइटी कालावधी पाच वर्षे ते १५ वर्षे आहे, तर सिंगल प्रीमियम पर्यायामध्ये ॲन्युइटी कालावधी एक वर्ष ते १५ वर्षांपर्यंत आहे आणि तिसरा पर्याय म्हणजे एकल किंवा संयुक्त ॲन्युइटीचा आहे.
- ॲन्युइटी मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक यापैकी कोणत्याही एका पद्धतीने घेता येऊ शकते. एकदा यातील एक पर्याय निवडल्यानंतर त्यात बदल करण्याची तरतूद नाही. या योजनेची सर्व माहिती एलआयसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याची खरेदी एलआयसीच्या संकेतस्थळावरून किंवा एजंटच्या माध्यमातून करता येईल, असेही ‘एलआयसी’ने म्हटले आहे.
- LIC’s Jeevan Akshay – LIC जीवन अक्षय पॉलिसी
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |