CMRF Maharashtra
Mukhyamantri Sahayata Nidhi Hospital List
Table of Contents
CMRF Maharashtra Application Form
CMRF Maharashtra :- Medical Help Centre Details and how to apply for Financial Help are given below. Chief Ministers relief fund aims at providing immediate relief to the people in distress in the State of Maharashtra as well as in the country. The Chief Minister Relief fund provides financial assistance to the people affected by the major natural calamities like flood, drought, fire accident etc. It also provides financial assistance to the economically weaker citizens for treatment of some of the major disease like 1) Heart Disease, 2) Encephalopathy, 3) Neonatal, 4) Kidney Transplant, 5) Liver Transplant, 6) Cancer, 7) Accident, 8) Dialysis, 9) Heart Transplant, 10) CVA and 11) Bone Marrow. Transplant for these 11 serious diseases. Application form available on official website – https://cmrf.maharashtra.gov.in/CMRFCitizen/index.action also direct link are given below:
मुख्यमंत्री सहाय्यता निधी
महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते.
आता केवळ एका मिस कॉलवर मिळणार मुख्यमंत्री सहायता निधी; ‘हा’ आहे नंबर
मुख्यमंत्री सहायता निधी मिळवण्यासाठी आता फक्त मिस कॉल देण्याची आवश्कता आहे. याआधी हा निधी मिळण्यासाठी किचकट आणि वेळकाढूपणा प्रक्रिया होती. त्यामुळे अनेक गरजू या सेवेपासून वंचित राहत होते. मात्र, आता फक्त एका मिस कॉलवर तुम्हाला मुख्यमंत्री सहायता निधी मिळणार आहे.
- CMRF – मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक मदत दिली जाते. अर्ज भरण्यासाठी अनेकदा विविध अडचणी येतात. ग्रामीण भागात अनेक समस्यांचा सामना अर्जदारांना करावा लागतो. राज्य सरकारने ही गंभीर बाब लक्षात घेत, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ८६५०५६७५६७ हा मोबाइल क्रमांक देऊन केवळ मिसकॉलचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधी करिता वेळकाढू प्रक्रियेतून आता सहज, सोप्या आणि कमी वेळात निधी मिळेल. लाभार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
- गरजूंना होणार फायदा – निरोगी आरोग्य, शारीरिक उपचार, शस्त्रक्रिया इत्यादीसाठी शासनामार्फत नागरिकांसाठी विविध योजना राबवते. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात आदी नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित होणाऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मार्फत अर्थसहाय्य दिले जाते. तसेच आर्थिक दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार, शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य पुरविले जाते. विविध दुर्धर आजारांवरील उपचार, शस्त्रक्रियांसाठी आजवर ८ हजार रुग्णांकरीता ६० कोटी ४८ लाख इतका मदतनिधी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून वाटप करण्यात आला. प्रति महिना दीड ते दोन हजार अर्ज वैद्यकीय मदतीसाठी दाखल होतात, पैकी १ हजार अर्ज मंजूर होतात. अर्ज दाखल केल्यानंतर केवळ ७ दिवसांत वैद्यकीय मदत संबंधित रुग्ण दाखल असणाऱ्या रुग्णालयाच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येते.
- लवकरच अँप बनवणार – मुख्यमंत्री सहायता निधीसाठी येणारे बहुतांश अर्ज अपूर्ण स्वरूपात असतात. मदत करण्यास अडचणी येतात. सध्या मिसकॉल वर ही सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी लवकरच मुख्यमंत्री सहायता निधी अर्जासाठी अॅप बनवले जाणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया अधिक गतिमान होईल आणि एकाच वेळी तिथे सर्व माहितीचे अर्ज स्वीकारले जातील. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मदत कक्षाशी संपर्क साधावा लागणार नसल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे.
- अशी असेल प्रक्रिया – ग्रामीण भागातील गरजूंना निधीसाठी मंत्रालयाचे दरवाजे झिझवावे लागतात. अनेकदा अर्ज भरताना चुका झाल्यास नव्याने प्रक्रिया करावी लागते. उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची होणारी परवड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, लक्षात घेऊन लाभार्थ्यांना थेट मिसकॉलवर अर्ज करण्याची प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे. अर्जदाराने ८६५०५६७५६७ या मोबाईल क्रमांकावर मिसकॉल केल्यानंतर अर्जाची लिंक एसएमएसद्वारे प्राप्त होईल. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर डाऊनलोड होणाऱ्या अर्जाची प्रिंट काढून तो भरावा. रुग्णाच्या आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष किंवा स्कॅन करून पीडीएफमध्ये cmrf.maharashtra.gov.in या ईमेल आयडीवर अपलोड करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.
- कर्करोगावरील उपचारांसाठी सर्वाधिक अर्ज – मुख्यमंत्री सहायता निधीसाठी कर्करोगावरील उपचाराच्या मदतीसाठी सर्वाधिक अर्ज येतात. एकूण अर्जांच्या एकूण २५ टक्के अर्ज असून त्या खालोखाल हृदयविकार, गुडघा प्रत्यारोपण, खुबा प्रत्यारोपण, अपघात, डायलिसिस, किडनीविकार उपचारांच्या मदतीसाठी अर्ज येत आहेत. भाजलेल्या तसेच शॉक लागलेल्या रुग्णांकडून देखील मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अर्ज येत आहेत.
Mukhyamantri Sahayata Nidhi Hospital List
Main Purpose of CMRF in Maharashtra
- To assist affected persons in natural calamities in the State as well as in the rest of the country.
- To extend financial or any other help to the heirs of persons who have died in communal riots and those people who have suffered injury and/or loss to their property.
- To extend financial or any other help to the heirs of persons who have died or are injured in terrorist attacks. To extend financial or any other help to the heirs of persons who have died or are injured in terrorist attacks.
- To extend financial or any other help to the patients suffering from diseases by providing for their treatment and/or surgery.
- To extend financial or any other help to the heirs of those who have died in accidents. (Excluding motor/railway/airplane/ship accident).
- To extend financial or any other help to various institutions in need of financial or other help.
- To extend financial or any other help for organizing educational, social and cultural seminars and gatherings.
- To extend financial or any other help partly for construction of buildings for educational and medical establishments.
महाराष्ट्रात CMRF चा मुख्य उद्देश
- राज्यातील तसेच उर्वरित देशातील नैसर्गिक आपत्तींमधील आपत्तीग्रस्त व्यक्तींना मदत करणे.
- जातीय दंगलीत मृत व्यक्तींच्या वारसदारांना तसेच ज्यांना दुखापत झालेली आहे आणि/ किंवा ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे, त्यांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
- दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या किंवा दुखापत झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
- रुग्णांना उपचार आणि /किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
- अपघाती मरण पावलेल्या (मोटार/रेल्वे/विमान/जहाज अपघात वगळता) व्यक्तींच्या वारसांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
- आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदतीची आवश्यकता असणाऱ्या विविध संस्थांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
- शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चर्चासत्रे आणि संमेलने आयोजित करण्यासाठी आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
- शैक्षणिक आणि वैद्यकीय आस्थापनांच्या इमारती बांधण्याकरीता अंशत: आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
संस्थात्मक अर्थसहाय्य
विविध शैक्षणिक / सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध सेवाभावी संस्थांना धर्मादाय प्रयोजन म्हणून अर्थसहाय्य देणे. (सदर बाब न्यायप्रविष्ठ असल्यामुळे सन २०१० पासून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून संस्थांत्मक अर्थसहाय्याचे वाटप करण्यात आलेले नाही.)मुख्यमंत्री सहाय्यता निधी व्यतिरिक्त “मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधी” हा निधी मा मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व सामान्य प्रशासन विभागाच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहे. धर्मादाय प्रयोजनार्थ सेवाभावी संस्थांना त्यांच्या उद्देश कार्यावर विनियोग करण्याकरीता आर्थिक सहाय्य या निधी मधून करण्यात येतो. या निधीस शासनाकडून प्रती वर्ष रु. १.00 कोटी इतकी अर्थसंकल्पिय तरतूद मंजूर करण्यात येते. या निधीमधून मा मुख्यमंत्री महोदयांनी अर्थसहाय्याची मंजूरी दिल्यानंतर मा. मुख्य सचिवांच्या स्तरावर संस्थेस मंजूर रक्कम उपलब्ध करण्याची कार्यवाही सामान्य प्रशासन विभागाकडून केली जाते. या निधीचे लेखापरिक्षण महालेखापाल, महाराष्ट्र -१, मुंबई यांचेकडून करण्यात येते.
Purposes for Appropriation from Chief Minister’s Relief Fund
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विनियोगासाठीचे उद्देश
विविध आपत्तीतील आपद्ग्रस्तांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याचा प्रमुख उद्देश असला तरी, नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त खालील विविध बाबींकरीता निधीचा विनियोग करण्यात येत असतो.
१. नैसर्गिक आपत्ती (अतिवृष्टी, पूर व भूकंप इत्यादी.)
राज्यात तसेच देशात नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत झालेल्या नागरीकांच्या पूर्नवसनासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पाकरीता वेळोवेळी मा. मुख्यमंत्री महोदयांच्या घोषणेनुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्यात येते. उदा. :
१. लडाख येथे ढगफूटीमुळे उद्भवलेली नैसर्गिक आपत्ती २०१०
२. जम्मू काश्मिर राज्यात पूर परिस्थिती, २०१४
३. दक्षिण भारत त्सुनामी भूकंप, २००४
४. ओरिसा व गुजरात येथे चक्रीवादळामुळे उद्भवलेली नैसर्गिक आपत्ती २००१
५. महाराष्ट्र राज्यात सन २००५ मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे उद्भवलेली नैसर्गिक आपत्ती
६. महाराष्ट्र राज्यात सन २०१३ मध्ये तीव्र दुष्काळामुळे उद्भवलेली नैसर्गिक आपत्ती
७. उत्तराखंड राज्यातील पूर परिस्थितीमुळे उद्भवलेली नैसर्गिक आपत्ती
८. महाराष्ट्र राज्यात ऑगस्ट २०१४ मध्ये माळीण, आंबेगाव, महाराष्ट्र येथील प्रचंड ढग स्फोट आणि भूस्खलनामुळे झाल्याने पूर
२. जातीय दंगल व बॉम्बस्फोट इत्यादी आपत्तीमध्ये शासनाच्या योजनेतून नियमानुसार देण्यात आलेल्या मदती व्यतिरिक्त अशा प्रकरणी मा. मुख्यमंत्री महोदंयानी अर्थसहाय्याची अनुकुलता दर्शविली असेल तर, आपदग्रस्तांना मदत होण्यासाठी संबंधीत जिल्हाधिकाऱ्यांकडे आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देणे.
२.१ अशा कुटुंबाचे पुनर्वसन होण्यासाठी मानवतावादी दृष्टीकोनातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अर्थसहाय्याचा विचार करण्यात येतो.
२.२ त्यानुसार ज्यांना कोणत्याही प्रकारे विमा संरक्षण नाही तसेच शासनाकडून किंवा शासनाच्या अन्य योजनामधून आर्थिक मदत मिळालेली नाही. अशा प्रकरणी मा. मुख्यमंत्री महोदयांनी अर्थसहाय्य देण्याचे आदेश दिलेले आहेत.
२.३ अशा प्रकरणांमध्ये संबंधीत जिल्हाधिकारी यांचेकडून त्यांच्या शिफारसीसह सविस्तर अहवाल व सोबत खालील नमूद कागदपत्रे प्राप्त करुन घेऊन अर्थसहाय्याचे प्रस्ताव मा.मुख्यमंत्री महोदंयाच्या आदेशार्थ सादर करण्यात येतात.
२.३.१ पोलीस पंचानामा (एफआय आर)
२.३.२ शव विच्छेदन अहवाल
२.३.३ मृत्यू प्रमाणपत्र.
२.४ मदत निधी योग्य वितरण सुनिश्चित करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी कडे पाठविला जातो. मदत थेट प्राप्तकर्त्याला प्रदान केली जाणार नाही.
२.५ वित्तमालाचे नुकसान झाल्यास अर्थसहाय्य देण्यात येते;
पंचनाम्यानुसार नुकसानीचे प्रमाण मंजूर अर्थसहाय्य
- रु.२५,०००/- पर्यंत रु. ३,०००/-
- रु. २५,००१/- ते रु. ४९,९९९/- पर्यंत रु. ५,०००/-
- रु. ५०,०००/- ते रु. ९९,९९९/- पर्यंत रु. १०,०००/-
- रु. १,००,०००/- ते रु. १,४९,९९९/- पर्यत रु. १५,०००/-
- रु. १,५०,०००/- व त्यापेक्षा जास्त रु. २०,०००/-
अशा प्रकरणामध्ये अर्थसहाय्य मंजूरीच्या रकमेमध्ये वाढ व घट करण्याचे सर्व अधिकार मा. मुख्यमंत्री महोदयांना आहेत.
अशा प्रकरणामध्ये अर्थसहाय्य मंजूर करण्यापूर्वी संबंधीत जिल्हाधिकारी यांचेकडून पुढील कागदपत्रांची पूर्तत करुन घेण्यात येते.
१. जिल्हाधिकारी यांचा स्वयंस्पष्ट अहवाल.
२. नुकसानीचा पंचनामा (महसूल अधिकारी यांनी सांक्षाकित केलेला)
३. बाधीत व्यक्तीचा आर्थिक स्थितीचा तपशील.
३. रुग्णालयास वैद्यकीय शस्त्रक्रिया / उपचार घेणाऱ्या आर्थिकदृष्टया सक्षम नसलेल्या रुग्णांना त्यांचेवर करावा लागणाऱ्या खर्चापोटी अंशत: अर्थसहाय्य म्हणून खालीलप्रमाणे देण्यात यावे.
- वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र (खाजगी रुग्णालयास वैद्यकीय खर्च १.००लक्षाच्या वरील असल्यास शासकीय रुग्णालयातील अधीक्षक/जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे)
- राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने अंतर्गत रुग्णालय असून सदर योजनेचा लाभ रुग्णास मिळत नसलेबाबत वैद्यकीय खर्चाच्या प्रमाणपत्रावर प्रमाणित करणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्रातील रेशन कार्ड / रहिवासी दाखला/ आधार कार्ड क्रंमाक
- तहसिलदार यांनी प्रमाणित केलेला उत्पन्नाचा दाखला (कुटुंबाचे सर्व स्रोतांचे मिळून मागिल आर्थिक वर्षाचे उत्पन्न रु. १.०० लाखापेक्षा कमी असलेबाबत)
- ४. नोंदणीकृत भ्रमणध्वणी क्रमांक
- ५. मा. आमदार/खासदारांचे शिफारस पत्र
- ६. रुग्णालयास प्रदानाबाबत तपशिल:
- ६.१. बँक खाते क्रमांक
६.२. रुग्णालयाचे ज्या बॅकेत खाते आहे त्या बँकेचे नांव व शाखा
६.३. रुग्णालयाचे खाते ज्या नावाने आहे ते नांव
६.३. आय एफ एस सी (IFSC) कोड नंबर
६.५. रुग्णालयाचा ई-मेल - ७. सदर मदत हि प्रत्येक रुग्णास ३ वर्षातून एकदा देण्यात येईल.
- ८. उपरोक्त गोष्टिंची पूर्तता केल्यानंतर खालील प्रमाणे अंशत: अर्थसहाय्य करण्यात येते –
अंदाजित खर्च | अर्थसहाय्य | |
रु.२०,०००/- पर्यंत | रु.१०,०००/- | |
रु.२०,००१/- ते रु.४९,९९९/- पर्यंत | रु.१५,०००/- | |
रु.५०,०००/- ते रु.९९,९९९/- पर्यंत | रु.२०,०००/- | |
रु.१,००,०००/- ते रु.२,९९,९९९/- पर्यंत | रु.३०,०००/- | |
रु.३,००,०००/- ते रु.४,९९,९९९/- पर्यंत | रु.४०,०००/- | |
रु.५,००,०००/- व त्यापेक्षा जास्त | रु.५०,०००/- |
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |
अपघात असल्यास तहसीलदार कार्यालयातून उत्तपणाचा दाखला कडे प्रयांत रुग्ण वैकुंठ दर्शन घेतील ?
CMRF Maharashtra
How to start this scheme in hospital ?
प्रोसेस सगळी पूर्ण होऊन पण पैसे जमा झाले नाहीत काय प्रॉब्लेम आहे एप्लीकेशन नंबर13128
मुख्यमंत्री सहाय्य निधी तत्काळ मदत हवी
22 दिवस झाले पण काहीच रिप्लाय येत नाही फक्त process madhe ahe ashe सगातात
आम्हाला मदत हवी आहे
70 days gone, but file is in still pending?
please solve this problem
गोर गरीबांसाठी चांगला उपयोग होईल
Sir मला अर्ज करायचा आहे माझी आई अडमीट MJM Hospital sambhaji nagar मला जास्त माहीत नाही तरी मला मदत करावी
मला टेस्ट tube baby treatment करायची आहे तर मला मदत मिळू शकते का?
Application no-24914,
Please approve urgently
संचेती हॉस्पिटल पुणे येथे उपचार झाला आहे पण अद्याप फंड जमा झाला नाही.
हॉस्पिटल मध्ये पूर्ण पैसे भरूनच उपचार केले पैसे शासनाकडून आल्यास आपणांस कळविले जाईल व उपचाराचे पैसे दिले जातील असे आश्वासन दिले आहे.
Application no-29450
Please approve urgently
रोड अक्सिदेंत मध्ये माझ्या पती चे निधन झाले आहे मला मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळावी यासाठी अर्ज करण्याची पद्धत काय आहे
Hospital khrch