MHADA Lottery Scheme

Pune Mhanda Lottery | MHADA Konkan Lottery | MHADA Mumbai Lottery


MHADA Lottery Scheme

Under the Pune division of Mhada, a sale of 4,186 flats from various housing schemes in Pune, Pimpri-Chinchwad, and along with PMRDA in Solapur, Kolhapur, and Sangli districts is going to take place. The registration and application filling process for the computer-based lottery organized for this process was inaugurated by the chairman of Pune division, Shivajirao Adhalrao Patil, during the Go-Live program on Thursday. Read the complete details and apply from the below link.

म्हाडाच्या घरासाठीही टप्प्याटप्प्याने रक्कम भरणा

MHADA’s Mumbai division has decided to announce the allotment of homes in various locations in Mumbai in March. Accordingly, the Mumbai division has begun preparations. However, since there are not enough ready homes for allotment, MHADA has now decided to include homes from ongoing projects in the allotment. As a result, a large number of homes from ongoing projects will be included in the upcoming allotment. MHADA will make changes to the policy for the distribution of these homes. One important change is that the sale price of the home will be collected from the winners in installments, depending on the developer.

म्हाडा मुंबई मंडळाची मार्चमध्ये जाहिरात; निर्माणाधीन प्रकल्पातील घरांचा सोडतीत समावेश

म्हाडाच्या मुंबई मंडळाने मार्चमध्ये मुंबईतील विविध ठिकाणच्या घरांच्या सोडतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई मंडळ तयारी लागले आहे. मात्र सोडतीसाठी पुरेशी तयार घरे नसल्याने आता म्हाडाने निर्माणाधीन प्रकल्पातील घरांचा सोडतीत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी सोडतीत मोठ्या संख्येने निर्माणाधीन प्रकल्पातील घरांचा समावेश सोडतीत असणार आहे. या घरांच्या वितरणासाठीच्या धोरणात म्हाडाकडून बदल केले जाणार आहेत. त्यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे विकासकाप्रमाणे विजेत्यांकडून घराची विक्री किंमत टप्प्याटप्याने वसूल केली जाणार आहे.
मुंबई मंडळाच्या घरांसाठी मार्चपर्यंत सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करून एप्रिलमध्ये सोडत काढण्याचे निर्देश म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. त्यानुसार सर्व विभागीय मंडळाकडून चालू आणि निर्माणाधीन प्रकल्पांची यादी मागवण्यात आली आहे. त्यानंतर घरांची निश्चिती करून घरांची अंतिम संख्या ठरविण्यात येईल. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, ४ ते ५ हजार घरांसाठी सोडत काढण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे.
कुठे किती घरे ? – विक्रोळी कन्नमवार नगर येथे अंदाजे १३०० घरांचे काम सुरू असून त्यापैकी केवळ ८४ घरे तयार आहेत. प्रतीक्षा नगरमधील अंदाजे ५००, तर गोरेगाव, सिद्धार्थनगर (पत्राचाळ) येथील अंदाजे २५०० घरांची कामे सुरू आहेत. यातील कन्नमवारनगरमधील अंदाजे १२०० घरे एक ते दीड वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे. तर पत्राचाळीतील घरे २०२९ मध्ये पूर्ण होणार आहेत. या घरांचा सोडतीत समावेश करण्यासाठी काही बदल करण्याच्यादृष्टीने काम सुरू आहे. या बदलानुसार विकासकाप्रमाणे विजेत्यांकडून घराची रक्कम वसूल केली जाणार आहे.
रकमेचे टप्पे कसे? – २० मजली इमारत असल्यास पायापर्यंतचे काम झाल्यास २० टक्के रक्कम, त्यानंतर सात मजल्यापर्यंत काम झाल्यास पुढील २० टक्के, १४ मजल्यापर्यंत काम झाल्यास २० टक्के, इमारत पूर्ण झाल्यास २० टक्के आणि इमारतीला निवासी दाखला मिळाल्यानंतर शेवटची २० टक्क्यांची रक्कम वसूल केली जाणार आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये सोडत निघाली तरी विजेत्यांना २०२७ ते २०२९ पर्यंत घराच्या ताब्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.


The registration, application-acceptance process for the draw of 502 houses available to mhada’s Nashik board under the 20 per cent comprehensive scheme is underway. According to the draw schedule, the application sale and acceptance process was scheduled to end on Friday, March 7. However, for some reason, the process has now been extended till March 21. Therefore, interested candidates can fill the application form by paying a deposit amount for the draw by March 21.

नाशिकमध्ये म्हाडाच्या अर्जविक्री, स्वीकृतीला मुदतवाढ २० टक्के योजनेंतर्गत ५०२ घरांसाठी सोडत

म्हाडाच्या नाशिक मंडळाला २० टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत उपलब्ध झालेल्या ५०२ घरांच्या सोडतीसाठी नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे. सोडतीच्या वेळापत्रकानुसार शुक्रवार, ७ मार्च रोजी अर्जविक्री, स्वीकृतीची प्रक्रिया संपुष्टात येणार होती. मात्र, काही कारणाने आता या प्रक्रियेस २१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांना २१ मार्चपर्यंत सोडतीसाठी अनामत रक्कम अदा करून अर्ज भरता येणार आहे.
विकासकांकडून नाशिक मंडळाला २० टक्के योजनेतील घरे देण्यास टाळाटाळ होत आहे. मात्र, म्हाडा प्राधिकरण आणि नाशिक मंडळ सातत्याने ही घरे मिळविण्यासाठी नाशिक महानगरपालिकेसह विकासकांकडे पाठपुरावा करीत आहे. या पाठपुराव्यामुळे नाशिक मंडळाला नुकतीच २० टक्क्यातील ५०२ घरे उपलब्ध झाली. फेब्रुवारीत जाहिरात प्रसिद्ध करून ७ फेब्रुवारीपासून अर्जविक्री-स्वीकृतीस सुरुवात करण्यात आली होती. २०२ घरांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, तर ३०० घरांसाठी नियमित सोडत काढण्यात येणार आहे.
२० मार्चपर्यंत अर्ज भरण्याची मुदत – आता इच्छुकांना २० मार्च रोजी रात्री ११.५९ पर्यंत संगणकीय पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. तर २१ मार्च रोजी रात्री ११.५९ पर्यंत संगणकीय पद्धतीने अनामत रक्कम भरून अर्ज सादर करता येणार आहे. तसेच आरटीजीएल-एनईएफटीद्वारे अनामत रक्कम अदा करून अर्ज भरण्याची मुदत २१ मार्च रोजी रात्री ११.५९ वाजता संपुष्टात येणार आहे. त्यानंतर अर्जांची छाननी करून पात्र अर्जदारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.


खुषखबर… म्हाडा लॉटरीला मुदतवाढ, १०० घरेही वाढली

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने विविध उत्पन्न गटातील घरांसाठी गेल्या महिन्यात लॉटरी जाहीर केली होती. मात्र, नागरिकांच्या मागणीनुसार म्हाडाने नागरिकांना घरांसाठी अर्ज करण्याला मुदतवाढ दिली आहे. तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांची संख्या १०० ने वाढविली आहे.

गेल्या महिन्यात ८ मार्चपासून या लॉटरीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली. ऑनलाइन अर्ज नोंदणीची मुदत ८ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत होती. आता ३० मे रोजी रात्री ११:५९ पर्यंत नागरिकांना घरांसाठी अर्ज करता येणार आहेत. म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अर्जदारांनी प्रथम http://www.mhada.gov.in किंवा https://mhada.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, तर ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी lottery.mhada.gov.in या संकतेस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन म्हाडा पुणे मंडळाकडून करण्यात आले.

सोडतीचा तपशील योजना आणि सदनिका याप्रमाणे

  • म्हाडा योजनेंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य – २४१६
  • म्हाडाच्या विविध योजना – १८
  • म्हाडा पंतप्रधान आवास (पीएमएवाय) योजना – ५९
  • पंतप्रधान आवास (पीएमएवाय) खासगी भागीदारी योजना (पीपीपी) – ९७८
  • २० टक्के योजना पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड १४०६

म्हाडाच्या कोकण लॉटरीची तारीख कोणती? लॉटरी काढण्यासाठी ‘म्हाडा’ला मुहूर्त मिळेना

म्हाडाच्या कोकण मंडळाच्यावतीने ५ हजार ३११ घरांची लॉटरी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र प्राधिकरणाला अद्याप लॉटरी  काढण्यासाठीचा मुहूर्त मिळालेला नाही. तत्पूर्वी १३ डिसेंबरला घरांची लॉटरी काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र प्रशासकीय कारणात्सव घरांची लॉटरी पुढे ढकलण्यात आली. आता डिसेंबरच्या उत्तरार्धात लॉटरी काढण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली असली तरी प्राधिकरणाकडून निश्चित, अशी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या ५,३११ घरांच्या विक्रीकरिता लॉटरी काढण्यात येणार आहे.

प्रक्रियेचा शुभारंभ :

  1. लॉटरीची तारीख अर्जदारांना मोबाईलवर एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.
  2. ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते १५ सप्टेंबर रोजी लॉटरीसाठी ऑनलाइनएकूण ३०,६८७ अर्ज प्राप्त
  3. अनामत रकमेसह २४३०३ अर्ज प्राप्त
  4. लॉटरी पाच घटकांमध्ये विभागण्यात आली:
  5. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १,०१० घरे
  6. एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत १,०३७ घरे
  7. सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ९१९ घरे
  8. टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्यासाठी ६७ घरे

MHADA Pune Lottery

म्हाडाच्या पुणे मंडळाची ५८६३ घरांच्या सोडत रद्द – सोडतीची नवी तारीख लवकरच जाहीर होणार

  • म्हाडाच्या पुणे मंडळाच्या पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारलेल्या ५८६३ घरांच्या विक्रीसाठी २४ नोव्हेंबर रोजी संगणकीय सोडत काढण्यात येणार होती. मात्र, आता ही सोडत प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली असून, सोडतीची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
  • पुणे मंडळ क्षेत्रातील ५८६३ घरांच्या सोडतीच्या अर्जविक्री-स्वीकृतीला इच्छुकांनी बऱ्यापैकी प्रतिसाद दिला आहे. अर्जविक्री-स्वीकृतीच्या अंतिम मुदतीत ६० हजार अर्ज दाखल झालेत. सुधारित वेळापत्रकानुसार २४ नोव्हेंबरला सोडत काढण्यात येणार होती. पण आता प्रशासकीय कारण देत ही सोडत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता इच्छुकांना गृहस्वप्नपूर्तीसाठी काहीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

म्हाडा पुणे मंडळाच्या ५८६३ घरांच्या सोडतीच्या अर्जविक्री-स्वीकृतीला ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

  • म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ५८६३ घरांच्या सोडतीच्या अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढीनुसार आता इच्छुकांना ३१ ऑक्टोबरपर्यंत आरटीजीएस-एनईएफटीसह अनामत रक्कम भरत अर्ज सादर करता येणार आहेत. तर २४ नोव्हेंबरला पुणे मंडळाच्या कार्यालयात सोडत काढण्यात येणार आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या ५८६३ घरांसाठी सप्टेंबरमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. तर ५ सप्टेंबरपासून अर्जविक्री-स्वीकृतीस सुरुवात झाली आहे.
  • आतापर्यंत ४५ हजारांहुन अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. दरम्यान अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया २० ऑक्टोबरला संपुष्टात येणात असतानाच आता ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे हि दुसरी मुदतवाढ आहे. इच्छुकांना अधिवास प्रमाणपत्र आणि इतर अनुषंगिक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी त्यांच्या मागणीनुसार दोनदा मुदतवाढ देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पण मुळात सोडतीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने मुदतवाढ देण्याची वेळ येत असल्याची चर्चा आहे. नवीन वेळापत्रकानुसार ३० ऑक्टोबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. तर ३१ ऑक्टोबर, २०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अनामत रक्कमेची स्वीकृती केली जाणार आहे.

घरासाठी अर्ज करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: पुणे मंडळ म्हाडाच्या साडेपाच हजार घरांच्या सोडतीस अर्ज भरण्यास 20 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण यांचे प्रादेशिक मंडळ पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ मार्फत सन 2023च्या सोडतीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर ५८६३ घरांची सोडतसाठी अर्ज भरण्याची मुदत 27 सप्टेंबर पर्यंत देण्यात आली होती. यादरम्यान, अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी नागरिकांकडून होत असल्याने 20 ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती म्हाडा पुणे विभागाचे सीईओ अशोक पाटील यांनी बुधवारी दिली आहे.

पाटील यांनी सांगितले की, सामाजिक बांधिलकी जपत महाडच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांसाठी अत्यल्प ,अल्प ,मध्यम व उच्च गटांसाठी घरे उपलब्ध करून दिलेली आहेत.पुणे मंडळांतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात एकूण पाच हजार 425 सदनिका वितरणासाठी उपलब्ध आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 69 सदनिका तर सांगली जिल्ह्यामध्ये 32 सदनिका आणि कोल्हापूर जिल्ह्यात 337 सदनिका वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.सदर सदनिकांसाठी एकूण 32 हजार 996 अर्ज आत्तापर्यंत दाखल करण्यात आलेले आहेत. त्यापैकी 18 हजार 369 नागरिकांनी प्रत्यक्ष पैसे भरलेले आहेत. गणपती उत्सव व इतर कार्यालयीन सुट्ट्यांमुळे अर्ज भरण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र शासकीय कार्यलयातून उपलब्ध झाले नसल्याने काही नागरिकांना अर्ज दाखल करणे शक्य झाले नाही, त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत वाढ करण्यात आलेली आहे. सदर अर्ज भरण्यासाठी 20 ऑक्टोबर पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली असून नऊ नोव्हेंबर रोजी संबंधित 5,863 घरांची ऑनलाइन सोडत होणार आहे.

मुंबई प्रमाणे प्लॅनिंग ऑथॉरिटी मिळावी अशोक पाटील यांनी सांगितले की, सध्या बांधकाम व्यवसायिक हे प्रत्यक्ष घर बांधण्याचे नकाशे मनपाला सादर करतात, त्यानंतर मनपा त्यांना बांधकामासाठी मंजुरी देते.यामध्ये केवळ 20 टक्के म्हाडाला प्लॅन बाबत कारवाई करता येते. मात्र ,मुंबईमध्ये स्वतंत्र प्लॅनिंग ऑथॉरिटी असून ते म्हाडाच्या प्रकल्पांना मंजुरी देते ,त्यामुळे योग्य पद्धतीने घरांचे बांधकाम करता येते. अशाप्रकारची प्लॅनिंग ऑथॉरिटी पुणे महाडा विभागास मिळावी याकरीता सरकारकडे मागणी करण्यात आलेली आहे.त्यामाध्यमातून म्हाडाच्या घरांना आगामी काळात गॅलरी देण्याबाबतही विचार करण्यात येईल.

MHADA Konkan Lottery

Online Registration Link Konkan Lottery

Pune Mhada Advet 1

Pune Mhada Advert 2

Pune Mhada Lottery Online Registration Link

Pune Mhada Lottery Online Apply

MHADA Aurangabad Booklet

MHADA Aurangabad Advertisement

Aurangabd Mhada Lottery Online Registration Link

Aurangabd Mhada Lottery Online Registration Link

CIDCO Lottery सिडको लॉटरी नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी- 5730 घरांसाठी लॉटरी

म्हाडा लॉटरी ऑनलाइन अर्ज

MHADA Lottery Online Form, Results

MHADA has plans to unveil several lottery schemes under MHADA lottery scheme to provide affordable housing options to the homeless population of the State. Under the Government’s ambitious housing scheme, Pradhan Mantri Awas Yojana (PMAY), the Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA) will offer affordable housing options in different cities of the State under the MHADA lottery scheme.

Category MHADA

  1. Lower-income group (LIG),
  2. Middle-income group (MIG)
  3. High-income group (HIG) .

MHADA Lottery Draw

MHADA is a housing scheme released by the Housing and Area Development Authority, Government of Maharashtra for the people of the state. Desired applicants can apply for the scheme under four categories economically weaker section, the lower-income group (LIG), the Middle-income group (MIG), and the High-income group (HIG) category. Registration of flat will be done by online & offline both process. The Maharashtra government also wants to give out a huge number of apartment transversely state observations of MHADA in the upcoming years and the size of these flats will be good in size.

Eligibility Criteria for MHADA Lottery

  1. An applicant must be above the age of 18 years.
  2. No application will be accepted in the name of a child
  3. A domicile certificate
  4. For LIG flats, an applicant can apply if he earns a monthly income of Rs 25,001 to Rs 50,000
  5. For MIG flats, an applicant can apply if he earns a monthly income of Rs 50,001 to Rs 75,000
  6. For HIG flats, an applicant can apply if he earns a monthly income of Rs 75,001 or above
  7. A Pan Card

MHADA Lottery Result Helpline No.

  • 022-26598923/24
    022-26592692/93

Official Website

How to register for MHADA lottery

MHADA Lottery Registration

All interested Candidates can apply for MHADA housing scheme 2023 by registering themselves on the MHADA official site i.e. https://lottery.mhada.gov.in. Complete step to guide for registering under the MHADA lottery scheme 2023 are as below:

  1. Go to the official website – https://lottery.mhada.gov.in/
  2. Select the scheme board available
  3. Create a User Account for MHADA Lottery/Log in if you already have a username registered
  4. Fill in the required details
  5. Click on submit button
  6. Enter the OTP that you have received via SMS/EMAIL on your registered mobile number/email
  7. Fill in your monthly income details
  8. Upload a passport size photograph in the required size
  9. Enter your PAN card details and upload a scanned copy of the card
  10. Enter the contact details
  11. Enter bank details
  12. Submit and confirm the application

Online Registration Link

How to apply for MHADA Lottery

  1. Applicants are required to register themself as per the instruction given above.
  2. After that apply for MHADA lottery
  3. Click Here to Register
  4. All users have to create a ‘User Name’ in order to register for the MHADA lottery.
  5. After that interested applicants are needed to ‘Select the lottery and scheme’.
  6. And last candidates have to make online payment via netbanking.

MHADA Lottery Scheme Online application

The authority had announced the lottery scheme to provide affordable housing options to the residents. Online registration for the scheme (Pune) is over. However, interested applicants can apply for the next lottery scheme – HERE.

Mhada Lottery Registration Fees

IAY List of Lottery Under MHADA

  1. Mumbai Board MHADA Lottery Scheme
  2. Pune Board MHADA Lottery Scheme
  3. Nashik Board MHADA Lottery Scheme
  4. Konkan Board MHADA Lottery Scheme
  5. Nagpur Board MHADA Lottery Scheme
  6. Amravati Board MHADA Lottery Scheme
  7. Aurangabad Board MHADA Lottery Scheme

Documents Required for MHADA Lottery

  1. Aadhaar card
  2. Birth certificate
  3. Domicile certificate
  4. Driving license
  5. PAN card
  6. Passport
  7. School leaving certificate
  8. Voter ID card

Prices of Houses under MHADA Housing Scheme

  1. Category – Flats – Price of house
  2. EWS  – 63  – Under Rs 20 lakh
  3. LIG – 126 – Rs 20 lakhs -30 lakhs
  4. MIG – 201 – Rs 35 lakhs -60 lakhs
  5. HIG  – 194 – Rs 60 lakhs-Rs 5.8 crore.

FAQ MHADA Lottery

Question : What are the dates of MHADA Lottery Mumbai?

Answer : MHADA Lottery Mumbai dates are expected to be announced by August or September.

Question : Who is eligible for MHADA draw?

Answer :  Individuals aged 18 years and above are eligible for MHADA draw. He / she should also have a domicile certificate of Maharashtra.

Question : Can I sell a MHADA flat?

Answer : Yes, you can sell a MHADA flat after the lock-in period which is usually five years.



23 Comments
    Test22
  1. Karishma Nilesh shinde says

    Jar number lagla tar paise ekdach bharayche ki installment madhe bharayche

  2. Test22
  3. MahaBhartiYojana says

    MHADA Lottery Scheme 2023

  4. Test22
  5. Nandini Santosh More says

    मला आई वडील नाही आणि मी हॉस्टेलला राहते मला खूप गरज आहे म्हाडा घरांची तर कृपया करून मला मदत करा मी स्टुडन्ट आहे

  6. Test22
  7. Shabina Shaikh says

    Help me

  8. Test22
  9. अजय शांताराम मोरे says

    सर्व मुंबई बाहेरील घरांसाठी सोडती आहेत. मुंबई मध्ये एकही नाहीय

Comments are closed.