Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जिल्हा परिषदेच्या २०१९ भरती परीक्षेचे शुल्क परत करण्याची प्रक्रिया सुरु ! – ZP Nashik Bharti 2023

ZP Nashik Bharti 2023

ZP Nashik Bharti 2023 | @zpNashik.maharashtra.gov.in

ZP Nashik Bharti 2023: The recruitment process for various cadres was conducted by Nashik Zilla Parishad in 2019. Candidates had applied for this exam with the company NYSA. The cancellation of this recruitment process raised the question of what to do next regarding the examination fees of the candidates. The administration has started the process of refunding the examination fee to the account of 14 thousand 313 examinees taking immediate steps. (ZP Recruitment 2019). The examination fee of the examinee in the year 2019 advertisement is also deposited with May Nyasa. This examination fee was received by the Zilla Parishad through the Village Development Department. Principal Secretary of Rural Development Department Eknath Dawle had directed that the exam fee of the examinee should be deposited in the account immediately. (ZP Recruitment 2019)

नाशिक जिल्हा परिषदेककडून २०१९ साली विविध संवर्गांसाठी भरती प्रक्रिया राबवली गेली होती. या परीक्षेसाठी मे. न्यासा या कंपनीकडे उमेदवारांनी अर्ज केले होते, परीक्षार्थीचे परीक्षा शुल्कदेखील मे. न्यासा या कंपनीकडे जमा होते, हे परीक्षा शुल्क ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेस प्राप्त झाले, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी परीक्षार्थीचे परीक्षा शुल्क हे तत्काळ खात्यावर जमा करावे, असे निर्देश दिले होते.तसेच या नवीन जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा तसेच ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी नाशिक जिल्हा परिषद भरतीसाठी अर्ज केलेल्या परीक्षार्थीच्या परीक्षा अर्जाची पडताळणी करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांना दिल्या होत्या. सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने न्यासा कंपनीशी समन्वय साधून एकूण १६ हजार १११ अर्जाची पडताळणी करण्यात आली. यापैकी १४ हजार ३१३ अर्ज हे पडताळले गेले. यापैकी १,७२९ अर्जाची अंशतः पडताळणी तर परीक्षार्थीच्या २,६३५ अर्जाची पडताळणी होऊ शकली नाही

५३ लाख रुपये परत करण्याची प्रक्रिया सुरु
■ न्यासा कंपनीच्या वतीने पडताळणी झालेल्या १४ हजार ३१३ परीक्षार्थीच्या खात्यावर प्राप्त ५३ लक्ष १९ हजार रुपयांचे परीक्षा शुल्क परत करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून २९ लक्ष ३२ हजार ५०० रुपयांचे परीक्षा शुल्क हे परत करण्यात आले असून इतर बँकांशी संलग्न २३ लक्ष ८६ हजार ५०० रुपयांचे परीक्षा शुल्क हे येत्या दोन दिवसांत जमा होणार आहे.
■ उर्वरित बैंक तपशील पडताळणी न झालेल्या उमेदवारांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाशी संपर्क साधून परीक्षा अर्ज व बैंक खात्याची पुष्टी करावी, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.

बँक खात्याची पुष्टी करण्याचे आवाहन (ZP Recruitment 2019)

बँक तपशील पडताळणी न झालेल्या उमेदवारांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाशी २५९१०१० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून परीक्षा अर्ज व बँक खात्याची पुष्टी करावी असे आवाहन परदेशी यांनी केले आहे.


ZP Nashik Junior Engineer Bharti 2023

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या वतीने कनिष्ठ अभियंता या पदासाठीची परीक्षा ही एकूण ९ परीक्षा केंद्रावर दोन सत्रात सुरळीत पार पडली. कनिष्ठ अभियंता (इवद व ग्रापापू) या पदासाठी १२६४ परीक्षार्थी पैकी ८७१ परीक्षार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते, तर ३९३ परिक्षार्थी गैरहजर होते. तसेच या नवीन जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा तसेच ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद पदभरतीतील विविध पदांसाठी नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा ही घेण्यात येत आहे. त्यानुषंगाने कनिष्ठ अभियंता या पदासाठी दि. १७ व २० नोव्हेंबर रोजी परीक्षा ही घेण्यात आली. परीक्षार्थींची संख्या जास्त असल्याने १७ रोजी तीन सत्रात व २० रोजी दोन सत्रात परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

१७ व २० रोजी पार पडलेल्या परीक्षेची नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सर्व परीक्षा केंद्रांवर उपस्थित अधिकारी यांच्याकडून परीक्षा सुरळीत सुरू असल्याबाबतची माहिती घेतली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी देखील सर्व परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. आता २३ रोजी वरिष्ठ सहायक या पदासाठी परीक्षा होणार आहे.


 

जिल्हा परिषदेच्या वतीने विविध संवर्गांसाठी पदभरती करण्यात येत आहे दि. ५ ऑगस्ट रोजी या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीच्या अनुषंगाने आता कनिष्ठ अभियंता (इवद / ग्रापापु), वरिष्ठ सहायक या दोन संवर्गांतील पदांसाठी आयबीपीएस कंपनीमार्फत विविध परीक्षा केंद्रांवर दि.१७, २० व २३ नोव्हेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे.

यासंदर्भातील जिल्हा परिषद पदभरतीचे वेळापत्रक व परीक्षा केंद्र यासाठीचे प्रकटन हे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले असून, नाशिक जिल्हा परिषदेच्या वेबसाइटवर हे प्रकटन उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व परीक्षार्थीनी याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

असे करा हॉल तिकीट डाउनलोड…

जिल्हा परिषद पदभरतीतील दोन संवर्गांच्या परीक्षा या १७, २० व २३ नोव्हेंबर रोजी होणार असून, आयबीपीएस कंपनीच्या संकेतस्थळावरून विद्यार्थांना हॉल तिकीट उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांनी रजिस्टर केलेल्या मोबाइल नंबर व ई-मेल आयडीवर देखील हॉल तिकीटची लिंक पाठविण्यात आलेली आहे.

पदनिहाय परीक्षा : कनिष्ठ अभियंता (इवद/ग्रापापु) – दि. १७ नोव्हेंबर. कनिष्ठ अभियंता (इवद / ग्रापापु) – दि. २० नोव्हेंबर. वरिष्ठ सहायक- दि. २३ नोव्हेंबर.


 

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाअंतर्गत मोठ्या प्रमाणावर पर्यवेक्षीय यंत्रणेसह शिक्षकांमधून पदोन्नती होणारे अनेक पदे रिक्त आहेत. मागील तीन वर्षांपासून पदोन्नत्या न झाल्याने रिक्त पदांवर शिक्षकांकडूनच प्रभारी पद देवून कामकाज केले जात असल्याने पदोन्नती कधी होईल याच प्रतिक्षेत जिल्ह्यातील शिक्षक आहेत. शिक्षण क्षेत्रातील पर्यवेक्षकीय यंत्रणेतील समन्वयक म्हणून केंद्रप्रमुख जबाबदारी पार पाडत आहे. तसेच पदवीधर व तत्सम शिक्षकांकडे देखील अपुरे शिक्षक असल्याने अनेक पदांचा अतिरिक्त भार आहे. 

 

परिणामी वर्ग अध्यापन करून केंद्राची माहिती संकलन करावी लागत आहे. आधीच रिक्तपदे त्यातच ऑनलाइन व इतर वाढलेली प्रशासकीय कामकाज यामुळे ‘प्रभारी’ मंडळीचीही शाळा व वर्ग सांभाळून एकंदरीत केंद्र प्रमुख पदावर कसरत करावी लागत आहे. परिणामी या सर्वांचा परिणाम वर्ग अध्यापनावर होत असतो. काही तालुक्यात तर विस्तार अधिकारीच संपूर्ण तालुक्याचा कार्यभार सांभाळत आहेत. जिल्ह्यातील विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर विषय शिक्षक या पदांवर प्राथमिक शिक्षकांमधून पदोन्नती करण्यात यावी.

 

सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीचे आदेश
केंद्रप्रमुख यास जिल्हा परिषदेच्या दहा शाळांचे पर्यवेक्षण व साप्ताहिक सहा तासांचे किमान अध्यापन करणे बंधनकारक असते. पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापकांचे व केंद्रप्रमुखांचे उपरोक्त कामकाज लक्षात घेता, पदवीधर प्राथमिक शिक्षकास केंद्रप्रमुख अथवा मुख्याध्यापक पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांमध्ये निश्चितपणे वाढ होते.

त्यामुळे त्यांना एक वेतनवाढ देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात केंद्रप्रमुख हे महत्त्वाचे पद असूनही शिक्षकांना केंद्रप्रमुखपदी सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती न देता विषयनिहाय पदोन्नतीचे धोरण राबवून बेकायदेशीरपणे पदोन्नतीची यादी प्रसिद्ध केली होती.

त्यामुळे त्या निर्णयाविरोधात न्यायालयात शिक्षकांकडून याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. खंडपीठाने त्या याचिकेची गंभीर दखल घेत विषयनिहाय पदोन्नती अनेक शिक्षकांवर अन्याय करणारी असल्याने सेवाज्येष्ठतेनुसार केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती देण्याबाबतचे आदेश दिले होते.

“जिल्ह्यात केंद्रप्रमुखांच्या १२२ पदांपैकी ९३ पदे रिक्त होती. ती रिक्त पदे तालुकानिहाय सेवाज्येष्ठतेनुसार पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक या निकषाने निर्धारित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दिवाळीनंतर दुसऱ्या सत्रात याबाबत कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने सर्व संवर्गातील रिक्त पदांबाबत पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात येईल.”

 


जिल्हा परिषदेतील प्राथमिक विभागाच्या पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापकांना केंद्र प्रमुखपदी पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या पदोन्नत्यांना विविध शिक्षक संघटनांनी हरकती नोंदविल्या होत्या. मात्र, त्या दूर झाल्याने संबंधित ९३ शिक्षकांची सेवाज्येष्ठतेनुसार तालुकानिहाय केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती होईल. दिवाळीनंतर ही प्रक्रीया राबविली जाणार आहे. (93 teachers of zp will be center head nashik news). 

 

जिल्ह्यात केंद्रप्रमुखांच्या १२२ पदांपैकी ९३ पदे रिक्त होती, ती भरण्याची मागणी शिक्षकांची होती. आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही या रिक्त पदांचा मुद्दा चांगलाच गाजला होता. त्यानंतर, प्राथमिक विभागाने ही प्रक्रिया राबविण्यास सुरवात केली. परंतु, पदोन्नती प्रक्रियेतील निकषाबाबत शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतले होते. त्यामुळे ही प्रक्रिया चार महिन्यांपासून रेंगाळली होती. शिक्षकांना केंद्रप्रमुखपदी सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती न देता विषयनिहाय पदोन्नतीचे धोरण राबवून बेकायदेशीपणे पदोन्नतीची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे त्या निर्णयाविरोधात न्यायालयात शिक्षकांकडून याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

खंडपीठाने त्या याचिकेची गंभीर दखल घेत विषयनिहाय पदोन्नती अनेक शिक्षकांवर अन्याय करणारी असल्याने सेवाज्येष्ठतेनुसार केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती देण्याबाबतचे आदेश दिले होते. त्यामुळे तालुकानिहाय सेवाज्येष्ठतेनुसार पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक या निकषाने निर्धारित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पदोन्नती मिळाल्यावर काही जिल्हा परिषदा वेतननिश्चिती करताना महाराष्ट्र नागरी सेवा पदोन्नतीची एक काल्पनिक वेतनवाढ देत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यावर सर्वसमावेशक सूचना देण्यात आली होती. प्राथमिक शिक्षकांवर संबंधित शाळेत नेमून दिलेल्या विषयाच्या इयत्ता सहावी ते आठवीतील विशिष्ट विषयांच्या अध्यापनाची जबाबदारी असते. पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक हा शाळेच्या संपूर्ण व्यवस्थापनासाठी जबाबदार असून, त्यांना आठवड्यात किमान १८ तास अध्यापन करणे बंधनकारक असून, उर्वरित कालावधीत संबंधित शाळेचे प्रशासन हाताळावे लागते. त्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरण व साक्षरता यासाठी केंद्रप्रमुखपदाची निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी दिली.

 


ZP Nashik Bharti 2023 : The recruitment process for various cadres is going on on behalf of Zilla Parishad. Under that, the examination of eight cadres will be held from October 7 to 11. The advertisement for this post was released in the month of August. Accordingly IBPS for the posts of Rigman (Dorkhandwala), Senior Assistant Accounts, Extension Officer (Statistics), Extension Officer (Agriculture), Health Supervisor, Short Writer (Lower Grade), Short Writer (Higher Grade), Junior Assistant Accounts from October 7 to 11 On behalf of the company, the exam will be conducted online at various exam centers.

जिल्हा परिषदेच्या वतीने विविध संवर्गांसाठी पदभरती प्रक्रिया सुरू आहे. त्या अंतर्गत सात ते ११ ऑक्टोबर या कालावधीत आठ संवर्गांची परीक्षा होणार आहे. ऑगस्ट महिन्यात या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या अनुषंगाने रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहायक लेखा, विस्तार अधिकारी (सांख्यिकी), विस्तार अधिकारी (कृषी), आरोग्य पर्यवेक्षक, लघु लेखक (निम्नश्रेणी), लघु लेखक (उच्चश्रेणी), कनिष्ठ सहायक लेखा या संवर्गातील पदांसाठी सात ते ११ ऑक्टोबर दरम्यान आयबीपीएस कंपनीच्यावतीने विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे.

सात ऑक्टोबर रोजी रिगमन (दोरखंडवाला) व वरिष्ठ सहायक (लेखा), आठ ऑक्टोबरला विस्तार अधिकारी (सांख्यिकी), १० ऑक्टोबर रोजी विस्तार अधिकारी (कृषी) व आरोग्य पर्यवेक्षक आणि ११ ऑक्टोबर रोजी लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुलेखक (उच्चश्रेणी), कनिष्ठ सहायक (लेखा) या संवर्गाची परीक्षा होईल.

या संदर्भातील जिल्हा परिषद पद भरतीचे सुधारित वेळापत्रक व परीक्षा केंद्र यासाठीचे प्रकटन हे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सदस्य जिल्हा निवड समिती आशिमा मित्तल यांच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर हे प्रकटन उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व परीक्षार्थींनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. संकेतस्थळावरून परीक्षार्थींना प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे.


ZP Nashik Mega Bharti 2203

ZP Nashik Bharti 2023: Mega recruitment has been announced by the state government in the Amrit Mahotsav year of Independence and accordingly the recruitment process for the vacant posts in Zilla Parishad will be implemented. In this, the recruitment process of as many as 1038 posts in 20 cadres is going on and after the publication of advertisement, as many as 64,080 candidates have applied for 1038 seats of Zilla Parishad. Around five crores of currency has been collected.

 

राज्य सरकारच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात मेगा भरतीची घोषणा करण्यात आली आणि त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यामध्ये 20 संवर्गातील तब्बल 1038 पदांची भरती प्रक्रिया पार पडत असून जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या 1038 जागांसाठी तब्बल 64,080 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तर तब्बल पाच कोटी रुपयांचं चलन जमा झाले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 

दरम्यान नाशिक जिल्हा परिषदेसाठी 1038 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यात अनेक पदांचा उल्लेख आहे. आता अर्ज प्रक्रिया संपुष्टात आली असून जिल्हा परिषदेच्या माहितीनुसार (कंत्राटी) ग्रामसेवक पदाच्या 50 जागांसाठी 11 हजार 728 अर्ज दाखल झाले आहेत. आरोग्य पर्यवेक्षकच्या 3 जागांसाठी 91 अर्ज, आरोग्य परिचारिका [आरोग्य सेवक (महिला)साठी 597 जागांसाठी, 3954 अर्ज, आरोग्य सेवक (पुरुष) 85 जागांसाठी 17 हजार 579 अर्ज, आरोग्य सेवक (पुरुष) 126 जागांसाठी, 6488 अर्ज, औषध निर्माण अधिकारी 20 पदासाठी 5057 अर्ज, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 14 जागांसाठी 2607 अर्ज, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) 2 जागांसाठी 337 अर्ज, विस्तार अधिकारी(शिक्षण) (वर्ग 3 श्रेणी 2) 7 जागांसाठी 1047 अर्ज, वरिष्ठ सहाय्यकच्या 3 जागांसाठी 1773 अर्ज, पशुधन पर्यवेक्षकच्या 28 जागांसाठी 774 अर्ज, कनिष्ठ आरेखकच्या 2 जागांसाठी 41 अर्ज, कनिष्ठ लेखा अधिकारी 1 जागेसाठी 48 अर्ज, कनिष्ठ सहाय्यक (लेखा) 5- जागांसाठी 863 अर्ज, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) 22 जागांसाठी 2667 अर्ज, मुख्य सेवीका / पर्यवेक्षिका 4 जागांसाठी 677 अर्ज, कनिष्ठ यांत्रिकी 1 जागा, 44 अर्ज, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) इवद/ग्रा.पा पु. 34 जागा, 5268 अर्ज, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (स्थापत्य ) इवद/ग्रा.पा पु. 33 जागांसाठी 2942 अर्ज संख्या लघुलेखक (उच्च श्रेणी) 1 जागेसाठी 95 अर्ज दाखल झाले आहेत.एकूणच नाशिक जिल्हा परिषदेच्या 1038 जागांसाठी 64 हजार 80 अर्ज दाखल आले आहेत.

नाशिक जिल्हा परिषदेच्या 20 संवर्गातील तब्बल 1038 पदांची भरती प्रक्रिया पार पडणार असून यासंदर्भातील जाहिरात ही 5 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यांनतर अर्ज भरण्यास सुरवात झाली होती. जवळपास 20 दिवसांत अर्ज भरण्याच्या मुदतीत 64 हजार 80 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तर यासाठी 900 रुपयांचे चलन होते, त्यानुसार जवळपास 5 कोटी 75 लाख 43 हजार 100 रुपयांचे चलन जमा झाले आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.


An advertisement for the ZP Nashik Recruitment to fill 1038 posts is published by Nashik Zilla Parishad today on 4th August 2023. This recruitment process is for the 1038 Vacancies. Its really a Good news for ZP job seekers. As per the latest update for Zilla Parishad Nashik Recruitment 2023 this bharti process will be conducted by IBPS. Zilla Parishad Nashik is going to start the latest recruitment process for the Various posts of Data Entry Operators, Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation) posts. Large number of 1038 vacancies are going to be filled in this recruitment. Application forms will begin from 5th August 2023, while last date to apply is 25th August 2023. Further details are as follows:-

ZP Nashik Recruitment 2023

जिल्हा परिषद नाशिकच्या आस्थापनेवरील गट- क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत जाहिराती मधील विविध १०३८ रिक्त पदे जिल्हा परिषद नाशिक च्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर जाहिराती कळविण्यात येते की, गट-क मधील विविध संवर्गाच्या एकूण १०३८ रिक्त पदांकरिता अर्ज दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे. या भरती अंतर्गत आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक व अन्य पदे भरण्यात येणार आहे.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या लिंकवर दिनांक २५/०८/२०२३ रोजीचे रात्री २३.५९ वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावा. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी खाली आणि दिलेल्या PDF मध्ये उपलब्ध आहे. तसेच या नवीन जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा तसेच ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

Zilla Parishad Nashik Bharti 2023

  • पदाचे नाव – आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
  • पद संख्या – 1038 Posts
  • शैक्षणिक पात्रता – पदानुसार आहे (कृपया मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणनाशिक
  • वयोमर्यादा –  १८ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)
  • अर्ज पद्धती –ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – ५ ऑगस्ट २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –२५ ऑगस्ट २०२३.
  • परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. १०००/-  – राखीव वर्ग : ९००/-
  • वेतनश्रेणी – रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
  • अधिकृत वेबसाईट-https://zpnashik.maharashtra.gov.in/ 

Vacancy Details ZP Nashik Bharti 2023

Zilla Parishad Nashik Recruitment 2023 Details

Organization Name Zilla Parishad Nashik [ZP Nashik]
Post name Data Entry Operators, Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation) posts
Total posts 1038 Vacancies
Job location Nashik District
Application started on 5th August 2023
Last date to apply 25th August 2023
Category Online ZP Recruitment 2023
Website https://zpnashik.maharashtra.gov.in/

How To Register For Zilla Parishad Nashik Group C Bharti 2023

अर्ज नोंदणी
१. उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun२३/ या संकेतस्थळावर जावे.
२. अर्ज नोंदणी करण्यासाठी, “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा ” (Click here for New Registration) टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ईमेल आयडी प्रविष्ट करा. प्रणालीद्वारे तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. उमेदवाराने तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवावा. तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शविणारा ईमेल आणि एस. एम. एस. देखील पाठविला जाईल.
३. जर उमेदवार एकाच वेळी अर्ज भरू शकत नसेल, तर तो “सेव्ह आणि नेक्स्ट” (Save & Next ) टॅब निवडून आधीच “एंटर” (Enter) केलेला डेटा जतन करू शकतो. ऑनलाइन अर्ज “सबमिट” (Submit) करण्यापूर्वी उमेदवारांना ऑनलाइन अर्जातील तपशीलांची पडताळणी करण्यासाठी “सेव्ह आणि नेक्स्ट” ” (Save & Next) सुविधेचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे आणि आवश्यक असल्यास त्यात बदल करावा. दृष्टिहीन उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि अंतिम सबमिशन करण्यापूर्वी ते बरोबर असल्याची खात्री करण्यासाठी तपशीलांची पडताळणी करून घ्यावी.
४. उमेदवारांनी ऑनलाइन अर्जातील तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि त्याची पडताळणी करावी, कारण “पूर्ण नोंदणी” (COMPLETE REGISTRATION BUTTON) बटणावर क्लिक केल्यानंतर कोणताही बदल शक्य होणार नाही/ करणे शक्य होणार नाही.
५. उमेदवाराचे नाव किंवा त्याचे/तिचे वडील/पती इ. चे नाव अर्जामध्ये बरोबर लिहिलेले असावे, जसे ते प्रमाणपत्र/गुणपत्रिका/ओळख पुराव्यामध्ये दिसते. कोणताही बदल / तफावत आढळल्यास उमेदवारी अपात्र ठरू शकते.
६. “तुमचे तपशील सत्यापित करा” (Validate your details) आणि “जतन करा आणि पुढील ” (Save & Next) बटणावर क्लिक करून तुमचा अर्ज जतन करा.
७. फोटो आणि स्वाक्षरी स्कॅनिंग आणि अपलोड करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये दिलेल्या वैशिष्ट्यांनुसार उमेदवाराने फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यवाही करावी.
८. नोंदणीपूर्वी संपूर्ण अर्जाचे पूर्वावलोकन आणि पडताळणी करण्यासाठी “पूर्वावलोकन ” (Preview) टॅबवर क्लिक करा.
९. आवश्यक असल्यास तपशील सुधारावा आणि छायाचित्र, स्वाक्षरी आणि इतर तपशील बरोबर असल्याची पडताळणी आणि खात्री केल्यानंतरच नोंदणी पूर्ण वर क्लिक करा (COMPLETE REGISTRATION).
१०. “पेमेंट” (Payment) टॅबवर क्लिक करा आणि पेमेंटसाठी पुढे जावे व “सबमिट ” (Submit) बटणावरक्लिक करावे.

Documents Required For ZP Satara Online Application

ZP Maharashtra Required Document List : आवश्यक कागदपत्रे यादी (mahabharti.in)

ZP Nashik Recruitment Important Dates

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Below is ZP Sindudurg Online Apply Link. Click On ZP Online Apply link to proceed with Your ZP Nashik Application Form

Important Links For zpNashik.maharashtra.gov.in Bharti 2023

📑 PDF जाहिरात 🔔https://t.co/FYO3khUZDY
👉 ऑनलाईन अर्ज करा ✍https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23 – ऑनलाईन अर्ज ५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु!
✅ अधिकृत वेबसाईट
🔗https://zpnashik.maharashtra.gov.in/
🏆 ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा 🔥जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा
💰जिल्हा परिषदेत निवड झाल्यावर किती मिळेल पगार .. जाणून घ्या  🖊जिल्हा परिषद अर्ज नोंदणी कशी करावी ? छायाचित्र स्वाक्षरी परिमाण किती? 

ZP Nashik Recruitment Educational Qualification 2023 | शैक्षणिक पात्रता

Post Name Educational Qualification
Pharmacist (औषध निर्माता) औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषध शाळा अधिनियम 1948 खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार
Health workers (Male) (आरोग्य सेवक) विज्ञान विषय घेवुन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार.
Health workers (Female) (आरोग्य सेविका) ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेम नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील
Health Supervisor (आरोग्य पर्यवेक्षक) ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याचा पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल.
Gram Sevak (ग्रामसेवक) किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता परीक्षेत किमान 60 % गुणांसह उत्तीर्ण किंवा शासन मान्य संस्थेची अभियंत्रिकी पदविका (तीन वर्षाचा अभ्यासक्रम) किंवा प्रशासन मान्य संस्थेची समाजकल्याणची पदवी (बी एस डब्ल्यु) किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य अर्हता आणि कृषि पदविका दोन वर्षाचा अभ्यासक्रम
Junior Engineer (G.P.P.) (कनिष्ठ अभियंता) स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
Junior Engineer (Mechanical) (कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)) यांत्रिकी अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
Junior Engineer (Electrical) (कनिष्ठ अभियंता (विद्युत)) विद्युतअभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
Junior Engineer (Civil) (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)) स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
Junior Engineer (Civil) (L.P.) (कनिष्ठ अभियंता (L.P.)) स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
Junior Draftsman (कनिष्ठ आरेखक) माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र
Junior Accounts Officer (कनिष्ठ लेखाधिकारी) ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली असेल व कोणतेही सरकारी कार्यालय व्यापारी भागीदार संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यातील किमान 5 वर्षाचा अखंड सेवेचा ज्यांना अनुभव असेल अशा उमेदवारामधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल. या बाबतीत लेखाशास्त्र आणि लेखा परीक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणान्यांना अथवा प्रथम वा व्दितीय वर्गातील पदवी धारण करणा-यांना अधिक पसंती दिली जाईल किंवा गणित अथवा सांख्यिकी अथवा लेखा शास्त्र व लेखा परिक्षा है। प्रमुख विषय घेऊन पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील अशा | उमेदवारांमधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल. याबाबतीत कोणत्याही सरकारी कार्यालयातील अथवा व्यापारी संस्थेतील अथवा स्थानिक प्राधीकरणातील लेखा कार्याचा अनुभव असणाऱ्यास अधिक पसंती दिली जाईल.
Junior Assistant (Clerk) (कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील आणि महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांनी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा | घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त, शासकीय परीक्षा विभाग, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी अनुक्रमे मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे दर मिनीटास 30 शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये 50 टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील असे उमेदवार
Junior Assistant Accounts (कनिष्ठ सहाय्यक लेखा) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार तसेच महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे दर मिनीटास 30 शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये 50 टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील असे उमेदवार
Jodari (जोडारी) जे उमेदवार चौथी उत्तीर्ण झाले असतील ज्यांना किमान दोन वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव असेल, शासकीय तंत्र शाळेतून विहित केलेला जोडाऱ्याचा पाठ्यक्रम किंवा तुल्य पाठ्यक्रम उत्तीर्ण झाले असतील.
Electrician (तारतंत्री) महाराष्ट्र शासनाच्या अनुज्ञापन मंडळाने दिलेले तारतंत्रीचे दुसऱ्या वर्गाचे प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता धारण करीत असतील असे उमेदवार
Supervisor (पर्यवेक्षिका) ज्या महिला उमेदवारांनी एखादया संविधिक विद्यापीठाची, खास करुन समाजशास्त्र किंवा गृहविज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील स्नातक ही पदवी धारण केलेली आहे.
Livestock Supervisor (पशुधन पर्यवेक्षक) संविधिक विद्यापीठाची, पशुवैद्यक शास्त्रातील पदवी । धारण करीत असलेल्या व्यक्ती, किंवा पशुधन पर्यवेक्षक, पशुपाल, पशुधन सहाय्यक, सहायक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन विकास अधिकारी (ब श्रेणी) या बाबतची पशुसंवर्धन संचालनालयाने दिलेली पुढील पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणा-या व्यक्ती. पशुधन पर्यवेक्षक त्यावेळच्या मुंबई राज्याने चालविलेल्या अभ्यासक्रमासह, पशुवैद्यक पशुपाल प्रशिक्षण अभ्यासक्रम
Laboratory Technician Mechanics (प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांत्रिकी) ज्याने मुख्य विषय म्हणुन भौतीकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सुक्ष्म जीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केली असेल अशा उमेदवारातून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल.
Rigman (रिगमन) शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण अथवा तिच्याशी समतुल्य जाहिर शैक्षणिक अर्हता आणि जड माल वाहन अथवा जड प्रवासी वाहनाचा, जड वाहन कामाचा वैध परवानाधारक असेल तर त्यास जड माल वाहनाचा अथवा जड प्रवासी वाहनाचा एक वर्षापेक्षा कमी अनुभव नसावा.
Stenographer (Higher Grade) (लघुलेखक (उच्च श्रेणी)) महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार तसेच आयुक्त शासकीय परिक्षा विभाग, शिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेले किंवा या नियमांचे प्रयोजनार्थ शासनाकडुन विनिर्देशपूर्वक मान्यता देण्यात आलेल्या अन्य कोणत्याही संस्थेने दिलेले किंवा मराठी लघुलेखनातील दर मिनिटास 120 श.प्र.मि. पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे आणि इंग्रजी टंकलेखनातील दर मिनिटास 40 श.प्र.मि किंवा मराठी टंकलेखनातील दर मिनिटास 30 श.प्र.मि. कमी नसेल इतक्या गतीचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक
Stenographer (Lower Grade) (लघुलेखक (निम्न श्रेणी) महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार तसेच आयुक्त शासकीय परिक्षा विभाग, शिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेले किंवा या नियमांचे प्रयोजनार्थ शासनाकडुन विनिर्देशपूर्वक मान्यता देण्यात आलेल्या अन्य कोणत्याही संस्थेने दिलेले किंवा मराठी लघुलेखनातील दर मिनिटास 120 श.प्र.मि. पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे आणि इंग्रजी टंकलेखनातील दर मिनिटास 40 श.प्र.मि किंवा मराठी टंकलेखनातील दर मिनिटास 30 श.प्र.मि. कमी नसेल इतक्या गतीचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक
Senior Assistant (Clerk) (वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)) पदवीधर
Senior Assistant Accounts (वरिष्ठ सहाय्यक लेखा) पदवीधर व 03 वर्षाचा अनुभव
Extension Officer (Agriculture) (विस्तार अधिकारी (कृषि)) ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कृषि विषयातील पदवी किंवा इतर कोणतीही अर्हता धारण केली असेल अशा उमेदवारांची नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. परंतू कृषि विषयातील उच्च शैक्षणिक अर्हता आणि कृषि विषयक कामाचा अनुभव किंवा कृषि पद्धतीचे व्यवसायाचे ज्ञान व ग्रामीण जीवनाचा अनुभव असेल अशा उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल.
Extension Officer (Panchayat) (विस्तार अधिकारी (पंचायत)) जे उमेदवार विधिद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी धारण करीत असतील असे उमेदवार परंतू ग्रामीण समाजकल्याण व स्थानिक विकास कार्यक्रमांचा तीन वर्षाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य
Extension Officer (Education) (विस्तार अधिकारी (शिक्षण)) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.एड. अथवा समकक्ष पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांना मान्यताप्राप्त प्राथमिक / माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय,
Extension Officer (Statistics) (विस्तार अधिकारी (सांख्यिकी) संविधिमान्य विद्यापिठाची विज्ञान, कृषि, वाणिज्य किंवा वाङ्मय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयासह प्रथम अगर द्वितीय वर्गातील पदवी धारण करीत असतील किंवा ज्यांना नमुना सर्वेक्षण करण्याचा अनुभव असेल, | अनुभव दोन्ही असतील असे उमेदवार परंतु, अशा विषयांपैकी एका विषयाची स्नातकोत्तर पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल
Civil Engineering Assistant (स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्ष कंवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील, आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा एक वर्षाचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण आलेले उमेदवार संविधीमान्य तत्सम खालील पाठ्यक्रम 1) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या एक वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा 2) आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन (वास्तुशास्त्रीय आरेखक), किंवा 3) कन्स्ट्रक्शन सुपरवायझर वेक्षक), 4) सैनिकी सेवेतील बांधकाम पर्यवेक्षकाचे अनुभव प्रमाणपत्र किंवा स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदविका, पदवी, पदव्युत्तर धारण करत असलेला उमेदवार

Zilla Parishad Nashik Required Age Limit – वयोमर्यादा

महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. सनिव २०२३/प्र.क्र.१४/कार्या/१२, दि. ०३ मार्च २०२३ अन्वये शासन सेवेत नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत दि. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे.
दि. ०३ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसार दि. २५ एप्रिल २०१६ च्या शासन निर्णयात विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत (खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व मागास प्रवर्गासाठी ४३ वर्षे) दोन वर्षे इतकी शिथिलता (खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्षे व मागास प्रवर्गासाळी ४५ वर्षे) देण्यात आलेली आहे.
ज्या पदासाठी संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमात विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा भिन्न कमाल वयोमर्यादा विहित केली आहे, अशा पदांसाठी देखील दि. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे.
दि. ०३ मार्च २०२३ अन्वये शासन सेवेत नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत देण्यात आलेली शिथिलता ही दि. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतच लागू राहिल.
सामाजिक व समांतर आरक्षण निहाय वयोमर्यादा

दि. २५ ऑगस्ट २०२३ रोजीचे उमेदवाराचे वय ग्राह्य धरणेत येईल.

ZP Nashik Age Limit 2023

सर्वसाधारण प्रवर्ग 18 ते 40 वर्षे
मागास प्रवर्ग  18 ते 45 वर्षे

मार्च २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे अर्ज केलेल्या उमेदवारांबाबत

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय दि. २१ ऑक्टोबर २०२२ अन्वये मार्च २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केलेले / भरलेले आहेत, व सध्या वयाधिक्य झाले असल्याने ते परीक्षेस बसण्यास अपात्र होऊन अशा उमेदवारांचे नुकसान होऊ नये, याकरिता अशा उमेदवारांचे अर्ज स्वीकारून फक्त या परीक्षेस बसण्याकरिता अशा उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात येत आहे. परंतू यासाठी उमेदवारांने नव्याने अर्ज करणे बंधनकारक राहील.
त्यानुसार सन २०२३ मध्ये घेणेत येणाऱ्या सरळसेवा भरती प्रक्रियेकरीता ज्यांनी मार्च २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे अर्ज भरलेले होते व त्यांचे वयाधिक्य झालेले आहे, अशा उमेदवारांना वयामध्ये सूट देणेत येऊन या परीक्षेकरीता पात्र समजणेत येईल.
सन २०२३ च्या जाहिरातीनुसार वयामध्ये सूट मिळविण्यासाठी उमेदवारांनी अर्ज भरताना मार्च २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे अर्ज केला असलेबाबत अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे.

ZP Nashik Online Application Fee – अर्ज शुल्क

Zilla Parishad Nashik Arj Shulk 

सर्वसाधारण प्रवर्ग रु. 1000
मागास प्रवर्ग रु. 900
माजी सैनिक अर्ज शुल्क नाही

Other Essential Qualification For ZP Nashik Online Application 

वरील सर्व पदांसाठी आवश्यक सामाईक अर्हता खालील प्रमाणे असेल.

सामाईक अर्हता तपशिल
संगणक अर्हता कंत्राटी ग्रामसेवक व पशुधन पर्यवेक्षक पदासाठी शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) क्र.मातंस – २०१२/प्र.क्र.२७७/३९, दि. ०४/०२/२०१३ मध्ये नमूद | केल्यानुसार संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक | आहे. परंतू इतर पदांसाठी संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण-२०००/प्र.क्र.६१/२००१/३९, दि. १९/०३/२००३ नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.
लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन ) नियम २००५ मधील तरतुदीनुसार शासकीय सेवेतील भरतीमध्ये विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापन नियुक्ती वेळेस हजर होतांना विवाहीत उमेदवारांनी सादर करणे बंधनकारक राहील.
प्रतिज्ञापनामध्ये नमूद केल्यानुसार हयात असलेल्या अपत्यांची संख्या दोन | पेक्षा अधिक असेल तर दिनांक २८ मार्च २००६ व तद्नंतर जन्माला आलेल्या, अपत्यामुळे उमेदवार शासकीय सेवेच्या नियुक्तीसाठी अनर्ह ठरविण्यास पात्र होईल.
या नियमातील व्याख्येनुसार लहान कुटूंब याचा अर्थ, दोन अपत्ये यांसह पत्नी व पती असा आहे.

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Below is ZP Sindudurg Online Apply Link. Click On ZP Online Apply link to proceed with Your ZP Nashik Application Form

Important Links For zpNashik.maharashtra.gov.in Bharti 2023

📑 PDF जाहिरात 🔔https://t.co/FYO3khUZDY
👉 ऑनलाईन अर्ज करा ✍https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23 – ऑनलाईन अर्ज ५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु!
✅ अधिकृत वेबसाईट 🔗https://zpnashik.maharashtra.gov.in/
🏆 ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा 🔥जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा
💰जिल्हा परिषदेत निवड झाल्यावर किती मिळेल पगार .. जाणून घ्या  🖊जिल्हा परिषद अर्ज नोंदणी कशी करावी ? छायाचित्र स्वाक्षरी परिमाण किती? 

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

24 Comments
  1. […] 🆕१०३८ पदांची जिल्हा परिषद नाशिक भरती … […]

  2. MahaBharti says

    ZP Nashik Bharti 2023 New Bharti process will begin soon…

  3. MahaBharti says

    Recruitment of 2538 posts in Nashik

  4. […] website of Cantonment Board Dehu Road is dehuroad.cantt.gov.in. The Job location for this Bharti is Pune. More detail is given […]

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड