ST Bus Half ticket for Woman
MSRTC 50% Concession on Bus Fare
Table of Contents
MSRTC 50% Concession in Bus Fare
ST Bus Half ticket for Woman – As you know the Shinde-Fadnavis government presented the budget in the Legislative Assembly. In this budget, a decision has been taken in the interest of the citizens. One of the major decisions is that women will now be given half the gross rate in ST in the state. Earlier only senior citizens were given concession in ST travel but now as per this budget provision women will also be able to travel on half fare. In this, women of any age will be able to travel in half ticket, no condition has been imposed on ST travel.
From the next financial year, women earning up to ₹25,000 a month will not have to pay professional tax while all women can travel in the MSRTC (Maharashtra State Road Transport Corporation) buses at half the ticket fare.
ST मध्ये महिलांना आता सरसकट अर्धे तिकीट
शिंदे-फडणवीस सरकारने आज विधानसभेत अर्थसंकल्प मांडला. यावेळी राज्य सरकारने महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. महिलांना आता एसटी प्रवासांत ५० टक्के सूट मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्पीय भाषणात ही योजना जाहीर केली आहे.
शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर आज हा नव्या सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प आहे. यावेळी राज्य सरकारने महिलावर्गाला विशेष लक्ष्य करत काही घोषणा केल्या आहेत. तर, लवकरच चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार असल्याचंही म्हटलं आहे. तर, महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण राबवण्यात येणार असून राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेतील तिकिटदरात महिलांना आता ५० टक्के सरसकट सवलत दिली जाणार आहे.
खासगी ट्रॅव्हल्सचा देखील महिला प्रवाश्यांना 50 टक्के सूट देण्याचा निर्णय
- एसटी महामंडळाच्या बसमध्ये महिला प्रवाशांना 50 टक्के सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घोषित केला आणि त्याच्या अंमलबजावणीला देखील सुरुवात झाली आहे. आता त्यापाठोपाठ चंद्रपूर-गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशनशी संलग्न असलेल्या खासगी ट्रॅव्हल्स मालकांनी देखील आपल्या बसमध्ये महिलांना 50 टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे.
- मंगळवारी संघटनेची तातडीने बैठक झाली आणि यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे या निर्णयावर आजपासून म्हणजे गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे.
Benefits of MSRTC Concession
- ज्येष्ठांसोबत महिलांनाही सवलत : एसटी महामंडळाची लालपरी ही ग्रामीण भागाची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाते. शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठापर्यंत लालपरी सर्वांना आपल्या ठिकाणापर्यंत पोहचवते. एसटी प्रवास सुरक्षित असतो यामुळेच अनेक महिला देखील एसटीतून प्रवासाला प्राधान्य देतात. एसटीतर्फे 65 वर्ष पूर्ण झालेल्यांना अर्धा तिकिटाच्या रकमेत प्रवास होता. त्यानंतर अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत 75 वर्षीय ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमध्ये मोफत प्रवास सवलत देण्यात आली आहे व त्यानंतर आता महिलांना देखील 50% तिकीटात सूट देण्याच निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
- महिला वर्गातून निर्णयाचे स्वागत : राज्य सरकारने महिलांना एसटी बस तिकीट दरात सवलत देण्याच्या निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे महिला वर्गाकडून स्वागत होत आहे. ज्या महिला नेहमीच लांब पल्ल्याचा प्रवास करतात, त्यांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे.
ST मध्ये महिलांना आता अर्धे तिकीट
- ७५ वर्षातील ज्येष्ट नागरिकांना मोफर एसटी प्रवास दिल्यानंतर राज्य शासनाने आता पुन्हा एक मोठा निर्णय घेतला आहे. गुरुवारी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थ संकल्प सादर करताना महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
- या निर्णयाचे राज्यातील महिलांनी स्वागत केले आहे १ एप्रिल पासून या निर्णयाची अंबलबाजवणी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याचा फायदा राज्यातील सर्च महिलाना होणार आहे हे देखील उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले आहे. राज्यातील लाखों महिलांना याचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अद्याप आदेश जारी नाही
- सध्या ७५ वर्षे वयोगटातील नागरिकांना मोफत प्रवास दिला जात आहे आता महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय झाला आहे.
- याबाबचे आदेश अद्याप प्राशासनाला प्राप्त झाले नाही याबाबत आदेश आल्यानंतर याची अंबलबजावणी करण्यात येईल.
- राज्यातील सर्वच महिलांना मिळणार अर्ध्या तिकीटाचा लाभ
- राज्य शासनाने राज्यातील ज्येष्ट नागरिकांना एसटीत मोफत प्रवास सवलत दिली आहे त्याचा फायदा राज्यातील नागरिक घेतच आहे परंतु आता महिलाना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे. यासाठी महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
ST Bus Half ticket for Woman Overview
- नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात शिंदे-फडणवीस सरकारकडून सर्वच वयोगटातील महिलांना एसटीच्या तिकिटामध्ये तब्बल ५० टक्के सूट देण्याचे जाहीर केले आहे. सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणीदेखील लगेच सुरू होणार आहे. त्यामुळे महिलांना आता ५० टक्के सवलत घेत राज्यात कोठेही एसटीने प्रवास करता येणार आहे.
- सवलतीमध्ये दुजाभाव नाही – एसटीच्या तिकिटामध्ये सवलत देताना पूर्वी काही अटी घातल्या जात होत्या. विशिष्ट वयोमर्यादा असणाऱ्या ज्येष्ठांनाच कमी तिकिटाचा लाभ घेता येत होता. मात्र, सरकारने महिलांसाठी घोषित केलेल्या ५० टक्के तिकिटाच्या सवलतमध्ये कोणतीही अट ठेवली नाही. सरसकट सर्वच महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत मिळणार आहे.
- महिलांना प्रवास करताना सुरक्षित प्रवासाची हमी एसटीमध्ये मिळतेच. त्यात आता महिलांना एसटीने तिकिटामध्ये ५० टक्के सवलत दिली असल्याने पूर्वीपेक्षा अधिक महिला एसटीने प्रवास करतील, त्यामुळे एसटीचे उत्पन्नदेखील वाढेल.
- लाखो महिलांना होणार फायदा – २०११ च्या जनगणनेनुसार पुणे जिल्ह्यातील महिलांची संख्या ही ४४ लाख ९० हजार इतकी आहे. मात्र, आता या संख्येत मागील दहा वर्षांत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ५० टक्के तिकीट दर सवलतीचा फायदा लाखो महिलांना होणार आहे.
ST Ticket Fare 50% Concession to female candidates
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |
MSRTC 50% Concession on Bus Fare
Kiti varsh vayogatatlya mahilanna half tikket lagu ahe
Test22-
MahaBhartiYojana says
No age limit
From where we can take benefit of this scheme?
Test22-
MahaBhartiYojana says
Any where in Maharashtra
From when we can take this benefits?
Test22-
MahaBhartiYojana says
From today
Is it allowed in shivneri also ?
Pune Mumbai?
its allowed for PMC & PCMC Also?
conductor has not given half ticket
कोन कोनत्या ,st बस ला 50% टिकिट सवालत आहे
NMMT बस ला ही सवलत आहे का
is this facility available for online booking also?