Mukhyamantri Ladki Bahin Yojana

Maharasjtra CM Ladki Bahin Yojana


Table of Contents

Maharasjtra CM Ladki Bahin Yojana | Mukhyamantri Ladki Bahin Yojana Applicaiton form is given here. Applications for the ‘Mukhyamantri Ladki Bahin’ scheme can be made available from 1st July 2024 and its website will be made available to the beneficiaries. The applications received will be verified by anganwadi supervisors, project officers, anganwadi workers. Gram sevaks can also verify the applications. Once we get the application from them, we will finalise the list and submit it to the district collector. The committee headed by the district collector will then release the final list of beneficiaries and they will get the benefit.

The Application filing facility Mukhyamantri Ladki Bahin Yojana is available At the Anganwadi Centre, Child Development Project Officer’s Offices, Ward office of gram panchayat and municipal corporation, Bridge Facilitation Center and Eligible women will be able to fill the application form of the scheme at Maha- e-Seva Kendras.

Ladki Bahin Maharashtra Yojana EKYC

Beneficiaries of Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Click here to complete the e-KYC process.

E-KYC Link

EKYC Ladki bahin scheme


लाडकी बहीणचा निधी लाटणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई

Action will be taken against 1,183 employees of the district council who received benefits despite being ineligible for the favored sister scheme. Such instructions have been issued by the rural development department. Additionally, it has been reported by Women and Child Development Minister Aditi Tatkare on Wednesday that accounts of more than 12,000 men who benefited from the scheme are also under investigation.

लाभ घेतलेल्या पुरुषांच्या खात्यांचीही चौकशी होणार – लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असतानाही लाभ घेतलेल्या जिल्हा परिषदेच्या १,१८३ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. तसे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. तसेच योजनेचा लाभ घेतलेल्या १२ हजारांहून अधिक पुरुषांच्या खात्यांचीही चौकशी केली जात असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी बुधवारी दिली.
५० लाख महिलांचे खाते आधारशी लिंक – लाडकी बहीण योजनेतील ५० लाख महिलांची खाती त्यांच्या आधार क्रमांकाशी लिंक केली नव्हती. ही बाब लक्षात आल्यानंतर ही खाती आधारशी लिंक केली. त्यामुळे या महिलांना भविष्यात इतर योजनांचाही लाभ मिळू शकेल, असेही त्यांनी सांगितले.

‘लाडकी बहीण’चा फायदा लाटणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार – राज्य सरकारचे आदेश; लाटलेल्या रकमेची वसुली होणार, आणखी कारवाई शक्य

  • राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा नियमबाह्य फायदा घेणाऱ्या सरकारी सेवेतील महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने सर्व संबंधित विभागांना बुधवारी दिले. आता कशा पद्धतीने कारवाई होणार याबाबत उत्सुकता आहे.
  • लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा ९५२६ महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे वृत्त लोकमतने २९ जुलै रोजी दिले होते. या महिलांनी १० महिन्यांत साडेचौदा कोटी रुपये नियमबाह्य पद्धतीने कमावले. हे पैसे अन्य लाभार्थीप्रमाणे त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले असल्याने त्यासाठी वेगळ्या पुराव्याचीही गरज नाही.
  • महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार आता या महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल. योजनेचा जेवढा पैसा त्यांच्या बँक खात्यात जमा झाला त्याची वसुली राज्य सरकार करेल. तसेच त्यांना दंडही केला जाऊ शकतो. सेवा नियमात अशा पद्धतीने प्रत्येक सरकारची आर्थिक फसवणूक केल्यास वेतनवाढ रोखण्याची कारवाईदेखील केली जाऊ शकते.
  • या ९५२६ महिलांचा डाटा महिला व बालकल्याण विभागाकडे नावांनिशी आणि त्यांच्या विभागांनिशी तयार आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाने पूर्ण पडताळणी करून हा डाटा दिला होता. त्याआधारे सरकारी कार्यालयाकडे त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या महिला कर्मचारी लाभार्थीची यादी पाठविली जाणार आहे.
  • राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार यांनी विविध विभागांच्या सचिवांची बैठक गेल्या आठवड्यात घेतली होती. योजनेचा फायदा मिळण्यासाठीच्या नियम, निकषात आपण बसत नाही याची पूर्ण कल्पना असूनही या कर्मचारी महिलांनी नियमबाह्य फायदा उचलला, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. कारवाई केली नाही तर यापुढे कर्मचाऱ्यांची हिंमत वाढून अनेक कर्मचारी विविध योजनांचा नियमबाह्य फायदा उचलतील. याबाबत बैठकीत एकमत झाले होते.
  • जुलैच्या रकमेचे वितरण – लाडकी बहीण योजनेचे जुलै महिन्याचे मानधन देण्यासाठी २९८४ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. महिला व बालविकास विभागाने बुधवारी याबाबतचा आदेश काढला.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील २६ लाख ‘बहिणी’ अपात्र

On the verge of the assembly elections, a hurriedly implemented scheme called ‘Chief Minister My Beloved Sister’ has seen a staggering 26 lakh 34 thousand of the 2 crore 52 lakh beneficiaries become ineligible for various reasons. Shockingly, it has come to light that 14 thousand 298 men also benefitted from the scheme. Senior officials have estimated that the ineligible beneficiaries have caused a loss of approximately 4 thousand 800 crores in a year.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत राबविलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील दोन कोटी ५२ लाख लाभार्थीपैकी तब्बल २६ लाख ३४ हजार जणी आता विविध कारणांनी अपात्र ठरल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे १४ हजार २९८ पुरुषांनीही योजनेचा लाभ घेतल्याचे खुद्द समोर आले आहे. अपात्र लाभार्थीमुळे वर्षभरात सुमारे चार हजार ८०० कोटीं रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज उच्चपदस्थांनी वर्तविला आहे.

महिला व बाल कल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी स्वतःच रविवारी समाजमाध्यमांवर अपात्र लाभार्थीची आकडेवारी सादर केली. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर अर्जांची फेरपडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या अन्य विभागांकडून माहिती मागविली होती. माहिती व तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या माहितीनुसार २६ लाख ३४ हजार लाभार्थी अपात्र असल्याचे समोर आले आहे. काही ‘बहिणी’ एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असून काही कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्याचे तटकरे यांनी सांगितले.

जून महिन्यापासून या लाभार्थींचे मानधन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे २.२५ कोटी पात्र लाभार्थीना सन्माननिधी वितरित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या लाभार्थीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा केल्यानंतर जे पात्र ठरतील त्यांना निधीवाटप पुन्हा सुरू केले जाईल, असे तटकरे यांनी नमूद केले. लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल, असे तटकरे यांनी नमूद केले. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या ३० हजार, वय ६५ पेक्षा जास्त असलेल्या १ लाख १० हजार महिला तर कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या १ लाख ६० हजार, अशा सुमारे पाच लाख लाभार्थीना यापूर्वीच आधीच अपात्र ठरविण्यात आले होते.
अपात्र ठरलेल्या लाभार्थीचे दरमहा दीड हजार रुपयांचे मानधन तात्पुरते रोखण्याचे आदेश दिले आहेत. शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर कोणती कारवाई करायची आणि लाटलेले मानधन वसूल करायचे किंवा नाही, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याशी चर्चा करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व घेतला जाईल. आदिती तटकरे, महिला व बालकल्याणमंत्री

जबाबदारी कोणाची?
• निवडणूक आचारसंहिता लागू होण्याआधी दरमहा दीड हजार रुपये मानधन सुरू करायचे असल्याने अर्जाची छाननी न करताच ते देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.
• या योजनेमुळे महायुती सरकार पुन्हा सत्तेवर येण्यास मोठी मदत झाली, असली तरी अपात्र लाभार्थीमुळे सरकारला सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा फटका बसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या नुकसानीला जबाबदार कोण, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
‘ भावां’वर २७ कोटींची उधळपट्टी- लाडकी बहीण योजना घाईघाईने राबविल्याचा गैरफायदा घेत १४,२९८ पुरुषांनीही वर्षभर योजनेचा लाभ उकळल्याचे तटकरे यांनी स्वतःच जाहीर केले आहे. काही अधिकाऱ्यांच्या मते या पुरुषांनी सरकारी तिजोरीतून तब्बल २७ कोटी रुपयांची लूट केल्याचा अंदाज आहे.


लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा, आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही दीपक भातुसे

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीच्या व्यापक छाननीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. प्राप्तिकर विभागाच्या अखत्यारित असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) लाभार्थी महिलांची आपल्याकडील माहिती उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. यामुळे महिला व बालविकास विभाग प्राप्तिकर परतावा (इन्कम टॅक्स रिटर्न) डेटाचा वापर करून प्राप्तिकर भरणाऱ्या महिलांची यादी तयार करून त्यांना मिळणारा लाभ बंद करू शकेल.
२.५ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न, तरी बहिणींचे अर्ज – सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असावे, ही अट घातली होती. मात्र, ज्यांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे अशा कर भरणाऱ्या महिलांनीही अर्ज केले. एकूण संख्या २ कोटी ५२ लाखांच्या घरात गेली.


‘लाडकी बहीण’चा मोबदला द्या; अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांची मागणी

उन्हाळ्यामुळे अंगणवाडीची वेळ सकाळी ८ ते दुपारी १२ करावी, लाडकी बहीण योजना अर्ज भरलेल्याचा मोबदला त्वरित मिळावा, यासह अन्य मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या तीने (सीटू) हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात उन्हाळा वाढत चालला आहे. कमाल तापमान ३६ ते ४० अंशांदरम्यान आहे. त्यामुळे अंगणवाडी सुरू ठेवण्याची वेळ सकाळी ८ दुपारी १२ करावी तसेच मातृत्व वंदन योजनेचा मोबदला मिळावा, पोषण ट्रॅकर अॅप ओपन होत नाही. त्यासाठी वेळ लागतो तसेच नेटवर्क नसल्याने फोटो अपलोड होत नाहीत. या अॅपमध्ये सुधारणा करावी. सेवानिवृत्ती लाभाची कागदपत्रे पूर्ण करून संबंधितांना त्वरित लाभ द्यावा. रिक्त जागेवर त्वरित भरती करावी, अशी मागणी आहे. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाला संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

आंदोलनात मदतनीसही – जिल्हा परिषदेसमोरील आंदोलन अध्यक्षा कॉ. आनंदी अवघडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यामध्ये संघटनेचे सल्लागार कॉ. माणिक अवघडे, प्रतिभा भोसले, अनिता चव्हाण, मालन गुरव, संगीत भुजबळ, संगीत झेंडे, उज्ज्वला मुळीक, सीमा जाधव यांच्यासह अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या होत्या.


मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा लाभ पात्र बहिणींनाच मिळण्याची खात्री करा..!

राज्यातील सर्व पात्र महिलांना ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळेल, याची खात्री करण्यासाठी आवश्यक ती पावले उचला, असे निर्देश देत उच्च न्यायालयाने या योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांना देण्यात यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका गुरुवारी निकाली काढली. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेंतर्गत राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना राज्य सरकारकडून आर्थिक सहाय्य करण्यात येते.

  • या योजनेअंतर्गत भरण्यात येणारे अर्ज छाननीसाठी ११ यंत्रणा नियुक्त करण्यात आल्या होत्या. आता केवळ अंगणवाडी केंद्रांनाच संमती देण्यात आली आहे, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. बदललेल्या योजनेंतर्गत अर्जावर प्रक्रिया करण्याबाबत याचिकाकर्त्यांनी शंका व्यक्त केली. यापूर्वी या योजनेंतर्गत महिलांना दरमहा १,५०० रुपये देण्यात येत होते. आता या रकमेत वाढ करून २,१०० रुपये देण्यात येणार आहेत.
  • गुरुवारी राज्य सरकारने यासंबंधी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. पात्र महिलांना अर्ज करता यावा, यासाठी प्रक्रिया सुलभ करण्याकरिता आवश्यक ती पावले उचलली आहेत, असे राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
  • मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांनी प्रतिज्ञापत्राची दखल घेत याचिका निकाली काढली.
  • राज्यातील सर्व पात्र महिलांना बदललेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळेल, याची खात्री करण्यासाठी आवश्यक ती पावले उचला, असे निर्देश न्यायालयाने याचिका निकाली काढताना दिले.

Where to apply for Ladki Bahin अर्ज भरण्याची सुविधा

  • अंगणवाडी केंद्रात,
  • बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये,
  • ग्रामपंचायत व महापालिकेचे वॉर्ड ऑफिस,
  • सेतू सुविधा केंद्र व
  • महा- इ- सेवा केंद्रे येथे पात्र महिलांना योजनेचा अर्ज भरता येणार आहे.

Important Dates to apply online Ladki Bahini Yojana अर्ज भरण्याची प्रक्रिया

  • – अर्ज करण्याची सुरुवात : १ जुलै
  • – अर्ज करण्याची शेवट तारीख : १५ जुलै
  • – प्रारूप निवड यादी प्रकाशित : १६ ते २० जुलै
  • – प्रारूप यादीवर हरकत, तक्रार करणे : २१ ते ३० जुलै
  • – लाभार्थी अंतिम निवड यादी प्रकाशित : १ ऑगस्ट
  • – लाभ देण्यास सुरुवात : 14 ऑगस्टपासून

Selection Process of Mukhyamantri Ladki Bahin Yojana

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी उद्यापासून (सोमवारी) अर्ज करता येणार असून त्याचे संकेतस्थळ लाभार्थींना उपलब्ध करून दिले जाईल. प्राप्त अर्जांची पडताळणी अंगणवाडी पर्यवेक्षक, प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका करतील. ग्रामसेवक देखील अर्जांची पडताळणी करू शकतात. त्यांच्याकडील अर्ज आमच्याकडे आल्यावर आम्ही यादी अंतिम करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करू. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती लाभार्थींची अंतिम यादी जाहीर करेल आणि त्यांना लाभ मिळेल.

Which women will be eligible? कोणत्या महिला असणार पात्र?

  • – महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक
  • – विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला
  • – वयाची किमान २१ वर्ष पूर्ण व कमाल ६० वर्ष मर्यादा
  • – अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणे आवश्‍यक
  • – अर्जदार महिलेच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजारांपेक्षा जास्त नसावे
  • – अन्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला नसेल
  • – ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन नावावर नसेल, अशा महिला.

Required Documents for Mukhyamantri Ladki Bahin Yojana ही कागदपत्रे जोडणे बंधनकारक

  • – ऑनलाइन संकेतस्थळावर अथवा प्रत्यक्ष अर्ज करावा
  • – आधार कार्ड आवश्‍यक
  • – राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अथवा राज्यातील जन्म दाखला
  • – बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
  • – पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड
  • – योजनेच्या अटी-शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
  • – अर्ज दाखल करताना अर्जदार महिला प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्‍यक

Important Link Complete Details in PDF



18 Comments
    Test22
  1. SANTOSH SHIVAJI BHALERAO says

    online अर्ज भरण्यासाठी लिंकच ओपन नाही ..कसा भरायचा अर्ज ? काहीतरीच सांगायचं उगी …

  2. Test22
  3. tukaram anil wagh says

    pc varti form bharayla link

  4. Test22
  5. Ankush Joshi says

    मुख्यमंत्री लाकडी बहीण योजना सुरू करण्याची आहे

  6. Test22
  7. अभिषेक लोकरे says

    बहिण योजना

  8. Test22
  9. aaksh gavali says

    ny

  10. Test22
  11. aaksh gavali says

    at. ajepur . post sutare

  12. Test22
  13. Asma Majid pathan says

    Ladki bahini yojana k documents dobara online bharane ho to Kya Karen pahla form reject hua hai

  14. Test22
  15. मीताली बागडे says

    आमी अजुन फोम नाही भरलेला आहे तर आमी फोम कसे भरायच सागान आमाला पीलयज

  16. Test22
  17. मीताली बागडे says

    Online भरनाची लीक ओपन नाही तर अर्ज कसे करायचे आमी खुप गरीब आहे

Comments are closed.