Mhaje Ghar Yojana
Mhaje Ghar Yojana – The distribution of applications for the ‘Mhaje Ghar’ scheme launched by the state government has begun. Numerous people in Pedne have been waiting for years to own their homes. It has been appealed by Rajan Koragavkar, founder of Mission for Local, Pedne, that as many people as possible should benefit from this scheme and acquire ownership of their homes.
माझे घर’ योजनेमुळे मयेवासीयांना आता घरांचा मालकी हक्क प्राप्त होणार आहे. सरकारच्या निर्णयामुळे यापुढे घरदुरुस्ती किंवा विभाजन करण्याची प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत होणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. एखाद्याचे घर रस्त्यालगत असेल, तर त्या घरालाही संरक्षण मिळेल, ते बांधकाम खात्याला पाडता येणार नाही. गरजच असेल तर भरपाई द्यावी लागेल. ‘माझे घर’साठी पालिकेने वेळेत दाखले दिले नाहीत, तर थेट मला फोन करा, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले.
- माझे घर योजनेेचे अर्ज वितरणाच्या बायणा रवींद्र भवनात मंगळवारी (ता.१४) आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत बोलत होते. सर्वसामान्यांनी बऱ्याच वर्षापूर्वी बांधलेल्या घरांमध्ये त्यांना व पुढील पिढीला सुखासमाधानाने राहता यावे यासाठी ही योजना मार्गी लावल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सडा भागातील गोवा राज्य पुनर्वसन बोर्डाच्या वसाहतीतील सदनिकांचा मालकी हक्क संबंधितांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- रवींद्र भवनात आयोजित या कार्यक्रमाला मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, मुरगावचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर, दक्षिण गोवाच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लिट्स, मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमली, संयुक्त मामलेदार जान्हवी केळेकर, गोवा राज्य पुनर्वसन बोर्डाचे सदस्य सचिव आलेक्स डिकॉस्ता, रवींद्र भवनचे अध्यक्ष जयंत जाधव उपस्थित होते. जो घर बांधतो,त्याची एकच इच्छा असते की, आपल्यानंतर आपल्या पुढील पिढीलाही या घराचा आसरा मिळाला पाहिजे. त्यांची ती ईच्छा आता पूर्ण होणार आहे, असे डॉ. सावंत यांनी सांगितलेे.
- ‘माझे घर’विरोधींना जवळ करू नका! – सर्वसामान्य गोवेकरांना दिलासा देण्यासाठी आखण्यात आलेल्या ‘माझे घर’ योजनेला विरोध करणाऱ्या लोकांना जवळ करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. ही सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून राज्यातील सर्वसामान्य जनतेचे हित लक्षात घेऊन या योजनेची अंमलबजावणी होणार आहे, असेही ते म्हणाले.
- ‘माझे घर’ योजना हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यामुळे माझे घरची संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. जेणेकरून लोकांना घराचा मालकी हक्क मिळणार आहे. जेणेकरून घर पाडण्यात येईल हे त्यांच्या मनातील भय दूर होणार आहे. मुरगावात बहुतांश घरे सरकारी जमिनीवर असल्याने लोकांना दिवाळीची ही भेट मिळाली आहे. -संकल्प आमोणकर, आमदार
- ‘माझे घर’ योजनेचा लाभ घ्यावा – राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘माझे घर’ योजनेचे अर्ज वितरण करण्याचे काम सुरू झाले आहे. पेडणेतील असंख्य लोक आपल्या घरांच्या मालकीसाठी कित्येक वर्षे प्रतीक्षेत आहेत. या योजनेचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा आणि आपल्या घरांची मालकी प्राप्त करावी, असे आवाहन मिशन फॉर लोकल, पेडणेचे संस्थापक राजन कोरगावकर यांनी केले.
- राज्य सरकारला कायदे तयार करण्याचा अधिकार आहे. ‘माझे घर’ योजनेअंतर्गत घरांच्या मालकीचे वेगवेगळे विषय हाताळण्यासाठी सरकारने वेगवेगळे कायदे आणि निर्णय घेतले आहेत. या योजनेबाबत विरोधक वेगवेगळे विषय उपस्थित करत आहेत. अनेकांनी या कायद्यांना न्यायालयातही आव्हान दिले आहे. ही योजना कायद्याच्या कक्षेत येते की नाही, हे न्यायालय ठरविणार; परंतु सरकारच जेव्हा या योजनेचा प्रचार आणि प्रसार करत आहेत, तेव्हा पीडित लोकांनी त्याचा लाभ घेणे यात काहीच चुकीचे नाही. पेडणे मतदारसंघात लोकांच्या जमिनी आणि घरे त्यांच्या नावावर नाहीत. मोपा विमानतळासाठी भूसंपादन केलेल्या ७० टक्के लोकांना मालकीच्या विषयावरून भरपाई मिळू शकली नाही. आता घरांबाबत जेव्हा सरकारनेच हे कायदे मंजूर केले आहेत तेव्हा त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोरगावकर यांनी केले आहे.
Mhaje Ghar Yojana Details
- Certification of Structures (Deputy Collector and Sub-Divisional Officer)
- Certification of Structures (Muncipality)
- Certification of Structures (Village Panchayat)
- Bifurcation of House Number Circular (Municipality)
- Bifurcation of House Number Circular (Village Panchayat)
- Permission to the Repairs of existing single dwelling unit/structure (Municipality)
- Permission to the Repairs of existing single dwelling unit/structure (Village Panchayat)
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना | सरकारी योजना |
कृषी योजना | प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना | दिव्यांग योजना |

Comments are closed.