MahaDBT Farmer Scheme Lottery


MahaDBT Farmer Scheme Lottery

MahaDBT Farmer Scheme Lottery for agricultural mechanization. The Main objective of this scheme is to  extend the benefits of agricultural mechanization to small and marginal farmers in areas where energy consumption in agriculture is low and to Creating awareness among participants through demonstrations and manpower development. MahaDBT through this scheme provides financial support for purchase of agricultural machinery/implements and encourages agricultural mechanization to the participants through training and demonstration. Read the complete details of this scheme on this page. And also the Online Registration link is given bottom of this page.

डीबीटीशिवाय योजना नाही; कल्याणकारी योजनांत मोठे फेरबदल

The central government is preparing for major changes in welfare schemes and the structure of public expenditure. A review of all 314 social and development schemes in the country is going to be conducted. From April 1, 2026, the implementation of direct benefit transfer (DBT) systems linked with Aadhaar will become mandatory. Fifty-four centrally sponsored schemes (CSS) and 260 central government schemes (CS) will be evaluated before being continued from April 1, 2026. These schemes include major programs such as MGNREGA, PM-Kisan, Jal Jeevan Mission, PM Awas Yojana, and the National Health Mission.

केंद्र सरकार कल्याणकारी योजना आणि सार्वजनिक खर्चाच्या रचनेत मोठ्या बदलाची तयारी करत आहे. देशातील सर्व ३१४ सामाजिक आणि विकास योजनांचा आढावा घेतला जाणार आहे. १ एप्रिल २०२६ पासून आधारशी जोडलेल्या थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीची अंमलबजावणी बंधनकारक होणार आहे. ५४ केंद्र प्रायोजित योजना (सीएसएस) आणि २६० केंद्र सरकारच्या योजना (सीएस) १ एप्रिल २०२६ पासून पुढे सुरू ठेवण्यापूर्वी त्यांचे मूल्यांकन होणार आहे. या योजनांमध्ये मनरेगा, पीएम- किसान, जल जीवन मिशन, पीएम आवास योजना आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यासारख्या प्रमुख योजनांचा समावेश आहे.

  • २०१६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पीय सुधारणांअंतर्गत योजनांचे कालांतराने पुनरावलोकन करण्याचे बंधन असले तरी, यावेळी सरकार आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे. कॅगव्यतिरिक्त स्वतंत्र मूल्यांकन आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी पुनरावलोकन यंत्रणा तयार करण्याचा विचार केला जात आहे. नीती आयोगाकडून बहुविषयक तज्ज्ञांची निवड करण्यासाठी स्पर्धात्मक बोली लावण्याची शक्यता आहे. या मूल्यांकनात केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकातील १० टक्क्यांहून अधि हिस्सा असलेल्या नऊ प्राधान्य क्षेत्रांचा समावेश असेल. मंत्रालयांना योजनांतील निधीचे काही प्रमाणात फेरवाटप करण्याची परवानगी मिळू शकते; पण तीही मर्यादित आणि मंजुरीअंतर्गत असेल.
  • हा आहे सुधारणेचा मुख्य गाभा – या सुधारणेचा मुख्य गाभा म्हणजे डीबीटीशिवाय कोणतीही योजना सुरू राहणार नाही. सध्याच्या सर्व योजनांना आधार सक्षम पेमेंट सिस्टमवर (एईपीएस) स्थानांतरित व्हावे लागेल आणि नव्या योजना सुरुवातीपासूनच कॅशलेस स्वरूपात असतील. केंद्र आणि राज्य मंत्रालयांना आधार सिडिंग आणि प्रमाणीकरण सार्वत्रिकपणे लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
  • सर्व योजनांचे अनुपालन आणि कामगिरी मोजण्यासाठी एक एकात्मिक केंद्रिकृत मॉनिटरिंग फ्रेमवर्क असेल. या काळात सरकार भांडवली खर्चात मोठी वाढ करण्याच्या तयारीत असून, २०२५-२६ मध्ये तो ११.२१ लाख कोटींवर पोहोचणार आहे.
  • कमी योजना, कडक ऑडिट, बायोमेट्रिकद्वारे वितरण, रिअल टाइम देखरेख आणि वित्तीय शिस्त है व्यवस्थेच्या पुढील टप्याला आकार देतील.

SUB-MISSION ON AGRICULTURAL MECHANIZATION
कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान

  • सारांश – कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेती मधील उर्जेच्या वापराचे प्रमाण २ किलोवॅट/ हेक्टर पर्यंत वाढविणे.
  • उद्देश : जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे.
    प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे.
  • धोरण : कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिका द्वारे सहभागीदारांना कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे

Subsidy – अनुदान

या योजनेतून खालील दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल:

  1. १) ट्रॅक्टर
  2. २) पॉवर टिलर
  3. ३) ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
  4. ४) बैल चलित यंत्र/अवजारे
  5. ५) मनुष्य चलित यंत्र/अवजारे
  6. ६) प्रक्रिया संच
  7. ७) काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
  8. ८) फलोत्पादन यंत्र/अवजारे
  9. ९) वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
  10. १०) स्वयं चलित यंत्रे

भाडे तत्वावरील सुविधा केंद्र:

  1. १) कृषि अवजारे बँकेची स्थापना
  2. २) उच्च तंत्रज्ञान , उत्पादन सेवा सुविधा केंद्राची स्थापना
  3. *लाभाच्या माहितीसाठी कृपया सोबतचे प्रपत्र पाहावे.

Eligibility to avail Maha DBT Scheme

पात्रता

  1. शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
  2. शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा
  3. शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
  4. फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार
  5. कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु  ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक
  6. एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल
  7. उदा. एखाद्या शेतकऱ्याला सन २०१८-१९ मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील १० वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन २०१९-२० मध्ये इतर औजारासाठी लाभापात्र राहील

Required Documents for MahaDBT Farmer Scheme

आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. ७/१२ उतारा
  3. ८ अ दाखला
  4. खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
  5. जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
  6. स्वयं घोषणापत्र
  7. पूर्वसंमती पत्र

Online Registration for MahaDBT Farmer Scheme

  1. Farmers can Register and submit their application form online (For applying State and Centrally sponsored agriculture schemes) from anywhere, anytime.
  2. Farmers can View/Track the status of their own application by entering the Application ID in the
  3. Application Tracking module.
  4. Uploading of supporting documents (such as 7/12 certificate, 8 A Certificate, Copy of passbook of aadhaar linked bank account, Invoice copy of purchase made…etc.,) for easy verification and transparency.
  5. Applicants will receive SMS and email alerts at various stages of application processing.
  6. Direct disbursal of benefits to the registered applicants Aadhaar linked Bank Account.
  7. Easy sanctioning of application process for Sanctioning Authority
  8. Creation of Role Based Unique Login ID and Password
  9. Transparency in monitoring of Scholarship by Department / State Government or both.

Online Registration for MahaDBT Farmer Scheme 

Online Registration Process

Online Apply For Farmar Scheme



23 Comments
    Test22
  1. MahaBhartiYojana says

    MahaDBT Farmer Scheme Lottery

  2. Test22
  3. Dnyaneshwar says

    Combine shetar asel tar Kay karayche

  4. Test22
  5. madhuri patil says

    tractoro kharedi karun prakran purn karun ek mahina zala ahe anudan kadhi yeil

  6. Test22
  7. Hanmant Bharat Umate says

    Online is. Not available

  8. Test22
  9. गणेश दशरथ काळे says

    ट्रॅक्टर स्वतःच्या नावे असेल आणि सातबारा नसेल तर सबसिडी मिळेल काा

  10. Test22
  11. Satish Patil says

    Kokilabai Ratilal patil
    Yanch naw ka nahi ale

  12. Test22
  13. Shyam raut says

    मार्च महिन्यातील नावे कधी प्रसिद्ध होतील

  14. Test22
  15. सचिन भिमराव बनसोडे says

    पुर्ण कागदपत्राची पुर्तता झाले नंतर अनुदान किती दिवसांनी जमा होते???

  16. Test22
  17. Amit damle says

    अर्ज केल्यानंतर किती दिवसात मंजुरी मिळाते. अथवा ल्आटरीची सोडत किती दिवसानी होते

Comments are closed.