Madh Kendra Yojana Maharashtra -मध केंद्र योजना महाराष्ट्र 2023
Madh Kendra Yojana Maharashtra 2023 - Benefit, Eligibility, Apply Link
Table of Contents
Madh Kendra Yojana http://www.mskvib.org/
Madh Kendra Yojana has been started by the Government of Maharashtra. The scheme will be implemented at the district level through the Khadi and Village Industries Board of the state. Madh Kendra Yojana has been launched in the entire state so all the farmers and beekeepers of the state can benefit from this scheme. Young women can also take advantage of this scheme along with the youth of the state and start their own honey center.
The main objective of the Madh Kendra Yojana is to help the beneficiaries in all sectors of the state to increase their income from beekeeping business and raise their standard of living as well as to create infrastructure for the development of the honey industry, to raise their standard. Considering the favorable environment for the development of honey industry in the state, the main objective of this scheme is to create beekeepers who are engaged in the business of honey industry on a professional basis.
मध केंद्र योजना महाराष्ट्र 2024 साठी अर्ज सुरू, घ्या जाणून योजना
Madh Kendra Yojana Maharashtra : महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध सरकारी योजना राबवित असते. त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव मध केंद्र योजनाआहे. या योजनेची सुरुवात २०१९ साली करण्यात आली. महाराष्ट्र राज्यात सुमारे ७० टक्के लोकसंख्या शेती व्यवसायावर उपजिवीका करत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय अधिक फायदेशीर होण्यासाठी शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित असते. मधमाशांमुळे शेती उत्पनात भरघोस वाढ होत असल्याने मध उद्योगाला अधिक चालना देणे आवश्यक आहे. मध उद्योग हा केवळ शेतीपुरक व्यवसाय व जोडधंदा म्हणून न करता एक मुख्य उद्योग म्हणून केल्यास त्यातून ग्रामीण रोजगार निर्मितीला चालना मिळेल. मधमाशांच्या मधपेट्या शेती पिके व फळबागायतींच्या ठिकाणी व तसेच जंगलात ठेवल्यास मधमाशाव्दारे पर-परागीभवन होऊन पिकांच्या उत्पादनात पिकांच्या प्रकारानुसार ५ ते ४५ टक्के उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ मधमाशांनी उत्पादीत केलेल्या मधाच्या व मेणाच्या किंमतीच्या १० ते १५ टक्के अधिक आहे.
मधमाशा पालन हा एक वैशिष्टयपूर्ण बहुउद्देशिय उद्योग आहे. मध संकलन, पराग संकलन, मधमाशांच्या वसाहतींची संख्या वाढविणे, या उद्योगातील उप उत्पादनांचे संकलन करणे, तसेच मराठवाडा विभागात तेलबियांच्या पीकांचे असणारे अधिक व पश्चिम घाट क्षेत्रात व तसेच विदर्भातील जिल्ह्यांत असणारे वनक्षेत्र, कोकण विभागातील जंगल व फळबागांचे क्षेत्र अशी वैविध्यपूर्ण निसर्ग संपदा असल्याने राज्यात मध उद्योगाच्या विकासाला मोठा वाव आहे. त्यादृष्टीने मधमाशा पालन उद्योग हा सदर उद्दिष्टांशी सुसंगत असा उद्योग असल्याने मधमाशा पालन उपक्रमास उद्योग म्हणून चालना देण्यासाठी राज्यात सर्व जिल्हयांत सदर योजना सुरु करण्यात आली आहे.
Madh Kendra Yojana Purpose
राज्यातील सर्व घटकातील लाभार्थीना मधमाशा पालन व्यवसायातून उत्पन्न वाढीसाठी मदत करुन त्यांचे जीवनमान उंचावणे आणि मध उद्योगाचा विकास करणे यासाठी पायाभूत सुविधा निर्मिती करणे, त्यांचा दर्जा वाढविणे इत्यादी बाबींची आवश्यकता लक्षात घेऊन राज्यातील मध उद्योगाच्या विकासासाठी असणारे पोषक वातावरण लक्षात घेता व्यावसायिक तत्वावर मध उद्योगाचा व्यवसाय करणारे मधपाळ निर्माण करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
Required Documents for Madh Kendra Yojana
मध केंद्र योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- Aadhar Card
- Ration Card
- Residence Certificate
- Education certificate
- mobile number
- Email Id
- Passport size photograph
- Bank account information
- Bee keeping certificate
Madh Kendra Yojana Application Process
मध केंद्र योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
- First of all the applicant has to go to his district office.
- You have to go to the Khadi and Village Industry Center in the district office and apply for this scheme.
- Fill all the information asked in the application form and attach xerox copies of required documents.
- The filled application form has to be submitted in the office of Khadi and Village Industries.
- This will complete your application process under this scheme.
मध केंद्र योजना काय आहे याबद्दल आज आपण पाहणार आहोत
Madh Kendra Yojana Features
- मध केंद्र योजना कोण राबविणार आहे ? – महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ
- योजनेची व्याप्ती –
- सदर योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू आहे.
- योजना अंमलबजावणी करिता जिल्हाधिकारी कार्यालयात समिती स्थापन केली आहे.
- योजनेचे लाभ काय असतील ?
- ५० % साहित्य स्वरूपात अनुदान,
- मोफत मध उद्योग शासकीय प्रशिक्षण
- विशेष बाब –
- शासकीय प्रशिक्षण अगदी मोफत मिळणार आहे.
- सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार निर्माण होईल.
- ग्रामीण भागात अर्थकारण संधी मिळेल.
- योजनेचा लाभ कशा घ्यायचा ? वरील योजनेत वेगवेगळ्या वर्गवारी मध्ये सहभाग घेता येणार आहे.
- १. वैयक्तिक मधपाळ
- २. केंद्र चालक प्रगतिशील मधपाळ
- ३. केंद्र चालक संस्था
- ४. विशेष छंद प्रशिक्षण
- ५. आग्या मध संकलन प्रशिक्षण
- वैयक्तिक मधपाळयाकरिता
- लाभार्थी साक्षर आणि १८ वर्ष वयापेक्षा जास्त असणे आवश्यक.
- त्यास २४ हजार रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
- २४ हजार रुपयांची साहित्य आणि साधने मिळणार आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी १० दिवसांचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक
- केंद्र चालक प्रगतिशील मधपाळया घटकाकरिता
- लाभार्थी २१ वर्ष पूर्ण आणि किमान १० पास असणे गरजेचे आहे.
- लाभार्थीच्या नावे किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे किमान १ एकर जमीन असणे आवश्यक आहे.
- स्वतः ची १ एकर जमीन नसेल तर भाडे तत्वावर घेतलीली चालेल.
- विशेष आणि महत्त्वपूर्ण बाब म्हणजे लाभार्थीकडे मधमाशा पालन प्रशिक्षण, मधमाशा प्रजनन सुविधा असणे गरजेचे आहे.
- केंद्र चालक संस्थायाकरिता
- ही संस्था कायद्याने नोंदणीकृत असावी.
- मधमाशा पालन प्रशिक्षण, मधमाशा प्रजनन सुविधा असणे गरजेचे आहे.
- संस्थेकडे स्वतः ची किंवा भाड्याने घेतलेली १००० चौरस फूट इमारत आणि १ एकर जमीन पाहिजे.
- विशेष छंद प्रशिक्षणयाकरिता
- २५ रुपये फी आकारण्यात येईल.
- अर्ज करण्याकरिता सर्वजण पात्र आहेत.
- ५ दिवस शासकीय प्रशिक्षण देण्यात येईल.
- आग्या मध संकलन प्रशिक्षण
- १८ ते ५० वयोगटातील आणि साक्षर व्यक्ती यासाठी पात्र.
- ५ दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येईल.
- महत्वाचे –
- लाभार्थींना प्रशिक्षण कुठे द्यायचे हे सर्व अधिकार मंडळाकडे असतील.
- प्रशिक्षण सुरू करण्यापूर्वी मध केंद्र सुरू करणार आहे अशा एक बॉण्ड मंडळाला द्यावा लागेल.
- अधिक माहितीसाठी संपर्क –
- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, महाबळेश्वर, जि. सातारा
- प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी कार्यालय
- संपर्क क्रमांक –
- ०२१६८-२६०२६४
- तसेच अधिक माहितीसाठी खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या अधिकृत संकेतस्थळ सुद्धा तपासावे.
Madh Kendra Yojana Maharashtra Benefits
मध केंद्र योजनेचे फायदे
- मध केंद्र योजनेअंतर्गत स्वतःचे मध केंद्र सुरु करण्यासाठी राज्यातील शेतकरी, मधपाळ तसेच इच्छुक तरुण/तरुणीस महाराष्ट्र शासनाकडून योजनेच्या खर्चाची ५० टक्के रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात येते.
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
- मध केंद्र योजनेअंतर्गत ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
- या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिक स्वतःचा स्वरोजगार स्थापित करून शकतील ज्यामुळे त्यांना नोकरीसाठी वणवण फिरण्याची आवश्यकता भासणार नाही.
- मध केंद्र योजनेच्या सहाय्याने राज्यातील बेरोजगारी कमी होईल.
- राज्यातील तरुण/तरुणी सशक्त व आत्मनिर्भर बनतील व स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील.
- या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिक स्वतःचा स्वरोजगार सुरु करून राज्यातील इतर बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करू शकतील.
- मध केंद्र योजनेच्या सहाय्याने शेतकरी स्वतःच्या उत्पन्न वाढ करून शकतील.
- मध केंद्र योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून ५० टक्के अनुदान देण्यात येते त्यामुळे शेतकऱ्यांना,मधपाळ,तरुण/तरुणींना कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
- या योजनेच्या सहाय्याने राज्यातील शेतकरी,मधपाळ यांचा आर्थिक विकास होईल.
- या योजनेच्या सहाय्याने शेतकऱ्याचे जीवनमान सुधारेल व त्याचे भविष्य उज्वल बनेल.
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |
Madh Kendra Yojana Maharashtra
फ्रोम कसा भरायचा
सर अर्ज कसा & कुठं भरायचा आहे
How to apply