Ek Khidki Yojana for Industries

Ek Khidki Yojana


Ek Khidki Yojana for Industries – Ek Khidki Yojana | One window scheme for Businessmen -A conducive environment will be created for business and industry growth in the district. District Collector Jitendra Dudi said that a one-window scheme will be started soon to get permission from various departments under the collector’s office.

The general public will be able to meet District Collector Jitendra Dudi from 3 pm to 5 pm on Monday to Friday. The district collector has instructed the officials to conduct physical inspections along with the office. Instructions have been given to inspect schools, health centres and anganwadis in particular. Funds for office maintenance and repairs will come from the District Planning Committee.

जिल्ह्यात व्यवसाय, उद्योगवाढीसाठी एक खिडकी योजना

जिल्ह्यात व्यवसाय, उद्योगवाढीसाठी अनुकूल वातावरण तयार केले जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या विविध विभागांची परवानगी घेण्यासाठी एक खिडकी योजना लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

ek khidki yojana

कायदा सुव्यवस्था चांगली असेल, तर उद्योजकांना विश्वास वाटतो. अधिकाधिक उद्योजक जिल्ह्यात यायला हवेत. उद्योजकांना त्रास देणारे, आर्थिक मागणी करणारे, खंडणीची मागणी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. याबाबत डुडी म्हणाले, जिल्ह्यात उद्योग सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या ११ विभागांची परवानगी घ्यावी लागते. यातील ७ विभाग हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत येतात. या सर्व विभागांतील परवानग्या एकाच ठिकाणी मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार आहे. या परवान्यासाठी लागणारे कागदपत्रे कमी असतील तर संबंधित व्यक्तीशी संपर्क करून पूर्तता केली जाणार आहे. महिन्याभरात प्रक्रिया सुरू होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळाचे नूतनीकरण केले जाणार आहे. उद्योजकांना त्रास दिल्यास संकेतस्थळावर तक्रार नोंदविता येणार आहे. तक्रार झाल्यानंतर पोलिस प्रशासनाला सूचना देऊन गुन्हे दाखल करून कारवाई केली जाईल.
सोमवार ते शुक्रवारी दुपारी भेटता येणार – सर्वसामान्य नागरिकांना सोमवार ते शुक्रवार दुपारी ३ ते ५ या दरम्यान जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना भेटता येणार आहे. अधिकाऱ्यांनी कार्यालयाबरोबरच प्रत्यक्ष पाहणी करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. विशेषत: शाळा, आरोग्य केंद्र आणि अंगणवाड्यांची पाहणी करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. कार्यालय देखभाल दुरुस्तीसाठीचा निधी जिल्हा नियोजन समितीतून देण्यात येणार आहे.



Leave A Reply

Your email address will not be published.