महिलांना नागरी पतसंस्था नोंदणीची संधी – Mahila Nagari Patsanstha Registration
Mahila Nagari Patsanstha Registration – Another step towards the economic empowerment of beloved sisters, a major decision regarding the registration of women’s credit societies. Under the state government’s ambitious scheme ‘Chief Minister Ladki Bahin’, the beneficiaries will be encouraged towards economic empowerment. For this, a decision has been taken to establish women’s urban cooperative credit societies with their own participation.
Objective of Mahila Nagari Patsanstha Registration – An innovative and important step has been taken with the view that the Ladki Bahin can start small and big businesses through credit institutions. It was said that the main objective of the Cooperative Department is to establish a credit institution movement in every village for the economic empowerment of women.
लाडक्या बहिणींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘लाडकी बहीण पतसंस्था सुरू
लाडक्या बहिणींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणखी एक पाऊल, महिला पतसंस्था नोंदणींचा मोठा निर्णय. राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास चालना देण्यात येणार आहे. यासाठी त्यांच्याच सहभागातून महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास चालना देण्यात येणार आहे. यासाठी त्यांच्याच सहभागातून महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करून नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.
- बचतीच्या बाबतीत पुरुषांपेक्षा महिला या नेहमीच सरस राहिल्या आहेत. अगदी एक-एक रुपयांचा हिशोब शक्ति ठेवण्याबरोबरच पै पै साठवून संसाराला आर्थिक हातभार लावण्यात त्या पुढे असतात. त्यामुळे महिलांच्या बचतीला चालना देत त्यांना उद्योग-व्यवसायासाठी भक्कम आर्थिक आधार मिळावा यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात ‘लाडकी बहीण पतसंस्था सुरू केली आहे.
- या पतसंस्थेच्या माध्यमातून आपली रक्कम सुरक्षित ठेवण्यासोबतच कमी व्याजदरात कर्ज घेऊ शकतील. तसेच एफडी, आरडीसह पतसंस्थेतील इतर वित्तीय सुविधा मिळू शकतील. महिला सक्षमीकरणासाठी शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांची नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात आली आहे.
- महिला सहकारी पतसंस्थेचे सभासद होण्यासाठी महिला व बाल विकास विभाग यांनी प्रमाणित केलेल्या यादीत संबंधित महिला लाभार्थीचे नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे. ज्या महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेंतर्गत महिलांची पतसंस्था नोंदवायची आहे त्यांनी उपनिबंधकांकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.
- जिल्ह्यात लाडकी बहीण पतसंस्था सुरू केली आहे. त्यामुळे महिलांची आर्थिक बचत होण्यास मदत होणार आहे. कुंदन शिनगारे, समन्वयक अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ
- लाडक्या बहिणींची बचत सुरक्षित राहणार – लाडक्या बहिणींना राज्य सरकारच्यावतीने प्रत्येक महिन्याला आर्थिक मदत केली जात आहे. या मदतीची बचत व्हावी या उद्देशाने सरकारने पतसंस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या पतसंस्थेतून लाडक्या बहिणी कर्ज घेऊ शकणार आहेत. व्याजदरही कमी असेल. शिवाय गुंतवणुकीवर व्याज मिळणार आहे.
अन्य महत्वाच्या योजना !!
नवीन योजना |
सरकारी योजना |
कृषी योजना |
प्रधानमंत्री योजना |
महाराष्ट्र योजना |
दिव्यांग योजना |
Mahila Nagari Patsanstha Registration