PM Vidyalaxmi Scheme

PM Vidya Lakshme Yojana


The Union Cabinet on Wednesday approved the PM-Vidyalaxmi scheme for financial assistance to students applying for higher education. The scheme will get Rs 3,600 crore for 2024-25 to 2030-31. The scheme will provide students a 75 % credit guarantee by the central government for loans up to Rs 7.5 lakh.
Under the PM Vidyalaxmi scheme, any student who gets admission to a Quality Higher Education Institution (QHEIs) will be eligible to get collateral free and guarantor-free loans from banks and financial institutions to cover the full amount of tuition fees and other expenses related to the course.
This scheme is an extension of the scheme already given to students of families with an annual income of up to Rs 4.5 lakh. Application for Pradhan Mantri Vidyalakshmi Yojana will have to be done by visiting the Vidyalakshmi Portal https://www.vidyalakshmi.co.in/.

पीएम विद्यालक्ष्मी योजना काय आहे? विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी मिळू शकते अर्थसहाय्य; जाणून घ्या अर्ज कसा करावा?

विद्यार्थ्यांना पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत उच्च शिक्षणासाठी  शैक्षणिक कर्ज आणि शिष्यवृत्ती दिली जाते. सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विद्यालक्ष्मी पोर्टल नावाचे एक ऑनलाईन पोर्टल लॉन्च केली आहे. या पोर्टलच्या मदतीने विद्यार्थी वेगवेगळ्या बँखांकडून शैक्षणिक कर्ज घेऊ शकतात. सोबतच या पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठीही अर्ज करू शकतात. याच पार्श्वभूमीवर या योजनेचा फायदा घेण्यासाठी नेमकं काय करायला हवं? अर्ज कसा करावा? हे जाणून घेऊ या..

  • अर्ज कसा करावा?   – पीएम विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत अर्जप्रक्रिया सोपी कशी होईल, याची खबरदारी घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर त्यांना सर्वांत अघोदर पीएम विद्यालक्ष्मी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे. या संकेतस्थळावर अर्जाची सर्व प्रक्रिया तसेच या योजनेसंदर्भातील माहिती सविस्तरपणे दिलेली आहे.
  • सर्वांत अगोदर रजिस्ट्रेसन करा  – विद्यालक्ष्मी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना अगोदर त्यांचे रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशनच्या ऑप्शनवर जाऊन त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. नाव, पत्ता, इमेल आयडी आदी माहिती भरून रजिस्ट्रेशनची ही प्रक्रिया पूर्ण होईल. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळेल. त्याच्या मदतीने तुम्ही या संकेतस्थळावर भविष्यात लॉग इन करू शकाल.
  • आता अर्ज भरा  – विद्यार्थ्यांनी लॉगीन केल्यावर संकेतस्थळावर नवे पेज खुले होील. त्यावर तुम्हाला विद्यालक्ष्मी योजनेसाठी अर्ज करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून आवश्यक ती सर्व माहिती भरा. ही माहिती भरताना तुम्हाला शैक्षणिक माहिती, कुटुंबाचे उत्पन्न तसेच इतर माहित द्यावी लागेल.
  • डॉक्यूमेंट्स अपलोड करा – विद्यालक्ष्मी योजनेचा लभ घेण्यासाठी अर्ज भरताना तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागतील. यामध्ये आधार कार्ड, कुटुंबाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, इयत्ता 12 वी गुणपत्रिका, जातप्रमाणपत्र (लागू असेल तर), रहिवासी प्रमाणपत्र आदी कागदपत्रांचा यात समावेश आहे.
  • वर दिलेलली सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्ही हा अर्ज पुन्हा एकदा तपासायचा आहे. सर्व माहिती योग्य भरलेली आहे की नाही हे पाहायचे आहे. त्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज संकेतस्थळावर जमा करावा.
  • तुम्ही तुमचा अर्ज जमा केल्यानंतर तो तपासला जाईल. तुमचा अर्ज स्वीकारण्यात आल्यास तशी माहिती तुम्हाला ई-मेल आमि मोबाईलवर मेसेजच्या माध्यमातून दिली जाईल. अशा प्रकारे तुम्ही विद्यालक्ष्मी योजनेचा लाभ घेऊ शकता.

गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य पीएम- विद्यालक्ष्मी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पीएम- विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेनुसार उच्चशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणारा कोणताही विद्यार्थी शिक्षण शुल्कासाठी आणि अभ्यासक्रमाशी संबंधित इतर खर्चासाठी बँक आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊ शकतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्टमध्ये म्हटले आहे की, शिक्षण अधिक सुलभ करण्यासाठी ही एक मोठी चालना आहे. या योजनेसाठी ३,६०० कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे, तर त्यात दरवर्षी २२ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी होतील. २०२४-२५ ते २०३०-३१ या वर्षात ३,६०० कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. उच्चशिक्षण विभागाकडे पीएम-विद्यालक्ष्मी’ हे पोर्टल असेल ज्याव सर्व बँकांद्वारे वापरल्या जाणान्य अर्ज प्रक्रियेद्वारे विद्यार्थी शैक्षणिक कर्जासाठी तसेच सवलतीसाठी अर्ज करू शकतील.

उच्चशिक्षणासाठी आता आर्थिक अडथळे नाहीत

  • केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी मंत्रिमंडळाने पीएम- विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी दिली आहे, जेणेकरून आर्थिक अडथळे कोणत्याही तरुणाला दर्जेदार उच्चशिक्षण घेण्यापासून रोखू शकत नाहीत. तांत्रिक, व्यावसायिक शिक्षण घेणायांना प्राधान्य दिले जाणार आहे.
  • केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान म्हणाले की, या योजनेमुळे गरीब आणि मध्यम वर्गातील लाखो विद्यार्थ्यांना सक्षम केले जाणार आहे.

OFFICIAL WEBSITE

EMI CALCULATOR

HOW TO APPLY PM Vidyalaxmi Scheme

Student Information

Welcome to Vidya Lakshmi Portal!

Vidya Lakshmi Portal provides single window for Students to access information about various loan schemes provided by banks and make applications for Educational Loans.

If you want to apply for education loan on Vidya Lakshmi portal, you must register on portal. Please provide essential details as mentioned in registration form.

Important Instructions

  • Please ensure that the registration details filled in are correct
  • Please enter password in required format

Guidelines for Registering on Vidya Lakshmi Portal

  • Name- Please enter student name as per 10th class marksheet or as per the marksheet attached with your loan application
  • Mobile Number- Enter a valid mobile number. Student can provide mobile number of parent/guardian
  • Email ID- Enter a valid email ID. Email ID will not be allowed to change. All necessary communications will be sent on this email ID.

REGISTRATION



1 Comment
    Test22
  1. MahaBhartiYojana says

    PM Vidya Lakshme Yojana

Leave A Reply

Your email address will not be published.