Abhinav Karj Yojana

Abhinav Online Shetmal Taran Karj Yojna


Abhinav Karj Yojana Details and how to apply for this loan is given here. Farmers store their produce in warehouses of Wakhar Corporation to store the produce till the right price is fetched. The State Co-operative Bank has devised a policy of lending up to 70% of the value against the pledge of such goods at an interest rate of only 9%. Vidyadhar Anaskar, chairman of the administrative board of the bank, told this information in a press conference. Under this Abhinav Karj Yojana the loan amount is deposited in the bank account of the concerned farmer in just 4 hours. State Co-operative Bank Administrator Vidyadhar Anaskar and State Vakhar Corporation President Deepak Tavre said in a press conference here on Wednesday that under the World Bank-funded Balasaheb Thackeray Agricultural Rural Transformation (Smart Project), online loans are disbursed on warehouse receipt. Below is the details of Abhinav Online Shetmal Taran Karj Yojna, Read it.

शेतकऱ्यांसाठी राज्य बँकेची अभिनव कर्ज योजना; 4 तासात शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये कर्जाची रक्कम होणार जमा

  • शेती मालाला योग्य भाव येईपर्यंत मालाची साठवणूक करण्यासाठी शेतकरी आपली उत्पादने वखार महामंडळाच्या गोदामात ठेवतात. अशा मालाच्या तारणावर, मूल्याच्या 70 टक्के इतका कर्जपुरवठा केवळ 9 टक्के व्याजदराने करण्याचे धोरण राज्य सहकारी बँकेने आखले आहे. अशी माहिती बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.
  • शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकारने अभिनव कर्ज योजना कार्यान्वित केली आहे. राज्य बॅंकने राज्य वखार महामंडळ तसेच जागतिक बँक अर्थसहाय्यित स्मार्ट प्रकल्प अंतर्गत विकसित केलेल्या ब्लॉक चेन संगणक प्रणाली द्वारा 100 कोटींचे कर्ज वितरित केले आहे.
  • या अंतर्गत केवळ 4 तासात संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये कर्जाची रक्कम जमा होते. जागतिक बँक अर्थसहाय्यित बाळासाहेब ठाकरे कृषि ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट प्रकल्प) अंतर्गत गोदाम पावतीवर ऑनलाईन कर्जाचे वितरण केले जाते, अशी माहिती राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर आणि राज्य वखार महामंडळ अध्यक्ष दीपक तावरे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
  • आपल्या शेती मालाला योग्य भाव येईपर्यंत मालाची साठवणूक करण्यासाठी शेतकरी आपली उत्पादने वखार महामंडळाच्या गोदामात ठेवतात. अशा मालाच्या तारणावर, मुल्याच्या 70 टक्के इतका कर्जपुरवठा केवळ 9 टक्के व्याजदराने करण्याचे धोरण राज्य सहकारी बॅंकेने 2020 पासून आखले आहे.

How to Apply for Abhinav Karj Yojana

कर्ज प्रक्रिया पद्धत

  • वखार महामंडळाच्या राज्यामधील 202 ठिकाणी वखार केंद्रांमधून शेतकऱ्यांनी ठेवलेल्या मालापोटी त्यांना कर्जाची आवश्यकता असल्यास, संबंधित वखार केंद्राद्वारे बॅंकेने पुरस्कृत केलेला विहीत नमुन्यातील अर्ज व इतर आवश्यक कागदपत्रांची पुर्तता वखार महामंडळाकडून केली जाते. के.वाय.सी. नुसार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता एकदाच केली जाते.
  • सदर दस्तऐवज ब्लॉक चेन प्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने बॅंकेस प्राफ्त होतात. कागदपत्रांची छाननी होऊन, संबंधित गोदाम पावतीवर ऑनलाईन पध्दतीनेच बॅंकेच्या कर्ज बोजाची नोंद होते. त्यानंतर वखार महामंडळाने निश्चित केलेल्या मुल्याच्या 70% इतकी रक्कम कर्ज मागणी केलेल्या शेतकऱयाच्या बँक खात्यावर आरटीजीएस/एनईएफटीद्वारे कर्जाची रक्कम वितरीत केली जाते. या सर्व प्रक्रियेस जास्तीत जास्त 4 तासांचा कालावधी लागतो. या प्रक्रियेमध्ये शेतकऱयास बँकेत यावे लागत नाही. किंबहुना शेतकरी व बॅंक यांची भेटच होत नाही. या कर्जाची मुदत 6 महिने असल्याने सदर मुदतीत आवश्यकतेनुसार कर्जाची परतफेड करुन शेतकरी मालाची सोडवणूक व विक्री करतात.

Overview of Abhinav Karj Yojana

योजनेची वाटचाल

  • राज्य सहकारी बँकेच्या मुंबई येथील कार्यालयाद्वारे या कर्जाचे वितरण होत आहे. आजपर्यंत प्राफ्त झालेल्या एकूण 4,543 शेतकऱ्यांच्या अर्जापोटी केलेल्या 100 कोटी कर्जवितरणापैकी एकूण 2,555 शेतकऱ्यांनी सुमारे 55 कोटी इतक्या कर्जाची परतफेड केली असुन उर्वरित 1,988 शेतकऱ्यांकडे 45 कोटींची येणे बाकी आहे याच धर्तीवर विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांकरिता बॅंकेची प्रस्तावित कर्ज योजना आहे.

Required Documents for Abhinav Online Shetmal Taran Karj Yojna

  • Aadhaar Card
  • PAN Card (if available)
  • Depositor’s 7/12 utara
  • Bank Promissory Note
  • Membership application

 

abhinav karj yojana



2 Comments
    Test22
  1. Samadhan Govinda patil says

    Pm kisan aavedan

  2. Test22
  3. Ram says

    Pm kishan yojana ki tahet lone chahiye

Leave A Reply

Your email address will not be published.