Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

वाहनचालकांच्या परवान्याला जूनपर्यंत मुदतवाढ

Vehicle license expiry extended till June

Vehicle license expiry extended till June – Due to the Corona Virus Vehicle License Expiry Day is extended now. सध्या अनेक शासकीय विभागांचे कामकाज बंद आहे. तसेच वाहतूकही बंद आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने ३० मार्च रोजी हा आदेश काढला आहे. त्यात म्हटले आहे की, वाहनचालकांच्या परवान्याची मुदत १ फेब्रुवारीनंतर संपली असली तरी त्याला पाच महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार ते लायसन ३० जूनपर्यंत वैध असेल. व्यावसायिक वापराच्या वाहनांचे परमीट, फिटनेस सर्टिफिकेट, नोंदणी पुस्तिका आदी संबंधित परवान्यांनाही ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

देशात लॉकडाऊन असल्याने केंद्र सरकारने वाहनचालकांना दिलासा दिला आहे. वाहन परवाना (लायसन) तसेच वाहनांचे परमीट किंवा फिटनेस सर्टिफिकेटची मुदत १ फेब्रुवारीनंतर संपली असली तरी कागदपत्रे ३० जूनपर्यंत चालणार असल्याचे केंद्राने आदेशात म्हटले आहे. राज्य सरकारने याबाबतच्या सूचना राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) दिल्यावर केंद्राच्या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने याबाबतचा आदेश काढला असला तरी, राज्य सरकारच्या परिवहन विभागाने या बाबतच्या नेमक्‍या सूचना राज्यातील ‘आरटीओ’ना देणे गरजेचे आहे. त्यानंतर त्याची अंमलबजावणी होईल.

सौर्स : सकाळ


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड